Agriculture news in Marathi Milk issue farmers' agitation in Mumbai today | Agrowon

दूधप्रश्‍नी शेतकरी संघटनेचे आज मुंबईत आंदोलन

टीम अॅग्रोवन
बुधवार, 29 सप्टेंबर 2021

दूध उत्पादक शेतकऱ्यांना देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली वरळीतील दुग्धविकास आयुक्त कार्यालयावर बुधवारी (ता. २९) दुपारी एक वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. 

पुणे : शेतकऱ्यांच्या वाट्याचे प्रति लिटर पाच रुपये प्रमाणे पैसे देणे बंधनकारक आहे. ही रक्कम दूध उत्पादक शेतकऱ्यांना देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली वरळीतील दुग्धविकास आयुक्त कार्यालयावर बुधवारी (ता. २९) दुपारी एक वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. 

या वेळी थकीत दूध बिल मागण्यासाठी दूध उत्पादकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेड शेतकरी संघटना अध्यक्ष शिवाजी नांदखिले यांनी केले.

श्री. नांदखिले म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील गाईच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला प्रति लिटर २७ रुपयांसाठी पहिला जीआर (शासननिर्णय) दिनांक १९ जून २०१७ रोजी काढला. त्यानंतर झालेल्या राजू शेट्टींच्या आंदोलनातील तडजोडीनुसार सरकारने वीस अधिक पाच दरासाठीचा जीआर २७ सप्टेंबर २०१८ रोजी काढला. या दोन्ही जीआरमधील अंतर एक वर्ष तीन महिने सहा दिवस अंतरातील शेतकऱ्यांच्या दूधदरातील फरकाचे बिल महाराष्ट्रातील सुमारे ८ हजार ३७० कोटी रुपये इतके आहे. या थकीत दूध बिलासंदर्भात शेतकरी संघटनेच्या वतीने कोर्टात जाऊन शेतकरी संघटनेचे इंदापूर तालुका अध्यक्ष हरिदास पवार व पुणे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग रायते यांनी कोर्टातून सिद्ध करून आणले. त्यामुळे ही थकीत रक्कम मिळण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.’’


इतर अॅग्रो विशेष
किमान तापमानात घट होण्याची शक्यतापुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान...
‘महाडीबीटी’च्या कामात अडथळाअकोला ः कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ...
कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने आता...पुणे ः राज्यातील कृषी सेवा केंद्रांना परवान्याची...
आयातीमुळे कडधान्य दर दबावातपुणे ः तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल...
...तर द्राक्षाचे नुकसान टळले असतेनाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील...
साहित्य संमेलनाचे अनुदान शेतकरी,...नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी...
देशी वाणाने सकस उत्पादन ः राहीबाई पोपेरेसांगली : पारंपरिक बियाणाला रासायनिक खताच्या...
शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा...कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी...
मराठवाड्यात आंब्यावर संकटाचे ढगऔरंगाबाद : यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत....
पुन्हा उभा राहिलो अन् यशस्वीही झालो...दुग्ध व्यवसायात भरभराट येत असतानाच कुट्टी यंत्र...
पीकबदल, फळबागांसह पूरक उद्योगांची साथऔरंगाबाद जिल्ह्यातील जडगाव येथील भोसले कुटुंबाने...
डेअरी उद्योगातील खरेदीदराचा गोंधळ कायमपुणे ः राज्यातील दुधाच्या बाजारपेठेत विक्रीविषयक...
ऊस उत्पादकांचे अद्याप ४,४४५ कोटी थकीतकोल्हापूर : गेल्या हंगामात उत्तर प्रदेशातील साखर...
कोरड्या हवामानाचा अंदाज, गारठाही वाढणारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिली असून, आकाश...
लातूर जिल्ह्यात द्राक्ष बागांना पावसाचा...लातूर ः जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून...
पाकिस्तानमध्ये कापसाचे दर टिकूनपुणे ः पाकिस्तानमध्ये यंदा कापूस उत्पादनात वाढ...
‘पशुसंवर्धन’च्या योजनांसाठी अर्ज...पुणे ः जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित व...
मनाच्या वेदना दूर करण्यासाठी संघर्ष ः...कुंडल, जि. सांगली : माणसाच्या अंगाला, कपड्याला...
शेती हा आर्थिक प्रश्‍न ः विलास शिंदेनाशिक : शेतीविषयी चर्चा राजकीय व सामाजिक अंगाने न...
उसाच्या पहिल्या पेमेंटकडे लागले लक्षपुणे ः राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून...