agriculture news in Marathi, milk powder subsidy proposal rejected, Maharashtra | Agrowon

दूध पावडर अनुदानाचा प्रस्ताव फेटाळला
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

पुणे : राज्यातील दूध पावडर (भुकटी) प्रकल्पांना पावडर निर्यातीसाठी प्रतिकिलो ५० रुपये देण्याचा प्रस्ताव अखेर फेटाळण्यात आला आहे. दुग्धविकास मंत्रालयांच्या अखत्यारीत नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीने हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

पुणे : राज्यातील दूध पावडर (भुकटी) प्रकल्पांना पावडर निर्यातीसाठी प्रतिकिलो ५० रुपये देण्याचा प्रस्ताव अखेर फेटाळण्यात आला आहे. दुग्धविकास मंत्रालयांच्या अखत्यारीत नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीने हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

दूध पावडरला भाव नसल्यास, भरपूर साठे असल्यास किंवा निर्यात घसरल्यास पावडर प्रकल्पांकडून उत्पादन कमी केले जाते. त्याचबरोबर दुधाचे भाव देखील कमी केले जातात. त्यामुळे बाजारात स्वस्त दूध होते. परिणामी इतर सहकारी संघ किंवा खासगी डेअरीचालक देखील शेतकऱ्यांच्या दुधाचे खरेदी दर कमी करतात. गेल्या वर्षी दूध खरेदीचे भाव कोसळून १५ ते १८ रुपये प्रतिलिटरपर्यंत आले होते. त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने दूध पावडरला निर्यात अनुदान देण्याचे जाहीर केले होते. 

‘‘पावडर निर्यातीसाठी प्रोत्साहनपर प्रतिकिलो ५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय जुलै २०१८ मध्ये घेण्यात आलेला होता. मात्र, याचवेळी राज्यात दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची योजना देखील सुरू होती. पाच रुपये अनुदान योजनेचा लाभ संबंधित प्रकल्पांनी घेतलेला आहे. त्यामुळे एकाच मुद्द्यासाठी दोन वेळा अनुदान देता येत नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. 

राज्यात पावडरचे २५-३० प्रकल्प आहेत. मात्र, निवडक पाच प्रकल्पांकडून पावडर उद्योगाची सूत्रे हलविली जातात. दूध विकत घेतल्यानंतर त्याचे पुन्हा पावडरमध्ये रूपांतर किती होते, त्या दुधासाठी किती दर दिला जातो यावर शेतकरी वर्गाच्या दूध खरेदीचे दर ठरतात. तसेच, पिशवीबंद दुधाची विक्री करणारे खासगी प्लान्टचालक तसेच पावडर प्लान्टचालक कशा प्रकारे दुधाचे दर देतात हे पाहूनच राज्यातील सहकारी दूध संघ शेतकऱ्यांच्या दुधाचे खरेदीदर निश्चित करतात. 

दूध पावडर निर्यातीचे प्रोत्साहन अनुदान नाकारले गेल्याने या प्रकल्पांना किमान ४१ कोटी रुपये मिळणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पावडरला अनुदानासाठी या प्रकल्पांनी मंत्रालयात चांगलाच रेटा दिला होता. त्यामुळे दुग्धविकास मंत्रालयाचे प्रधानसचिव अनुपकुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती स्थापन करण्यात आली होती. दुग्धविकास आयुक्त नरेंद्र पोयाम, उपायुक्त व्ही. बी. काजळे, उपसचिव राजेश गोविल तसेच कार्यसन अधिकारी श्रीमती एस. एम. चव्हाण यांचा समावेश या समितीत होता.

‘‘प्रतिलिटर पाच रुपये दूध अनुदान दिले जाईल ही वेगळी सवलत जाहीर केले गेली होती, तसेच प्रतिकिलो ५० रुपये दूध पावडर निर्यात अनुदान मिळेल, अशी देखील धोरणात्मक बाब जाहीर केली गेली होती. तथापि, या दोन सवलतींपैकी कोणत्या तरी एकाच योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे निर्णयात नमूद केले आहे. त्यामुळे पावडर निर्यात अनुदान मंजूर करता येत नाही,’’ असा निष्कर्ष समितीने काढला. 

