agriculture news in marathi Milk, eggs: useful for human diet | Agrowon

दूध, अंडी ः मानवी आहारासाठी उपयुक्त

डॉ. एस.एन.रिंढे,  डॉ.व्ही.डी.आहेर  
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

आपल्या शरीराला लागणारी ऊर्जा आहारातून मिळते. त्या ऊर्जेतून शरीरांतर्गत चयापचय क्रिया आणि बाह्यशारीरिक हालचाली होत राहतात. आहाराचे शाकाहारी आणि मांसाहारी आहार असे मुख्य प्रकार दिसून येतात.
 

आपल्या शरीराला लागणारी ऊर्जा आहारातून मिळते. त्या ऊर्जेतून शरीरांतर्गत चयापचय क्रिया आणि बाह्यशारीरिक हालचाली होत राहतात. आहाराचे शाकाहारी आणि मांसाहारी आहार असे मुख्य प्रकार दिसून येतात.

भारतीय वैद्यकशास्त्र संशोधन परिषदेच्या अहवालानुसार मानवी आहरात दररोज मानवाच्या १ किलो वजनाकरिता १ ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता असते. म्हणजेच एकूण ६० ग्रॅम प्रति व्यक्ती प्रति दिवस सेवन करणे गरजेचे आहे. त्यापैकी कमीत कमी २० ग्रॅम/व्यक्ती/दिन प्राणीजन्य प्रथिनांचे प्रमाण असावे असे निर्देशित केलेले आहे. 

दुधाचे महत्त्व  

 • भारतीय वैद्यकशास्त्र संशोधन परिषदेच्या अहवालानुसार उत्तम आरोग्यासाठी मानवी आहारात रोज कमीत कमी २८० ग्रॅम दूध असावे. यामध्ये उच्च प्रतीचे पौष्टिक अन्नघटकांचा समतोल प्रमाणात समावेश आहे. 
 • दुधातून स्नायूवृद्धीसाठी लागणाऱ्या उच्च प्रतीच्या प्रथिनांचा पुरवठा होतो. हाडांच्या मजबुतीसाठी लागणारे क्षार, शरीरास उपयुक्त असे जीवनसत्वे आणि कार्यशक्ती देणारे घृतांश व दुग्ध शर्करा हे घटक आहेत. 

दुधातील प्रमुख घटकांचे  आहारदृष्ट्या महत्त्व 
प्रथिने 

 • दुधात असणारी प्रथिने ही उच्च प्रतीची व परिपूर्ण आहेत. शाकाहारी लोकांसाठी प्राणिजन्य प्रथिने दुधातून मिळू शकतात.
 • यामध्ये सर्व अत्यावश्यक अशी अमिनो आम्ले असतात. त्यामुळे शरीराची वाढ उत्तमरीत्या होण्यास मदत होते. 
 • स्नायूंच्या बळकटीसाठी दुधातील प्रथिने उत्तम आहेत.

जीवनसत्वे 

 • जीवनसत्त्वेही पूरक तत्त्वे म्हणून महत्त्वाची आहे. शरीर वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहेत.
 • दुधात थायमिन, रायबोफ्लावीन इत्यादी जीवनसत्वे समतोल प्रमाणात उपलब्ध आहेत. 
 • दुधामध्ये अ, ब आणि ड जीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळतात.

दुग्धशर्करा

 • हा घटक शरीरास कार्य करण्यास शक्ती देतो.
 • उदरात पचनाच्या प्रक्रियेत सौम्य आम्लिक क्रिया घडवून आणतो, ज्यामुळे अपायकारक जिवाणूंची वाढ होण्यास प्रतिबंध बसतो.
 • क्षार
 • दुधामध्ये असणारे सर्व प्रकारचे क्षार हे आहारात महत्त्वाचे आहेत. प्रामुख्याने कॅल्शिअम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात. तर लोह, तांबे व आयोडीन हे काहीशा थोड्या प्रमाणात असतात.
 • २०० मि.लि. दुधामध्ये साधारण २५७ मि.ग्रॅ. कॅल्शिअम असते. आपल्या शरीराला साधारण रोज १००० ते १२०० मि.ग्रॅ कॅल्शिअमची आवश्यकता असते. 
 • प्रत्येक व्यक्तीला दिवसाला एक ते दोन ग्लास दूध पिण्याची आवश्यकता आहे.

घृतांश

 • दुधातील महत्त्वाचा घटक आहे. यामुळे दुधाची प्रत, सुगंध व इतर गुणधर्मामध्ये बदल होतात. त्यांच्यापासून शरीरास कार्यशक्ती उपलब्ध होते. 
 • यामध्ये सर्व प्रकारचे आवश्यक घृत आम्लांचा समावेश आहे. यांच्या  प्रमाणावरच दुग्धजन्य पदार्थांची प्रत, आकार आणि इतर गुणधर्म अवलंबून असतात.

