agriculture news in marathi Milk collection in Sangli district increased by 25,000 liters | Agrowon

सांगली जिल्ह्यात दूध संकलनात २५ हजार लिटरची वाढ

टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

सांगली ः ऑक्टोबर ते जानेवारीअखेर हा दूध वाढीचा काळ असतो. जनावरांना चांगल्या प्रतीचा चारा उपलब्ध झाल्याने जिल्ह्यातील प्रतिदिनी दूध संकलनात २५ हजार लिटरची वाढ झाली आहे.

सांगली ः ऑक्टोबर ते जानेवारीअखेर हा दूध वाढीचा काळ असतो. जनावरांना चांगल्या प्रतीचा चारा उपलब्ध झाल्याने जिल्ह्यातील प्रतिदिनी दूध संकलनात २५ हजार लिटरची वाढ झाली आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत प्रति दिन दुधाचे संकलन १२ लाख लिटर इतके होईल, असा अंदाज मिरज येथील दुग्धविकास योजनेच्या सूत्रांनी व्यक्त केला.

जिल्ह्यात सुमारे सहकारी ७ आणि मल्टीस्टेट १७ आणि खासगी १२ अशी ३६ दूध संकलन केंद्र आहेत. जिल्ह्यात सरासरी १३ लाख लिटर दुधाचे संकलन होते. ऑक्टोबर महिन्यात सरासरी प्रति दिन १० लाख ७३ हजार ६०६ लिटर इतक्या दुधाचे संकलन झाले होते. तर, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात १० लाख ९८ हजार ९०९ लिटर दूध संकलित झाले. प्रति दिन २५ हजार लिटरने दूध संकलनात वाढ झाली आहे. 

जिल्ह्यात शेतीला जोड धंदा म्हणून दूग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. प्रतिकूल परिस्थितीतही पशुपालकांना जनावरे सांभाळली आहेत. गेल्या दोन ते तीन महिन्यापूर्वी दूध संकलनात १५ ते २० हजार लिटरने घट झाली होती. गेल्या महिन्यापासून दूध वाढीचा काळ सुरु झाल्याने दूध संकलनात वाढ झाली आहे. दोन ते तीन महिन्यात दोन ते अडीच लाखाने दूध संकलनात वाढ होईल. 

तीन ते चार वर्षापूर्वी जिल्ह्यातील दैनंदिन दूध संकलन सुमारे १५ ते १६ लाख लिटर संकलन होते. परंतु दोन वर्षापूर्वी जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, जत या तालुक्यात  प्रचंड मोठा दुष्काळ पडला. छावण्या सुरु झाल्या. परिणामी, जनावरे जगविण्यासाठी पशुपालकांना मोठी कसरत करावी लागली. 

प्रतिदिन संकलनात घट

आर्थिक ताळमेळ बसला नसल्याने पशुपालकांनी जनावरांची विक्री केली. दरम्यान, अशातही अनेक पशुपालकांनी जनावरांचा सांभाळ केला. मात्र, गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यातील प्रति दिन दूध १२ ते १३ लाख लिटर संकलन होते. याचा अर्थ तीन वर्षाच्या तुलनेत प्रति दिन दूध संकलनात घट झाली असल्याचे चित्र आहे.


इतर बातम्या
शेतकरी मागण्यांवर ठाम; ट्रॅक्टर रॅलीही...नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्‍टर...
बर्ड फ्लू नुकसानग्रस्त पोल्ट्री...नागपूर ः राज्यात ११ जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा...
एक लाख शेतकऱ्यांची तूर विक्रीसाठी...अकोला ः राज्यात या हंगामात उत्पादित तूर खरेदीला...
कापूस उत्पादकतावाढीसाठी ‘सीआयसीआर’चा ॲ...नागपूर ः जगाच्या तुलनेत भारताची आणि त्यातही...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष हंगामास उशीरसांगली ः जिल्ह्यात अगदी क्वचितच आगाप छाटणी...
आजरा घनसाळसह तूरडाळ, घेवडा मिळणार...कोल्हापूर : पारंपरिक विक्री व्यवस्थेच्या पलीकडे...
थंडीत चढ-उतार सुरुच पुणे ः हिमालय आणि पश्चिम बंगालच्या परिसरात कमी...
खांबापासून ३० मीटरच्या आतील कृषिपंपांना...पुणे ः राज्यातील शेतकऱ्यांना कृषिपंपांसाठी...
ट्रक वाहतूकदारांचे दोन हजार कोटींचे...अमरावती : नवीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीत...
गव्यांच्या कळपाकडून केळी बागांचे नुकसानसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील विलवडे मळावाडी (ता....
गोरेवाडा प्राणिसंग्रहालय नामकरणाला विरोधनागपूर ः नागपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या...
औरंगाबाद विभागात उसाचे ४७ लाख टन गाळपऔरंगाबाद : येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर)...
वीज तोडल्यास गाठ आमच्याशी : कृती समितीकोल्हापूर ः कोरोना काळातील वीजबिले माफ करण्याची...
बीटी कापूस बियाण्यातील शेतकऱ्यांची...बुलडाणा ः कापूस उत्पादकांना कमी खर्चात अधिक...
अण्णांचे दिल्लीऐवजी राळेगणसिद्धीत आंदोलननगर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नवी...
उत्पादनवाढीसाठी योग्य तंत्रज्ञान वापरा...सोलापूर ः हरभरा, तूर या कडधान्य पिकाखालील...
गावठाण भूमापन कामाचे ड्रोनद्वारे...नांदेड : ‘‘भूमी अभिलेख विभाग व भारतीय सर्वेक्षण...
जमिनींचा लिलाव रोखा ; शेतकरी संघटनेची...नाशिक : शेतकऱ्यांचे चोहोबाजूंनी नुकसान झाले आहे....
सातारा जिल्ह्याची वीजबिल थकबाकी ४४...नगर ः खरीप हंगामात तयार झालेल्या तुरीला बाजारात...
केंद्र सरकारकडून कृषी कायदांना...नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी...