agriculture news in marathi, Milk powder to get per liter 3 rupees subsidy | Agrowon

भुकटीसाठीच्या दुधाला प्रतिलिटर ३ रुपये अनुदान
टीम अॅग्रोवन
बुधवार, 9 मे 2018

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दूध भुकटी तयार करणाऱ्या सहकारी, खासगी दूध संघांना प्रतिलिटर ३ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील ३० दिवसांसाठी करण्यात येणार असून, त्यापोटी सुमारे ३२ कोटी रुपयांचा बोजा राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी (ता.८) हा निर्णय घेण्यात आला. 

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दूध भुकटी तयार करणाऱ्या सहकारी, खासगी दूध संघांना प्रतिलिटर ३ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील ३० दिवसांसाठी करण्यात येणार असून, त्यापोटी सुमारे ३२ कोटी रुपयांचा बोजा राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी (ता.८) हा निर्णय घेण्यात आला. 

राज्यात सध्या अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, सध्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारात दुधाच्या भुकटीचे दरही कोसळले आहेत. त्याचा परिणाम दूध खरेदी दरावर होऊन संघ शेतकऱ्यांना कमी दर देत आहेत. याचा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे गेले काही दिवस राज्यात मोफत दूध वाटप आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

त्यासाठी राज्यातील सहकारी, खासगी दूध संघांना मार्च २०१८ या महिन्यात उत्पा.िदत भुकटीपेक्षा २० टक्के अधिकची दूध भुकटी बनवावी लागणार आहे. त्यानंतरच त्यांना हे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील ३० दिवसांसाठी केली जाणार आहे. सध्या दररोज सुमारे ३६ लाख लिटर दुधापासून भुकटी तयार केली जाते. त्यापोटी शासनाकडून सुमारे ३२ कोटी रुपयांचे अनुदान संघांना दिले जाणार आहे. महिनाभरानंतर कृषकाळात दुधाचे अतिरिक्त उत्पादन घटून दूध दर पूर्ववत होतील, असा अंदाज आहे. 

मार्च महिन्यात उत्पा.िदत केलेल्या दूध भुकटीपेक्षा किमान २० टक्के अधिक दूध भुकटीचे उत्पादन केल्यानंतर याचा थेट लाभ दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या दूध खरेदीवर होणार असल्याने त्यांचेही हित साधले जाणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे या निर्णयामुळे दूध उत्पादकांना दिलासा मिळेल, असे सरकारचे म्हणणे आहे. यापूर्वी सन २०१२-१३ या वर्षात राज्य सरकारने दूध भुकटीसाठी अनुदान दिले होते. तेव्हा प्रतिलिटर दोन रुपये अनुदान देण्यात आले होते.

भुकटीसाठी प्रतिलिटर दुधाला ३ रुपये २४ पैसे तोटा
३१ मार्चअखेर राज्यात २६,५०६ मेट्रिक टन भुकटीचा साठा शिल्लक आहे. राज्यात महिन्याला सुमारे दहा हजार मेट्रिक टन भुकटी तयार होते. २१ खासगी आणि ७ सहकारी दूध संघ दुधापासून भुकटी तयार करतात. सध्या यापैकी २० संघच प्रत्यक्षात कार्यरत आहेत. भुकटीचे दर पडल्यामुळे दूध खरेदी करून त्यापासून भुकटी बनवण्यासाठी संघांना प्रतिलिटर दुधाला ३ रुपये २४ पैसे इतका तोटा होतो, असे दूध संघांनी राज्य सरकारच्या निदर्शनाला आणले आहे. १०० लिटर दुधापासून साडेआठ किलो भुकटी आणि ४ किलो २०० ग्रॅम लोणी तयार होते. त्यामुळे दूध भुकटी बनवताना लागणाऱ्या दुधासाठी प्रतिलिटर ३ रुपये इतके प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

३३ कोटी रूपये अनुदान देणार
राज्यात सध्या निर्माण झालेल्या दूध दराच्या प्रश्‍नावर उपाय म्हणून दूध पावडर तयार करणाऱ्या प्रकल्पांना दूध रुपांतरणासाठी प्रतिलिटर तीन रुपये इतके अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील जवळपास ४४ लाख लिटर दूध पावडरच्या रुपांतरणासाठी ३३ कोटींचे अनुदान सरकार देणार आहे. राज्यातील खासगी १४ आणि सहकारी ६ दूध पावडर प्रकल्पांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. २०१२ मध्ये त्यावेळच्या सरकारने प्रतिलिटर २ रुपयांचे अनुदान दिले होते. आम्ही ते ३ रुपये केले आहे. निश्‍चितच या प्रकल्पांना योग्य ते साह्य मिळताना दूध उत्पादकांना योग्य तो दर देण्याबाबत कार्यवाही होण्यास मदत होणार आहे. पण त्यानंतरही दूध दरासाठी या संस्था दूध उत्पादकांची अडवणूक करणार असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. 
- महादेव जानकर, मंत्री, पशुसंवर्धन व दुग्ध विकास

इतर अॅग्रो विशेष
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...
‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...
चिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...
ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...
पीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...
कमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
मराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...
मराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...
मराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...
बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...
।। जातो माघारी पंढरीनाथा । तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...