agriculture news in Marathi, milk plant owner not giving 25 rupees rate, Maharashtra | Agrowon

दूध दरवाढीचा फज्जा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

शासन निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास; तसेच शब्द फिरवल्यास गणेशोत्सवापूर्वीच पुन्हा एकदा आंदोलनाचा भडका उडेल, याची जाणीव शासनाने ठेवावी. ठरल्यानुसार दर देण्याची जबाबदारी स्वीकारावी.
- रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

पुणे ः राज्यातील दूध उत्पादकांना प्रतिलिटर २५ रुपये वाढीव दर देण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र, आज दहा दिवसांचा कालावधी उलटला असूनही राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संघांकडून टोलवाटोलवी सुरू आहे. त्यामुळे राज्यात दूध दरवाढीच्या निर्णयाचा फज्जा उडाला आहे. 

शासनाने उत्पादकांना गाईच्या दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दर देण्याचे आदेश दूध संघांना दिले. मात्र, अद्याप दूध उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढीतील एकही रुपया मिळत नसल्याची बाब अनेक ठिकाणी समोर अाली अाहे. मात्र, शासनाकडूनच अद्याप आमच्याकडे दराविषयी काहीच आलेले नाही, त्यामुळे आम्ही दर देऊ शकत नाही, असे दूध संघांकडून सांगितले जात आहे. तसेच, २० जुलै रोजी शासनाने काढलेल्या परिपत्रकातील त्रुटी दुरुस्ती करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. दूध दर कसा द्यायचा, यावरच दुग्धविकास विभाग गोंधळात आहे. खासगी डेअरी चालकांकडूनही दूध उत्पादकांना वाढीव दर कधी देणार याबाबत ठोस सांगितले जात नाही.

सोलापूर जिल्ह्यात फॅट, एसएनएफनुसार १७ ते २० रुपयांच्या आतच दर मिळतो आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्येही दूध संघ शासन आदेशाप्रमाणे दर देत नाहीत. नगर जिल्ह्यात कोठेही २५ रुपये दराने दुधाची खरेदी सुरू झाली नाही. वऱ्हाडात मदर डेअरीकडून गाईच्या दुधाला ३.५ फॅट (८.५ एसएनएफ)साठी २१ रुपये ७० पैसे, तर जळगाव जिल्ह्यातील डेअरी याच फॅटसाठी २५ ते २६ रुपये दर देत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

खानदेशात गाईच्या दुधाला २१ रुपयांपर्यंत दर मिळत आहे. मात्र, संघांना शासनाचा आदेश मिळाला असून, उत्पादकांना २५ रुपये दर देत नाहीत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मराठवाड्यात ३.५ फॅट्‌स व ८.५ एसएनएफ असलेल्या दुधाला १९ ते २० रुपये प्रतिलिटरपुढे दर मिळाला नसल्याची माहिती उत्पादकांनी दिली. तर, एक ऑगस्टपासून अंमलबजावणी होणे अपेक्षित असल्याचे दूध संघाच्या सूत्रांनी सांगितले.

 


इतर अॅग्रो विशेष
सांगलीत तूर खरेदी ठप्पसांगली ः जिल्ह्यात हेक्टरी २५७ किलोच तूर खरेदी...
राज्यात गारठा वाढलापुणे  : उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह...
चीनला द्राक्ष निर्यात सुरूसांगली ः जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या...
‘लिंकिंग’बाबत कंपन्यांना नोटिसापुणे  : रासायनिक खतांच्या बाजारपेठेत होत...
बाजार समित्यांच्या निवडणुका होणार...मुंबई  ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार...
भाजीपाला शेतीतून पेलल्या साऱ्या...लग्नानंतर अवघ्या तीन वर्षातच पतीच्या निधनामुळे...
कांद्यावरील निर्यातबंदी हटविली;...नवी दिल्ली : चार महिन्यापूर्वी कांद्यावर...
सूक्ष्म सिंचन योजनेचा सात वर्षानंतर...अकोला ः सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना...
कोल्हापुरातील गूळ हंगाम अंतिम टप्प्यातकोल्हापूर : यंदाचा गूळ हंगाम अंतिम टप्प्यात येत...
पाणीवापराचे तंत्र समजून निर्यातक्षम...सिंचन व्यवस्थापन हा प्रयोगशील व प्रगतिशील शेतीतील...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमानातील वाढीबरोबरच किमान...
थेट सरपंच निवड रद्दमुंबई: थेट सरपंच निवड रद्द करणारे विधेयक मंगळवारी...
निर्यात न करणाऱ्या कारखान्यांच्या साखर...कोल्हापूर : देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; ६८...मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री...
राज्यात उन्हाचा चटका कायम पुणे : राज्याच्या हवामानात वेगाने बदल होत आहेत....
‘पीएम-किसान’ योजनेत शेतकऱ्यांना ५१ हजार...नवी दिल्ली: केंद्र सरकारने गेल्या वर्षी पंतप्रधान...
शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांचा गदारोळ मुंबई: शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारने एकही आश्वासन...
खारपाणपट्ट्यात पिकले गोड अॅपेल बोरअंधेरा कितना भी घना क्यू ना हो, दिया जलाना कहाँ...
कृषी शिक्षणाचा खर्चही आता लाखाबाहेर पुणे : राज्यातील खासगी कृषी शिक्षण संस्थांच्या...
निवृत्त जवानाचा अनुकरणीय शेळी-...सुर्डी (जि. सोलापूर) येथी हिरोजीराव शेळके यांना...