agriculture news in Marathi, milk pant owner not giving rate, Maharashtra | Agrowon

दूधदरवाढीच्या निर्णयाला हरताळ

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 जुलै 2018

काही दूध संघांनी वैयक्‍तिक पातळीवर हिशोबात तांत्रिक अडचणी येत असल्याने सरकारकडे मुदतवाढ मागितली आहे. एक ऑगस्टपासून निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे त्यांनी मान्य केले आहे. यामुळे दूध दराची वाढीव रक्कम एक ऑगस्टनंतर शेतकऱ्यांना मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- राजू शेट्टी, खासदार

कोल्हापूर : राज्य शासनाने २१ जुलैपासून गायीच्या दूधाला प्रतिलिटर २५ रुपये दर द्यावा, असे आदेश देऊनही काही सहकारी दूध संघ वगळता इतर दूध संघांनी हा आदेश धाब्यावर बसविला आहे. काही संघांनी बैठका घेऊन एक ऑगस्टपासून या दूधदरवाढीबाबत निर्णय घेण्याचे ठरविले आहे.

सहकारी संघांची तातडीची अंमलबजावणी
पश्‍चिम महाराष्ट्रातील काही नामवंत व जास्त दूध संकलन असणाऱ्या दूध संघांनी शासनाने निर्णय जाहीर केल्या केल्या तातडीने निर्णय घेऊन दूधदराची अंमलबजावणी सुरू केली. यानुसार दूध संकलनही सुरू झाले. परंतु, राज्यातील अनेक दूध संघांनीही परस्पर बैठका घेऊन १ तारखेपासून या दराची अंमलबजावणी करण्याबाबत निर्णय घेतला आहे. पण, याबाबत फारशी वाच्यता कुठेच झाली नाही. यामुळे या संघाचे कमी दरात दूध संकलन नियमितपणे सुरू आहे. 

दूध संकलनाबाबत माहिती घेण्याचे काम सुरू
दूधदर आंदोलन मागे घेतल्यानंतर शासनाने बहुतांशी दूध संघांमध्ये आपले प्रतिनिधी पाठवून दूध संकलनाची माहिती संकलित करण्यास सुरवात केली आहे. राज्याकडे दुधाबाबत नेमकी माहिती नसल्याने निर्णय घेणे अवघड होत नसल्याने आता प्रत्येक दूध संघात प्रतिनिधी पाठवून दूध संकलनाची माहिती घेण्यास सुरवात केली आहे. दूध संकलन किती होते. अतिरिक्त किती होते. ते कुठे पाठवले जाते याची माहितीही घेण्यात येत आहे. याचप्रमाणे विक्री करणारा व खरेदी करणाऱ्या दोघांची नोंदही एकाच वेळी घेतली जात आहे. 

दूध दरवाढीच्या निर्णयाला हरताळ
राज्यातील बहुतांशी दूध संघांनी अद्यापही जुन्या दरानेच खरेदी सुरू केली आहे. शासन संघांमध्ये भेदभाव करीत असल्याने या आदेशाची तातडीने पालन करणाऱ्या दूध संघाकडून तीव्र प्रतिक्रीया व्यक्त होत आहे. २१ तारखेपासून दर का दिला नाही, हा दर न दिलेल्या संघांवर शासन कारवाई करणार का? हा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. दूध संघांच्या अंमलबजावणी अभावी शासनाने आदेश देऊनही लाखो दूध उत्पादकांचे दररोज नुकसान होत आहे. याबाबत दूध उत्पादकांतूनही संतप्त प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत.

आम्हाला माहितीच नाही
आम्हाला पुरेशी माहिती नाही, याची अंमलबजावणी कशी करायची हे आम्हाला समजल्याशिवाय आम्ही जादा दराने दूध संकलन कसे करणार, असा सवाल जुन्या दराने दूध खरेदी करणाऱ्या एका संघाच्या प्रतिनिधीने व्यक्त केला. हा हिशोब कसा घालायचा याबाबत अद्याप आम्ही गोंधळात असल्याने आम्ही सरकारच्या आदेशाप्रमाणे अद्याप नव्या दराने दूध खरेदी सुरू केली नसल्याचे या दूध संघाच्या प्रतिनिधीने सांगितले. 

दूध संघ प्रतिनिधींची आज मुंबईत बैठक
दूधदरवाढीबाबत नेमकी अंमलबजावणी कशी करायची याबाबत शासनाने मुंबईत आज (ता. ३१) बैठक बोलाविली आहे. या बैठकीत संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारीही उपस्थित रहाणार आहेत. बैठकीतच दूध दरवाढ कशी अंमलात आणायची याबाबतचे मार्गदर्शन संघाच्या प्रतिनिधींना होणार आहे.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...
कृषी सुपर मार्केट ः संकल्पना आणि संधीजागतिकीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर शेती हा एक आर्थिक...
बदल हवेत दिलासादायकहवामान आधारीत फळपीक विमा योजनेत केळी पिकासाठी...
नैसर्गिक आपत्तीत पीकच नाई, तर बापही...यवतमाळः नैसर्गिक आपत्तीत आमी पीकच नाई, त आमचा...
राज्यात गाईच्या दूध खरेदी दरात कपात नगर ः लॉकडाऊन उघडल्यानंतर दुधाची मागणी वाढल्यावर...
कोरडवाहू, बागायतीसाठी हेक्टरी १० हजार...मुंबई: अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे...
थकबाकीदार ७१ कारखान्यांचे गाळप परवाने ‘...पुणे: राज्यात चालू हंगामात ऊस गाळपासाठी अर्ज...
शेडनेट, फळबागेतून मिळालेल्या ओळखीसह...धुळे जिल्ह्यातील फागणे (ता. धुळे) येथील उमेश व...
कष्ट, नियोजनपूर्वक उभारली आंबा, नारळ,...शासकीय योजनांचा पुरेपूर वापर करताना वरवडे (ता. जि...
शाश्‍वत पर्यायी पीक ः बांबूनिसर्ग चक्र बदलत चालले आहे. आतापर्यंत आपण रेल्वे...
‘जीआय’चे अधिकृत ब्रॅंडींगकोविड महामारीनंतर जागतिक बाजारातही खूप उलटफेर...
अमळनेरच्या भाजी बाजारात शेतकऱ्यांकडून...अमळनेर, जि.जळगाव ः येथील मासळी बाजारानजीकच्या...
लाच घेताना कृषी विद्यापीठातील लिपिकाला...नगर : कोरोना पुणे सेवानिवृत्तीची कागदपत्रे...
राज्यात पीक नुकसान ५० लाख हेक्टरच्या...पुणे: राज्यात खरीप पीक नुकसानीची माहिती गोळा...
जुन्या निकषांनुसार कामाला विमा...जळगाव: जुन्या निकषानुसार केळी पिकासाठी काम...
शेती, जलसंधारण, सामाजिक कार्यात...पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केंदूर (ता....
किती अन् काय सांगावं...हात टेकलेत आमचेजालना : कुणाला किती अन् काय सांगावं...सततच्या...
पावसामुळे शेतीकामात अडथळे पुणे ः परतीच्या पावसाचा दणका अजूनही सुरूच आहे....
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागात चक्रीय...
बुडून गेलं रान देवा, वाहून गेलं शिवार...कोल्हापूर : उसवलं गणगोत सारं, आधार कुनाचा न्हाई...