नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात मागील ५६ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या
ताज्या घडामोडी
सांगली जिल्ह्यात दूध संकलनात २५ हजार लिटरची वाढ
सांगली ः ऑक्टोबर ते जानेवारीअखेर हा दूध वाढीचा काळ असतो. जनावरांना चांगल्या प्रतीचा चारा उपलब्ध झाल्याने जिल्ह्यातील प्रतिदिनी दूध संकलनात २५ हजार लिटरची वाढ झाली आहे.
सांगली ः ऑक्टोबर ते जानेवारीअखेर हा दूध वाढीचा काळ असतो. जनावरांना चांगल्या प्रतीचा चारा उपलब्ध झाल्याने जिल्ह्यातील प्रतिदिनी दूध संकलनात २५ हजार लिटरची वाढ झाली आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत प्रति दिन दुधाचे संकलन १२ लाख लिटर इतके होईल, असा अंदाज मिरज येथील दुग्धविकास योजनेच्या सूत्रांनी व्यक्त केला.
जिल्ह्यात सुमारे सहकारी ७ आणि मल्टीस्टेट १७ आणि खासगी १२ अशी ३६ दूध संकलन केंद्र आहेत. जिल्ह्यात सरासरी १३ लाख लिटर दुधाचे संकलन होते. ऑक्टोबर महिन्यात सरासरी प्रति दिन १० लाख ७३ हजार ६०६ लिटर इतक्या दुधाचे संकलन झाले होते. तर, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात १० लाख ९८ हजार ९०९ लिटर दूध संकलित झाले. प्रति दिन २५ हजार लिटरने दूध संकलनात वाढ झाली आहे.
जिल्ह्यात शेतीला जोड धंदा म्हणून दूग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. प्रतिकूल परिस्थितीतही पशुपालकांना जनावरे सांभाळली आहेत. गेल्या दोन ते तीन महिन्यापूर्वी दूध संकलनात १५ ते २० हजार लिटरने घट झाली होती. गेल्या महिन्यापासून दूध वाढीचा काळ सुरु झाल्याने दूध संकलनात वाढ झाली आहे. दोन ते तीन महिन्यात दोन ते अडीच लाखाने दूध संकलनात वाढ होईल.
तीन ते चार वर्षापूर्वी जिल्ह्यातील दैनंदिन दूध संकलन सुमारे १५ ते १६ लाख लिटर संकलन होते. परंतु दोन वर्षापूर्वी जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, जत या तालुक्यात प्रचंड मोठा दुष्काळ पडला. छावण्या सुरु झाल्या. परिणामी, जनावरे जगविण्यासाठी पशुपालकांना मोठी कसरत करावी लागली.
प्रतिदिन संकलनात घट
आर्थिक ताळमेळ बसला नसल्याने पशुपालकांनी जनावरांची विक्री केली. दरम्यान, अशातही अनेक पशुपालकांनी जनावरांचा सांभाळ केला. मात्र, गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यातील प्रति दिन दूध १२ ते १३ लाख लिटर संकलन होते. याचा अर्थ तीन वर्षाच्या तुलनेत प्रति दिन दूध संकलनात घट झाली असल्याचे चित्र आहे.
- 1 of 1024
- ››