वऱ्हाडात दूधाचे दर स्थिर

अकोला ः या भागातील दूध संघ डबघाईस आल्याने दूध उत्पादकांना प्रामुख्याने खासगी डेअरींचा मोठा आधार आहे. दूध संघाचे जेमतेम संकलन सुरू असून अकोल्यात पुरेसे दूध आले तरच स्वीकारले जाते. यामुळे उत्पादकांना मोठी झळ सहन करावी लागत आहे.
Milk prices stable in Varhad area
Milk prices stable in Varhad area

अकोला ः या भागातील दूध संघ डबघाईस आल्याने दूध उत्पादकांना प्रामुख्याने खासगी डेअरींचा मोठा आधार आहे. दूध संघाचे जेमतेम संकलन सुरू असून अकोल्यात पुरेसे दूध आले तरच स्वीकारले जाते. यामुळे उत्पादकांना मोठी झळ सहन करावी लागत आहे.

जिल्हा दूध संघाकडून गायीच्या दुधाला ३.५ साठी २५ रुपये तर म्हशीच्या ६.० साठी ३४ रुपये दर दिला जातो. दहा दिवसांनंतर चुकारे करण्याचे धोरण आहे. अनुदान रखडले तर हे चुकारे लांबतात. अकोला-वाशीम जिल्ह्यात जिल्हा दूध संघाचे काम चालते. अकोल्यात असलेला प्लँट गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने येथील दूध अमरावतीला पाठविले जाते. यासाठी पुरेशा प्रमाणात दूध आले तरच संघ शेतकऱ्यांकडून स्वीकारतो व पुढील प्रक्रियेसाठी पाठवितो. याचा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.

बुलडाणा जिल्ह्यात दर स्थिर जिल्हा संघ डबघाईस आलेला असल्याने या जिल्ह्यातील दूध उत्पादकांची संपूर्ण मदार ही खासगी डेअरी तसेच आता मदर डेअरीच्या संकलनावर अवलंबून आहे. या डेअरींकडून दरांमध्ये काहीही कपात करण्यात आलेली नाही. पूर्वीसारखे दर दिले जात आहेत. जिल्ह्यात प्रामुख्याने जळगाव व नगर जिल्ह्यातील खासगी डेअरी व दिल्लीच्या मदर डेअरीचे संकलन सुरू आहे. या डेअरींकडून अद्याप दरांमध्ये कुठलीही कपात झालेली नसल्याची माहिती दूध उत्पादकांनी दिली.

अकोला जिल्हा दूध संघाचे दर
३.५ साठी गायीच्या दुधाला २५ रुपये
६.० साठी म्हैशीच्या दुधाला ३४ रुपये
बुलडाणा जिल्ह्यात मदर डेअरीचा दर
३.५ साठी गायीच्या दुधाला २७ रुपये
६.० साठी म्हैशीच्या दुधाला ३६ रुपये
बुलडाणा जिल्ह्यात खासगी डेअरींचे दर
गायीचे दूध २७ रुपये
म्हशीचे दूध ४० रुपये प्रतिलीटर
या भागातील दुधाचे दर कमी झालेले नसले तरी आहे तेवढेच स्थिर ठेवण्यात आले आहेत.
म्हशी ६.० ३४
गाय ३.५ २५
खासगी डेअरी  ६.५० फॅट

बुलडाणा जिल्ह्यात आमच्या भागात गायीच्या दुधाला ३.५ व ८.५ साठी २५ रुपये, तर म्हशीच्या दुधाला ६.० आणि ९.० साठी ३६ रुपये दर मिळत आहेत. खासगी डेअरी गायीच्या दुधाला २७ रुपये तर म्हशीला ४० रुपये दर देत आहे.  पशुखाद्य ५० किलोला १२०० ते १३०० रुपये द्यावे लागत आहेत. - अमोल खर्चे, आडविहिर, ता. मोताळा, जि. बुलडाणा

वाशीम जिल्ह्यात बाराही महिने संकलन होत नाही. शासकीय संकलन उन्हाळ्यात बंद होते. अधिकाऱ्यांकडून डेअरींना पाठबळ मिळत नाही. जे लोक या व्यवसायात काही काम करतात त्यांना अनेक अडचणी आहेत. दुसऱ्या राज्यात ज्या पद्धतीने एसएनएफमध्ये सूट दिली जाते त्या पद्धतीने राज्यात संकलन सुरू होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात नियमित संकलनाअभावी दोन्ही वेळेचे दूध एकत्रित करावे लागते. अनेकदा हे दूध खराब झाल्याने नाकारले जाते. - मनोज जाधव, दूध व्यावसायिक, रिसोड जि. वाशीम

अकोला येथील संघाचा प्लँट बंद पडल्याने येथील संकलित दूध अमरावतीला नेले जाते. स्थानिक दूध पुरेशा प्रमाणात आले तर संघाकडून स्वीकारले जाते. अन्यथा शेतकऱ्यांना परत न्यावे लागते. सोमवारी (ता. १३) सकाळी मी दूध घेऊन गेलो. परंतु इतरांचे दूध न आल्याने मला परत न्यावे लागले. जर दूध आले तर आपणास संपर्क साधून दूध आणण्याबाबत सांगितले जाईल, असे कळविण्यात आले. असे प्रकार टाळण्यासाठी ठोस उपाययोजना शासनाने केल्या पाहिजेत. तरच दूध उत्पादक टिकू शकेल.    - मोहन देशमुख, दूध उत्पादक, पिंपळखुटा, ता. पातूर जि. अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com