दूधप्रश्‍नी शेतकरी आक्रमक; राज्यभरात निदर्शने

दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७) राज्यभर किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीतर्फे आंदोलन करण्यात आले. राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन, निदर्शने व तहसील कार्यावर मोर्चे काढले.
दूधप्रश्‍नी शेतकरी आक्रमक; राज्यभरात निदर्शने
दूधप्रश्‍नी शेतकरी आक्रमक; राज्यभरात निदर्शने

नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७) राज्यभर किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीतर्फे आंदोलन करण्यात आले. राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन, निदर्शने व तहसील कार्यावर मोर्चे काढले. या आंदोलनाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी सकाळीच ठिकठिकाणी दूध संकलन केंद्रावर दगडाला दुग्धाभिषेक करुन नंतर तहसील कार्यालयांवर जाऊन निदर्शने करत मागण्याची निवेदने दिली. आज (ता.१८) लाखगंगा (ता. वैजापुर) येथे शेतकरी नेते धनंजय धोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘लुटता कशाला फुकटच न्या’ या धर्तीवर गावांत ठराव घेऊन पुढील अंदोलनाला सुरवात होत आहे. किसान सभेचे डॉ. सुरेस ढवळे, डॉ. अजित नवले, किसन गुजर, अर्जुन नाडे, उमेश देशमुख, जे. पी. गावित आदींसह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (ता.१७) राज्यभर आंदोलन केले.

राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी

  • डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली अकोले तालुक्यात निदर्शने
  • नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किसन गुजर, सुनील मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
  • जालन्यात घनसांगवी तालुक्यात गोविंद अरदड यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा
  • सोलापुर जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर
  • पुण्यातील जुन्नर व आंबेगाव येथे शेतकरी आक्रमक
  • अमरावतीत शाम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दगडाला अभिषेक
  • कवठे महाकांळ येथे शेतकऱ्यांनी रॅली काढली
  • परभणीमधील मानवत येथे पीक विमाप्रश्नावरही शेतकरी आक्रमक
  • सांगली जिल्ह्यात उमेश देशमुख, दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
  • नांदेड जिल्ह्यात माहुरला मोर्चा
  • प्रतिक्रिया... कोरोनाच्या नावाखाली दूध उत्पादक शेतकऱ्यांची होणारी लुट सरकारने थांबवावी व आत्तापर्यंत लुटलेले पैसे परत करावेत. साखर व्यवसायाप्रमाणे दूध व्यवसायाला संरक्षण द्यावे व ग्राहक-दूध उत्पादकांच्या दृष्टीने होणारे नुकसान टाळण्यासाठी भेसळ थांबवावी, अशी आमची मागणी आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आमचा लढा सुरुच राहील. - डॉ. अजित नवले, नेते, किसान सभा 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com