'गोकुळ'कडून उद्या सकाळपर्यंत दूध संकलन बंद ठेवण्याच्या सूचना

'गोकुळ'कडून उद्या सकाळपर्यंत दूध संकलन बंद ठेवण्याच्या सूचना
'गोकुळ'कडून उद्या सकाळपर्यंत दूध संकलन बंद ठेवण्याच्या सूचना

कोल्हापूर : जिल्ह्यातील वाढती परिस्थिती पाहता गोकुळने उद्या सकाळपर्यंत दूध संकलन करू नका अशा सूचना दूध संस्थांना दिले आहेत. पुण्या-मुंबईकडे जाणाऱ्या एकवीस टँकरमधील साडेपाच लाखाहून अधिक लिटर दूध शिल्लक आहे. यातील पाच लाख दुधाचे रीप्रोसेसिंग करून त्याचे वाटप केले जाणार आहे. बुधवारी (ता.७) सकाळी अर्धा लिटरच्या पॅकिंग मधून ३०० लिटर दूध आंबेवाडी, चिखली येथे मोफत देण्यात आले. उर्वरित दूधही आवश्यकतेनुसार मोफत दिले जाणार असल्याचे गोकुळकडून सांगण्यात आले आहे.

गंभीर पूरपरिस्थितीत जिल्ह्याला पुरेल इतका दूध साठा गोकुळ कडे आहे.मात्र उद्या संध्याकाळ पर्यत पुणे मुंबई कडे दूधवाहतूक होणार नाही.त्यामुळे या शहरांना दूध टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com