Agriculture news in Marathi Milk price cut again by Rs 2 | Agrowon

दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपात

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 मे 2021

कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन कायम असून दुधाची मागणी कमी होत असल्याचे कारण सांगत दूध संघाकडून दुधाच्या दरात सातत्याने कपात केली जात आहे.

नगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन कायम असून दुधाची मागणी कमी होत असल्याचे कारण सांगत दूध संघाकडून दुधाच्या दरात सातत्याने कपात केली जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून दुधाच्या दरात पुन्हा दोन रुपयांनी कपात केली आहे.

कमीशन व वाहतुकीसह २२ ते २३ रुपये दिले जात असल्याने शेतकऱ्यांच्या हातात आता प्रति लिटरला केवळ २१ रुपये पडणार आहेत. त्यामुळे दर दिवसाला बसणाऱ्या आर्थिक नुकसानीतही अडीच कोटी रुपयांनी भर पडली आहे. सध्या राज्यात दर दिवसाला तेरा कोटींपेक्षा दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनामुळे वरचेवर दूध व्यवसाय अडचणीत येत आहे.

लॉकडाउन होणार असल्याचे दिसताच खासगी दूध संघचालकांनी मागणी घटल्याचे सांगत दुधाच्या दरात १ एप्रिलपासून सुरुवातीला तीन ते चार रुपयांनी कपात केली. त्यानंतर त्यात टप्प्याटप्प्याने कपात करत दीड महिन्यात आता प्रति लिटरमागे तब्बल दहा ते अकरा रुपयांनी कपात केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून कमिशन व वाहतुकीसह २२ ते २३ रुपये दिले जात असल्याने शेतकऱ्यांच्या हातात आता प्रति लिटरला केवळ २१ रुपये पडत आहेत. दोन रुपयांनी दरात कपात केल्याने आर्थिक नुकसानीत अडीच कोटीने वाढ झाली आहे. आता राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दररोज १३ कोटींपेक्षा अधिक नुकसान सोसावे लागत आहेत. राज्यात गायीचे १ कोटी ३० लाख लिटरच्या जवळपास संकलन होते. या आकड्यात सातत्याने कमी-जास्त होते. त्यातील ६० ते ६५ लाख लिटर दूध थेट ग्राहकांना पिशव्यांमधून विकले जाते तर साधारण पंधरा ते वीस लाख लिटर दुधाचे उपपदार्थ केले जातात. उर्वरित दुधाची भुकटी होते.

दूध भेसळीकडे दुर्लक्ष ः जयाजी सूर्यवंशी
शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी म्हणाले, ‘‘राज्यात दूधप्रश्‍नासोबत दुधात होणाऱ्या भेसळीकडेही सरकारचे कायम दुर्लक्ष राहिले आहे. सध्या दुधाची मागणी कमी झाल्याने दराचे प्रश्‍न निर्माण केला जात आहे. मात्र दुधातील होणारी भेसळही शेतकऱ्यांच्या मुळावर आहे. दुधातील भेसळ कमी झाली तरी बऱ्यापैकी दूधदराचा प्रश्‍न कमी होईल. मात्र सरकारी आणि खासगी दूध संघाचे मालक मागील सरकारमध्ये होते, याही सरकारमध्ये आहेत. २०१७ च्या शेतकरी संपात दुधाला ४० रुपये हमी भाव मागितला, पण त्यावर एकमत झाले नाही. दूध संघापुढे जाणकार हताश झाले होते. त्या वेळेस २७ रुपये दर देण्याचा एकमुखी निर्णय झाला, परंतु नंतर सुकाणू समिती आली तो निर्णय गुंडाळला.

शेतकरी नेते गप्प
राज्यात दूधदराचा प्रश्‍न अधिक किचकट होत आहे. गेल्या दीड महिन्याचा विचार केला तर गाईच्या दुधाच्या दरात प्रति लिटरमागे तब्बल दहा रुपयांनी कपात झाली आहे. दुधाचे दर कमी झाल्याने राज्यभर दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे. ग्राहकांना विकल्या जाणाऱ्या दुधाचे व उपपदार्थांचे दर कायम असताना शेतकऱ्यांकडून खेरदी केलेल्या दुधाचे दर मात्र मागणी नसल्याचे कारण पुढे करून संघानी कमी केले. गेल्या वर्षी तरी अतिरिक्त दूध खरेदी करण्याचा सरकारने निर्णय घेतला होता. यंदा मात्र तो तसा कोणताही प्रयत्न झाला नाही. दूध संघचालक मात्र वाटेल तसे सोयीने दर कमी करत आहेत. नेहमी दुधाच्या प्रश्‍नावर आवाज उठवणारे राज्यभरातील नेते गप्प आहेत.


इतर ताज्या घडामोडी
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...
खानदेशात अनेक भागांत पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. १६) अनेक भागांत...
दूध दरवाढीसाठी पुणे जिल्ह्यात निदर्शनेपुणे : लॉकडाउनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत...
खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर...वाशीम : जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद...
शेतकरी कंपन्यांसाठी अर्थसंकल्पाची गरजशेतकरी कंपनी सुरू करण्यापूर्वी जसे व्यवसायाची...
खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी...माती परीक्षणाच्या आधारावर पिकांना द्यावयाची...
सोयाबीन पिकावरील खोडमाशीचे एकात्मिक...खोडमाशीच्या अळ्या प्रथम पाने पोखरून पानांच्या...
तंत्र तीळ लागवडीचेतीळ पीक आपत्कालीन पीक, आंतरपीक व मिश्र पीक म्हणून...
खानदेशात कांदा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-...
नऊ कृषी सहायकांकडे १०४ गावांची जबाबदारीबुलडाणा ः राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या...
पावसाअभावी विदर्भात तीन टक्के...नागपूर : पेरणी योग्य पाऊस न झाल्यामुळे विदर्भात...
आरक्षणाबाबत लोकप्रतिनिधींनी आपली...कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी आजपासून (ता. १६)...
‘मिहान’मध्ये गुंतवणूक वाढविण्याची ...नागपूर : विदर्भाचे भविष्य बदलविणारा मिहान प्रकल्प...
मेळघाटातील गावाला होणार सौरऊर्जेचा...अमरावती : धारणी तालुक्यातील चोपण या दुर्गम गावात...
सोलापुरात खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी...सोलापूर : जिह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक...
मुसळधार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला...सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग तिसऱ्या...
केंद्राने साखर निर्यातीसाठी अनुदान...शिराळा, जि. सांगली : केंद्र शासनाने साखर निर्यात...
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उसंतपुणे : पुणे जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...