परभणी दुग्धशाळेत दूध संकलनात २३ हजार लिटरने वाढ

परभणी येथील शासकीय दूध योजनेअंतर्गत दुग्धशाळेत नोव्हेंबर महिन्यात २ लाख ३५ हजार २५ लिटर दूध संकलन झाले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत दूध संकलनात २३ हजार ३७६ लिटरने वाढ झाली आहे.
Milk collection at Parbhani Dairy increased by 23,000 liters
Milk collection at Parbhani Dairy increased by 23,000 liters

परभणी ः परभणी येथील शासकीय दूध योजनेअंतर्गत दुग्धशाळेत नोव्हेंबर महिन्यात २ लाख ३५ हजार २५ लिटर दूध संकलन झाले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत दूध संकलनात २३ हजार ३७६ लिटरने वाढ झाली आहे. परंतु येथे पॅंकिग तसेच दूध प्रक्रिया उत्पादने निर्मितीची व्यवस्था नसल्यामुळे वारणानगर, मुंबई आदी ठिकाणी दूध वितरित केले जात आहे.

मागील वर्षभरापासून येथील दुग्धशाळेत संकलित दुधाची देयके शेतकऱ्यांना वेळेवर अदा केली जात नाहीत. ग्रामपातळीवरील प्राथमिक सहकारी दूध उत्पादक व पुरवठा संस्थांचे कमिशन तसेच दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांचे भाडे देखील वेळेवर दिले जात  नसल्यामुळे कारणाने शासकीय दुग्धशाळेतील दूध संकलनाला घटीचे ग्रहण लागले आहे. त्याचबरोबर दूध संकलना वाढ झाल्यानंतर ते अतिरिक्त ठरवून स्वीकारले जात नाही. सदोष यंत्रसामग्रीमुळे दर्जेदार दुधाला देखील कमी दर दिले जातात. त्यात कर्मचारी, अधिकाऱ्यांची मनमानी, शीतकरण केंद्रावरील तोकडी यंत्रसामग्री त्यामुळे होणारी दुधाची नासाडी या बाबी घट होण्यात कारणीभूत ठरत आहेत.

फेब्रुवारी महिन्यापासून पाथरी येथील शीतकरण केंद्रातून होणारा दूध पुरवठा बंद झाला होता. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील दूध पुरवठा देखील बंद झाला होता. त्यामुळे दूध संकलनात घट झाली होती.लॉकडाऊनमध्ये हॉटेल्स, मिठाई व्यवसाय बंद राहिल्याने शासकीय दूध संकलनात वाढ सुरू झाली. त्यानंतर पाथरी येथील तसेच हिंगोली जिल्ह्यातून दूध पुरवठा सुरू झाल्यामुळे दूध संकलनात सप्टेंबर महिन्यापासून वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात २३ हजार ३७६ लिटरने वाढ झाली.

परभणी, हिंगोली, नांदेड या तीन जिल्ह्यातील तसेच शिरूर येथील मिळून एकूण २ लाख ३५ हजार २५ लिटर दूध संकलन झाले. दूध संकलनानंतर प्राथमिक प्रक्रिया केली जाते. पॅंकिंग, दुग्धप्रक्रिया उत्पादने निर्मितीसाठी आवश्यक सयंत्र नसल्यामुळे परभणी येथून वारणानगर, मुंबई येथील आरे, वरवंड येथील प्रक्रिया उद्योगांना दूध वितरित केले जाते. नोव्हेंबर महिन्यात एकूण २ लाख ३४ हजार ७५० लिटर दूध वितरित करण्यात आले.

नोव्हेंबर महिन्यात शीतकरण केंद्रनिहाय संकलन (लिटरमध्ये)
शीतकरण केंद्र दूध संकलन
परभणी ९६६१४
पाथरी ४४००७
गंगाखेड ५०७५१
हिंगोली १४७०९
नांदेड २०८७०
शिरूर ७७४४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com