दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुविधा देणार : चौधरी

दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुविधा देणार : चौधरी
दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुविधा देणार : चौधरी

नाशिक : दूध उत्पादकांसह पशूंना कमी दरात विमा उपलब्ध करून देणार आहे. यासह आगामी काळात दुधाला वाढीव दर, पशूंसाठी वैद्यकीय सुविधा यांसह विविध सुविधा देणार असल्याची घोषणा गुजरातमधील सुमुल डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक सावजीभाई चौधरी यांनी केली.  निफाड तालुक्यातील पिंपळगावनजीक येथे शनिवारी (ता. २८) जिल्ह्यातील दूध संकलन केंद्रचालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी ते बोलत होते. सुमुल डेअरीच्या वतीने ज्या योजना गुजरात राज्यात शेतकऱ्यांसाठी राबविल्या जातात. त्या योजना पुढील एक वर्षात महाराष्ट्रातदेखील लागू करणार असल्याचा मानस त्यांनी या वेळी बोलून दाखविला. शेतकऱ्यांसाठी दुधाला चांगले दर देणार असल्याचे आश्वासन त्यांनी राज्यभरातून आलेल्या दूध शीतकरण केंद्र संचालकांना दिले. दुधाला जास्तीत जास्त दर शेतकऱ्यांना देण्यात येईल. पशूंसाठी वैद्यकीय सेवा पुरविणार असून, दुधाची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल असे सांगितले.  सुमुल डेअरीने जिल्ह्यात स्वतःचा ५० टन क्षमता असलेला प्लान्ट कार्यरत असल्याने १८ लाख लिटरवरून ती २६.५ लाख लिटर स्वीकारण्याची क्षमता वाढली आहे. त्याचबरोबर हे सर्व दूध सुमुल डेअरी स्वीकारताना अमूल पॅटर्न बचत गटांतर्गत आणि ग्राहकांकडूनच दूध घेणार आहे. अमूल फेडरेशनचे रेट हे सर्व राज्यांत सारखेच असल्याने अमूल युनियनमध्ये असलेल्या इतर दूध स्वीकारणाऱ्या संस्थांनादेखील सारखाच दर मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी सुमुल डेअरीचे जनरल मॅनेजर श्री. गोगरी, दत्ता क्षीरसागर, सुनील पोळ यांसह शीतकरण केंद्रचालक, दूध उत्पादक शेतकरी आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com