agriculture news in marathi, milk payment panding, jalna, maharashtra | Agrowon

जालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन महिन्यांपासून थकले
टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 जुलै 2019

जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता, आसई, राजूर, केदारखेडा, वरूड माहोरा व इतर गावांतील दूध उत्पादकांचे पैसे दोन महिन्यांपासून थकले आहेत. शासकीय शितकरण व संकलन केंद्राला घातलेल्या या दुधाचे पैसे त्वरित द्यावे, अशी मागणी दूध उत्पादकांनी केली. 

जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता, आसई, राजूर, केदारखेडा, वरूड माहोरा व इतर गावांतील दूध उत्पादकांचे पैसे दोन महिन्यांपासून थकले आहेत. शासकीय शितकरण व संकलन केंद्राला घातलेल्या या दुधाचे पैसे त्वरित द्यावे, अशी मागणी दूध उत्पादकांनी केली. 

आपल्या मागणीसंदर्भात दूध उत्पादकांनी सोमवारी (ता. १५) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर केले. पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला. तरीही जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे चारा-पाण्याची स्थिती गंभीर आहे. यातच पशुधन जगवून दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे पैसे मागील दोन महिन्यांपासून शासकीय दूध शीतकरण केंद्राकडे थकले आहेत. ही रक्कम तब्बल साडेतीन कोटींवर असल्याचे दूध उत्पादकांचे म्हणणे आहे. 

माहोरा व जालना शासकीय दूध शीतकरण केंद्रात ४० सहकारी संस्थांमार्फत रोज दुधाचे संकलन केले जाते. सध्या २२ ते २३ हजार लिटर दुधाचे संकलन होते. विशेष म्हणजे शासकीय नियमानुसार दहा दिवसांमध्ये दुधाचे पैसे देणे अपेक्षित असते; मात्र शासनस्तरावरूनच या नियमाला हरताळ फासण्याचे काम केले जात असल्याची दूध उत्पादकांची तक्रार आहे. 

सरकी पेंढीचे दर ३५ रुपये प्रतिकिलो, मका २३ ते २४ रुपये प्रतिकिलो, कडब्याची पेंढी ४० रुपये, मिनरल मिक्‍श्‌चर व कॅल्शिअम खर्च प्रतिदिन साधारण ३० रपये होतो. एका दुधाळ गायीला प्रतिदिन साडेपाचशे रुपये जवळपास खर्च करावे लागतात. दुसरीकडे मिळणारे दूध उत्पादन व त्याला कवडीमोल असा १२ रुपये लिटरप्रमाणे मिळणारा दर, यामुळे दरदिवशी शेतीपूरक उद्योगात शेतकऱ्यांना घाटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे दुग्धव्यवसाय करणारे शेतकरी आर्थिक संकटात आहेत. 

पशुधनासाठी लागणारा खर्च पाहता शासनाने दुधाला १ जानेवारी २०१९ पासून किमान ३५ रुपये लिटर भाव द्यावा. यापुढे प्रत्येक दहा दिवसाला दूध उत्पादकांना पैसे मिळण्याची सोय करावी. अन्यथा, पशुपालक व दूध उत्पादक शेतकरी आपल्या मागण्यांसाठी गावातील प्रत्येक ग्रामपंचायतींसमोर उपोषणास बसतील, असा इशारा शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
उत्तर भारतात अतिदक्षतेचा इशारा; नद्या...नवी दिल्ली : दक्षिण भारतानंतर आता उत्तर भारतही...