अंड्याचे महत्त्व
भारतीय वैद्यकशास्त्र संशोधन परिषदेच्या मानकानुसार प्रती व्यक्तीने  दरवर्षी १८० अंडी आणि ११ किलो मांस खाणे गरजेचे आहे. परंतु सध्याच्या उत्पादन क्षमतेनुसार प्रत्येक व्यक्तीला प्रति वर्ष ७९ अंडी आणि ४.४ किलो मांसाची उपलब्धता आहे. 

अंड्यातील मानवी शरीरास उपयुक्त अन्नघटकांचे फायदे 
ऊर्जा मूल्य 

 • कोंबडीच्या सर्वसाधारण  अंड्याचे ऊर्जा मूल्य हे ७८ किलो कॅलरी असते. 
 • रोजच्या आहारातील एका  अंड्यापासून  ३ टक्के ऊर्जा मिळते. त्याच बरोबर कमी प्रमाणात विरघळणारे स्निग्ध असते.

प्रथिने 

 • अंड्यामधून उत्तम प्रकारची प्रथिने मिळतात. त्यामध्ये ११ टक्के प्रथिने असतात. 
 • एका अंड्यामधून ६.५ प्रथिने असतात. ज्यामध्ये माणसाच्या शरीराला लागणारे सर्व म्हणजे  नऊ प्रकारचे अमिनो आम्ले असतात. ही शरीर वाढीसाठी आवश्यक असतात.

जीवनसत्वे 

 • त्वचा, डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे अ जीवनसत्त्व अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात. 
 • मजबूत दात आणि हाडासाठी आवश्यक असणारे ''ड'' जीवनसत्त्व , प्रजननक्षमता वाढवणारे ''ई'' जीवनसत्त्व , शरीरातील रक्त गोठण्यासाठी आवश्यक असणारे ''के'' जीवनसत्त्व अंड्यामध्ये योग्य प्रमाणात असतात.
 • चयापचय, भूकवाढ इत्यादीसाठी आवश्यक असणाऱ्या ''ब'' जीवनसत्त्वाचा पूर्ण गट अंड्यामध्ये असतो. 
 • अंड्यामध्ये ''क'' जीवनसत्त्व सोडून सर्व जीवनसत्त्व योग्य प्रमाणात असतात. निसर्गतः जीवनसत्त्व ''ड'' असणाऱ्या घटकांमध्ये व लहान मुलांसाठी पहिला घट्ट अन्न पदार्थ असणाऱ्या पदार्थामध्ये अंड्याचा समावेश होतो.

खनिजे 

 • माणसाच्या आरोग्यासाठी लागणाऱ्या खानिजापैकी बहुतांश खनिजे अंड्यामधून मिळतात. 
 • अंडे हा आयोडीनचा उत्तम स्रोत आहे, जो थायरॉईड हार्मोन तयार करण्यास उपयोगी पडतो. अंड्यामध्ये लोह, कॅल्शिअम, सोडिअम, पोटॅशिअम, सल्फर, मॅग्नेशिअम, झिंक, कॉपर, क्लोरिन, आणि सेलेनिअम सारखी खनिजे हाडांच्या आरोग्यासाठी आणि कॅल्शिअम जखम भरून काढण्यासाठी, झिंक उत्तम ॲन्टीऑक्सीडंट म्हणून काम करते.  अंड्यामध्ये सेलेनिअम चांगल्या प्रमाणात असते.

स्निग्ध पदार्थ 

 • अंड्यामध्ये स्निग्ध पदार्थाचे प्रमाण ११.२ टक्के असते. सर्वात जास्त स्निग्ध पदार्थाचे प्रमाण अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये असते. आणि ०.५ टक्के प्रमाण हे पांढऱ्या बलकामध्ये असते. 
 • साधारण आकाराच्या अंड्यामध्ये ७० मिलीग्रॅम ओमेगा-३ फॅटी ॲसिड असते. हे स्निग्ध पदार्थ पचनाला सोपे असतात.

कोलेस्टेरॉल 

 • अंड्यामध्ये कोलेस्टेरॉल आणि लेसीथीन असते. त्याचा उपयोग स्निग्ध पदार्थ सारखा असून शरीरात पेशी तयार होण्यासाठी तसेच त्याच्या कार्यात मदत करतो.  अंड्याच्या पांढऱ्या बलकामध्ये कोलेस्टेरॉल नसतात, पिवळ्या बलकामध्ये त्याचे प्रमाण १९० मि.लि.ग्रॅम असते. 
 • नवीन संशोधनानुसार दिवसाला एक अंडे खाल्ले तरी रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण विशेष वाढत नाही.