अर्थ नियंत्रकांनी दिला नकारात्मक अहवाल
राज्यातील दूध प्रकल्पांना या दोन प्रकारच्या सवलती देण्याबाबत जुलै २०१८ योजना जाहीर झाली. मात्र, या दोन्ही सवलतींचा लाभ एकत्र देता येईल, असे कुठेही नमूद केले गेले नव्हते. त्यामुळे आधीच एका योजनेचा फायदा घेतल्यानंतर पुन्हा निर्यात प्रोत्साहन अनुदान मंजूर करावे की नाही, हा पेच तयार झाला होता. दुग्ध आयुक्तालयाचे अर्थ नियंत्रक अनुदीप दीघे यांच्यासमोर यातील मुद्दे मांडले गेले.  अर्थ नियंत्रकांनी या प्रस्तावाचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी देखील निर्यात अनुदान देता येत नसल्याचा अभिप्राय दिला. 

. . . . . .

इतर अॅग्रो विशेष
औरंगाबाद : केंद्रीय पथकाने अनुभवली पीक...औरंगाबाद  : मराठवाड्यात केंद्राच्या...
‘कोरडवाहू’चे वैचारिक सिंचनकोरडवाहू (जिरायती) शेती समस्यांबाबत दोन दिवसांचे...
पीकविम्या वरून शेतकऱ्यांनी केंद्रीय...अमरावती  ः पीकविमा हप्ता भरायची जशी सक्‍ती...
बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निधी शेतकरी...मुंबई  : लवकरच राज्यात सत्तेवर येणाऱ्या...
बोगस खतांची तक्रार केली होती : मिश्रखत...पुणे: राज्यात काही भागांमध्ये मिश्रखताचे बोगस...
संपूर्ण कर्जमाफीसाठी लागणार 'एवढी'...सोलापूर : मागील दोन वर्षांत दुष्काळ, पूर,...
कृषी कर्मचाऱ्यांवर दबाव कुणासाठी?पुणे : राज्याच्या कृषी विभागाकडून गेल्या काही...
केंद्र शासनाचे आदेश धाब्यावरपुणे : मिश्रखतांमधील बोगस उत्पादनाला पायबंद...
ढगाळ हवामानामुळे गारठा कमीपुणे: ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होऊन...
टेरेसगार्डनवर विषमुक्त फळे-भाज्यांची...रासायनिक अवशेषमुक्त अन्नाची निर्मिती हाच एकमेव...
रब्बी पिकांना 'इथे' आहे टोळधाडीचा धोका !नवी दिल्ली: देशात मॉन्सूनचा परतीचा प्रवास...
एकत्र कुटूंब कसतेय शेती, नियोजनातून...अविरत कष्टांची तयारी, एकत्रित कुटूंब पध्दतीमुळे...
संघर्षमय हंगामगेल्या वर्षीच्या गळीत हंगामात राज्यात विक्रमी...
द्राक्ष शेतीला चालना कशी मिळेल?संपूर्ण भारत देशामध्ये द्राक्ष लागवड १.३९ लाख...
जमिनीच्या सुपीकतेतील गांडुळांचे योगदानजगभरामध्ये हजारो जातीची गांडुळे अस्तित्वात असून,...
ईशान्यकडील राज्ये का नाकारतात...कोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने...
जळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली...जळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (...
केंद्रीय पथक आज करणार पीकहानीची पाहणीपुणे ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे राज्यात शेतीच्या...
‘दाणेदार’ खताच्या मागे ‘मालदार’ हालचालीपुणे : राज्यात १९७० ते २००० या तीन दशकांमध्ये...
योजना, निधीची कमी नाही, मग शेतीचे प्रश्...औरंगाबाद : योजना, निधी, यंत्रणा, सुविधा,...