agriculture news in Marathi, Milk procurement increased by seven lakh 89 thousand liters | Agrowon

परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार लिटरने वाढ
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 एप्रिल 2019

परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत यंदाच्या मार्च महिन्यात दररोज सरासरी ६४ हजार २१ लिटर याप्रमाणे एकूण १९ लाख ८४ हजार ६३६ लिटर दूध संकलन झाले आहे. गतवर्षीच्या (२०१८) मार्च महिन्याच्या तुलनेत यावर्षीच्या मार्च महिन्यातील दूध संकलनात ७ लाख ८९ हजार १४८ लिटरने वाढ झाली आहे. दूध संकलनात वाढ झाल्यामुळे पाश्चेरायझेशन प्रक्रियेसाठी यंत्रसामग्री अपुरी पडत आहे. सध्या दुग्धशाळेत परभणी, पाथरी, गंगाखेड येथील आणि हिंगोली जिल्ह्यातील दूध संकलन केले जात आहे.

परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत यंदाच्या मार्च महिन्यात दररोज सरासरी ६४ हजार २१ लिटर याप्रमाणे एकूण १९ लाख ८४ हजार ६३६ लिटर दूध संकलन झाले आहे. गतवर्षीच्या (२०१८) मार्च महिन्याच्या तुलनेत यावर्षीच्या मार्च महिन्यातील दूध संकलनात ७ लाख ८९ हजार १४८ लिटरने वाढ झाली आहे. दूध संकलनात वाढ झाल्यामुळे पाश्चेरायझेशन प्रक्रियेसाठी यंत्रसामग्री अपुरी पडत आहे. सध्या दुग्धशाळेत परभणी, पाथरी, गंगाखेड येथील आणि हिंगोली जिल्ह्यातील दूध संकलन केले जात आहे.

नांदेड आणि गंगाखेड येथील शीतकरण केंद्रातील दूध उदगीर येथे पाठविले जात आहे. मार्च महिन्यात परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातून प्रतिदिन सरासरी ६४ हजार २१ लिटर एवढे दूध संकलन झाले. गतवर्षी प्रतिदिन ३८ हजार ५६४ लिटर दूध संकलन झाले होते. 

गतवर्षी मार्च महिन्यात परभणी, हिंगोली, नांदेड या तीन जिल्ह्यांचे मिळून एकूण ११ लाख ९५ हजार ४८८ लिटर दूध संकलन झाले होते. यंदाच्या मार्च महिन्यात परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यातील एकूण १९ लाख ८४ हजार ६३६ लिटर एवढे दूध संकलन झाले. परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यातील दूध संकलनामध्ये झालेली वाढ कायम आहे. त्यामुळे यंदा सकाळी आणि संध्याकाळी असे दोन वेळा दूध संकलन करावे लागत आहे. 

पाथरी येथील शीतकरण केंद्रावर सकाळी  ५ लाख २७ हजार ९३७ लिटर आणि संध्याकाळी २ लाख ७८ हजार २१४ लिटर असे एकूण ८ लाख ६ हजार १५१ लिटर दूध संकलन झाले. परभणी येथे म्हशीचे ३० हजार ५१५ लिटर आणि गायीचे ६ लाख ४५ हजार १४० लिटर असे एकूण ६ लाख ७५ हजार ६५५ लिटर दूध संकलन झाले. 

गंगाखेड येथे म्हशीचे ४७ हजार ९८९ लिटर आणि गायीचे २ लाख ९४ हजार २१२ लिटर असे एकूण ३ लाख ४२ हजार २०१ लिटर दूध संकलन झाले. हिंगोली जिल्ह्यातील म्हशीचे ३२ हजार ५५४ लिटर आणि गायीचे १ लाख २८ हजार ७५ लिटर दूध संकलन झाले.

वर्षनिहाय तुलनात्मक एकूण दूध संकलन स्थिती (लिटरमध्ये)
वर्ष दूध संकलन
२०१८ ११९५४८८
२०१९ १९८४६३६

 

इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....
नाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...
परभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...
टंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...
जालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...