Agriculture news in marathi Milk price hike persists in Jalgaon district | Agrowon

जळगाव जिल्ह्यात दूध दरवाढीचा तिढा कायम 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 30 एप्रिल 2020

जळगाव : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउनच्या काळात संघाकडे अतिरिक्त दूध खरेदी करण्यात आले. जिल्ह्यातील उत्पादकांच्या आर्थिक हिताचा विचार करून संघाने दूध खरेदी बंद न करता सुरूच ठेवली आहे. या शिवाय शासनाने जाहीर केलेल्या दरानुसारच दूध खरेदीही सुरू आहे. अशा कठीण परिस्थितीत आर्थिक क्षमतेबाहेर अवास्तव दूध खरेदीच्या दराची मागणी संघास न पडवणारी आहे, असे जिल्हा दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी स्पष्ट केले आहे. 

जळगाव : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउनच्या काळात संघाकडे अतिरिक्त दूध खरेदी करण्यात आले. जिल्ह्यातील उत्पादकांच्या आर्थिक हिताचा विचार करून संघाने दूध खरेदी बंद न करता सुरूच ठेवली आहे. या शिवाय शासनाने जाहीर केलेल्या दरानुसारच दूध खरेदीही सुरू आहे. अशा कठीण परिस्थितीत आर्थिक क्षमतेबाहेर अवास्तव दूध खरेदीच्या दराची मागणी संघास न पडवणारी आहे, असे जिल्हा दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी स्पष्ट केले आहे. 

पाचोरा व भडगाव तालुक्‍यातील दूध उत्पादकांनी दूध खरेदी दरात वाढीची मागणी केली आहे. याबाबतचे वृत्त सकाळमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याबाबत जिल्हा दूध संघाचे कार्यकारी संचालक श्री. लिमये यांनी खुलासा दिला आहे. यात त्यांनी म्हटले आहे, की लॉकडाउनच्या वेळी संघाकडे सुमारे ३.५० लाख लीटर प्रतीदिन दूधाचे संकलन केले जात होते. त्याचप्रमाणे दूध विक्री सुमारे दोन लाख लीटर वरून प्रतिदिन एक लाख लीटर होत आहे. 

पर्यायाने संघाकडे दररोज अडीच लाख लीटर दूध अतिरिक्त होते. संघाची दूध रूपांतरण क्षमता सुमारे एक लाख लीटर प्रतिदिन आहे. सुमारे दीड लाख प्रतिदिन दूध अतिरिक्त साठा तयार होत होता. संघाकडे बाहेर दूध रुपांतरासाठी पाठविण्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. बाहेरील प्लॅंट सुद्धा संघाचे दूध रूपांतरणासाठी स्वीकारण्यास तयार नव्हते. परिणामी, या कालावधीत एक दिवस दूध खरेदीही बंद करावी लागली होती. आज सुद्धा कोणतीही परिस्थिती सुधारलेली नाही. 

संघाने उत्पादकांच्या आर्थिक हिताचा विचार करता दूध संकलन बंद केलेले नसून दूध रूपांतरण करण्याच्या कामात यश मिळविले आहे. संघाने रूपांतरित केलेली दूध भुकटी व लोणी याचे भविष्यात मार्केटमध्ये विक्री दर काय राहतील, तसेच सदरच्या मालाची विक्री केंव्हा होईल याचा आज तरी अंदाज करणे अश्‍यक्‍य आहे. संघाने दूध खरेदीचे पैसे वेळेवर द्यावे, यासाठी एनडीडीबीकडून सुमारे ४५ कोटीचे कर्ज घेतले असून पुन्हा ३० कोटीसाठी अर्ज केला आहे. 

जिल्हा दूध संघ गाईच्या दुधासाठी २५.२० पैसे दर अदा करीत आहे. राज्यातील इतर दूध संघ अनेक अटीशर्तीस अधीन राहून २० ते २५ रूपये प्रति लीटर दराने दूध खरेदी करीत आहे. राज्यातील दूध संघाची शिखर संस्था महानंद डेअरीनेही गाईचे दूध खरेदी २५ रूपये प्रतिलिटर निर्धारित केले आहे. तेच दर शासनानेही जाहीर केले आहे. पशुखाद्य दरात कोणतीही घट झालेली नाही, असे सांगण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...