पिष्टमय पदार्थ 

 • अंड्यामध्ये पिष्टमय पदार्थाचे प्रमाण नगण्य असते. अवयवांच्या वाढीसाठी  आणि विकासाच्या दृष्टीने आवश्यक असणारे घटक भरपूर प्रमाणात अंड्यातून मिळतात.
 • अंडे हे स्तनाचा कर्करोग रोखण्यासाठी उपयोगी आहे. गर्भातील अर्भकाच्या मेंदूचा विकासासाठी अंड्यातील कोलिन हे उपयुक्त आहे. या घटकांमुळे शाळकरी मुलांची विचारशक्ती आणि स्मरण शक्ती विकसित होते.
 • मध्यमवयीन लोकांच्यामधील विस्मरणाच्या आजारावर कोलिन हे गुणकारी आहे. माणसाला प्रती दिन लागणाऱ्या कोलिनच्या गरजेपैकी २२ टक्के गरज एका अंड्यातून पूर्ण होऊ शकते.
 • लहान मुले, गरोदर माता, स्तनदा माता गर्भाशयातील गर्भ, तरुण- तरुणी, आजारी, वयोवृद्ध अशा सर्वच वयोगटातील लोकांसाठी अंडे हे वरदान ठरले आहे.

चिकन, अंडी वाढवितात रोगप्रतिकारक क्षमता 
जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे की, कोंबड्या किंवा कुक्कुट उत्पादन यांचा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भवाशी कोणताही संबंध नाही. आत्तापर्यंत कोणत्याही कुक्कुट पक्षाला किंवा त्यांच्यामार्फत मानवाला संसर्ग झाल्याचा जगामध्ये एकही पुरावा मिळाला नाही. भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने चिकन  आणि कुक्कुट उत्पादन मानवी आहारामध्ये वापरण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहेत.

संपर्क : डॉ.एस.एन.रिंढे, ९९२१२१६९०५,
माफसू टोल फ्री क्रमांक ः १८०० २३३ ३२६८
(डॉ.रिंढे हे पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी येथे आणि डॉ.आहेर हे  महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर  येथे विस्तार शिक्षण संचालक आहेत.)


इतर महिला
फळबागेला प्रक्रिया उत्पादनांची जोडशेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ...
बचत गटाने दिली आर्थिक ताकद.आगसखांड (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील बारा...
टार्गेट ठेवूनच करतेय शेतीपतीची बॅंकेत नोकरी असल्याने बदली ठरलेली. त्यामुळे...
सविताताईंनी जिद्दीने ठरविले की लढायचेपतीचे हृदविकाराने झालेले निधन, डोक्यावर सात...
कणेरीच्या ‘सिद्धगिरी’ने बनवले महिलांना...कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी (ता. करवीर) येथील...
वातदोषावर उपाय ः हादग्याची फुले, शेंगाआयुर्वेदानुसार त्रिदोषांपैकी वातदोष कमी...
शेळीपालनाने दिली आर्थिक प्रगतीची दिशाजळवंडी (ता.जुन्नर, जि.पुणे) या दुर्गम आदिवासी...
तेलनिर्मिती उद्योगात तयार केली ओळखसांगली शहरातील सौ. सुजाता विठ्ठल चव्हाण यांनी...
आरोग्यवर्धक तांदूळअन्नपदार्थात ‘तांदूळ’ सर्वांना सुपरिचित आहेच. या...
सामाजिक दायीत्वातून जीवनात फुलले ‘...आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी आणि...
चटणी, मसाल्याचा बनविला ब्रॅण्डकोल्हापूरची खाद्य संस्कृती म्हटलं की, तिखटाबरोबर...
आरोग्यदायी आले आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे...
संतुलीत आहार स्रोत ः सीताफळसीताफळाची लोकप्रियता कोरडवाहू लागवडयोग्य, कीड...
शेतीला मिळाली पूरक उद्योगांची जोडभोके (ता. जि.रत्नागिरी) या दुर्गम गावातील देवयानी...
जाणून घ्या पळसाचे आरोग्यदायी गुणधर्मआपल्या सर्वांना पळस ही वनस्पती परिचित आहे....
आरोग्यदायी आवळाआवळा हे फळ प्रक्रिया केल्यास आपल्याला वर्षभर औषध...
सीताफळातून होतो जीवनसत्त्वांचा पुरवठासीताफळात जीवनसत्त्व क अत्यंत चांगल्या प्रमाणात...
हळदीचे औषधी गुणधर्महळद ही अत्यंत गुणकारी असून, त्यातील जंतूनाशक...
गुणकारी वाळावाळा म्हटले की उन्हाळ्याच्या दिवस आठवतात. माठ...
परसबागेतून मिळतो पोषण आहारभंडारा जिल्ह्यातील कोका अभयारण्याच्या जवळील...