agriculture news in marathi, milk producer get minimum price | Agrowon

परभणीत किमान दूधदरावरच उत्पादकांना मानावे लागते समाधान

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

परभणी ः शासकीय दुग्ध योजनेअंतर्गत परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील दूध उत्पादकांना गायीच्या दुधास प्रतिलिटर किमान २७ रुपये, तर म्हशीच्या दुधात प्रतिलिटर ३६ रुपये दर दिले जातात. शीतकरण केंद्रावर आलेल्या दुधाच्या परीक्षण चाचण्या व्यवस्थित घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दूध उत्पादकांना फॅट, एसएनएफच्या प्रमाणात जादा दर मिळत नाहीत. किमान दरावरच समाधान मानावे लागते. मापात खोट आणून वाढीव दुधाची मलई खाण्याचे प्रकार सुरू आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही सुधारणा होत नसल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

परभणी ः शासकीय दुग्ध योजनेअंतर्गत परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील दूध उत्पादकांना गायीच्या दुधास प्रतिलिटर किमान २७ रुपये, तर म्हशीच्या दुधात प्रतिलिटर ३६ रुपये दर दिले जातात. शीतकरण केंद्रावर आलेल्या दुधाच्या परीक्षण चाचण्या व्यवस्थित घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दूध उत्पादकांना फॅट, एसएनएफच्या प्रमाणात जादा दर मिळत नाहीत. किमान दरावरच समाधान मानावे लागते. मापात खोट आणून वाढीव दुधाची मलई खाण्याचे प्रकार सुरू आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही सुधारणा होत नसल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

सध्या परभणी येथील शासकीय दुग्ध शाळेत परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतून दररोज ३३ हजार लिटर दुधाचे संकलन होत आहे. परभणी येथे साठविण्याची व्यवस्था नसल्यामुळे हिंगोली, नांदेडचे दूध उदगीर येथे पाठविले जात आहे. अतिरिक्त दूध नाकारले जात आहे. त्यामुळे दूध उत्पादक संस्थासह शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
फॅट-एसएनएफचे प्रमाण ३.५-८.५ असलेल्या गायीच्या दुधास प्रतिलिटर २७ रुपये, ६.०-९० प्रमाण असलेल्या म्हशीच्या दुधास ३६ रुपये दर जात आहेत. त्यापेक्षा अधिक फॅट -एसएनएफ असल्यास पाॅइंटनुसार कमाल दर मिळू शकतात; परंतु शीतकरण केंद्रावर दुधाचे परीक्षण करताना पाॅइंट कमी करून किमान दरापर्यंत आणण्याचे गैरप्रकार घडत आहेत. फॅट, एसएनएफच्या प्रमाणानुसार योग्य दर मिळण्यासाठी शीतकरण केंद्रावर अद्ययावत दूध परीक्षण यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी. दुधाची नासाडी थांबविण्यासाठी बल्क कुलरची क्षमता वाढवावी, अशी मागणी शेतकरी, दूध उत्पादक संस्थांकडून केली जात आहे.

पहाटे लवकर दूध काढले जाते, परंतु शीतकरण केंद्र सकाळी उशिरा उघडले जातात. त्यामुळे अल्कोलच्या टेस्ट पाॅझिटिव्ह येतात. दूध परीक्षणासाठी अद्ययावत सामग्री उपलब्ध करून देत व्यवस्थित मोजमाप घेतले तर शेतकऱ्यांच्या दुधास जादा दर मिळू शकेल, असे बाभळगाव (ता. पाथरी) येथील दूध उत्पादक संस्थेचे विठ्ठल गिराम यांनी सांगितले.

शेतीपिकांचे शाश्वत उत्पन्न मिळत नसल्यामुळे शेतकरी दुग्ध व्यवसायकडे वळले आहेत; परंतु शासकीय दुग्धशाळेकडून अतिरिक्त दूध नाकारले जात आहे. त्यामुळे नुकसान होत आहे, असे जवळा बाजार (जि. हिंगोली) येथील दूध उत्पादक भगवान सावंत यांनी सांगितले.


इतर बातम्या
बुडून गेलं रान देवा, वाहून गेलं शिवार...कोल्हापूर : उसवलं गणगोत सारं, आधार कुनाचा न्हाई...
अतिवृष्टीचा मराठवाड्यात २३ लाख हेक्टरला...औरंगाबाद : यंदा खरिपात अतिवृष्टी व सततच्या...
केळी पीक विम्याबाबत आज बैठकजळगाव ः हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी...
चढ्या दराने कांदा बियाणे विक्री पडली...नाशिक : सध्या कांद्याच्या बियाण्यांचा मोठ्या...
केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांना ‘बोनस’...नवी दिल्ली : कोरोनासंकटामुळे महागाई भत्ता...
कृषी क्षेत्रात ‘पंदेकृवि’ची भरीव...अकोला ः कृषी विद्यापीठाने कृषी क्रांतीचे प्रणेते...
राज्यात पावसाचा प्रभाव कमी झालापुणे ः राज्यात गेल्या काही दिवस जोरदार पाऊस...
राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसपुणे ः राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली...
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ः मुख्यमंत्री...उस्मानाबाद : खचून जाऊ नका, धीर धरा, शासन पूर्ण...
सरकारची शेतकऱ्यांना कोरडी आश्‍वासने :...जिंतूर, जि. परभणी, हिंगोली ः अतिवृष्टीमुळे...
एकनाथ खडसे उद्या ‘राष्ट्रवादी’तमुंबई : भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या...
नगर जिल्ह्यात पिकांचे ६३ हजार हेक्टरवर...नगरः सप्टेंबर महिन्यातील सलगच्या २० दिवसांच्या...
शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये...
सातारा जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टर...सातारा : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील...
वर्धा जिल्ह्यात यंदा ६४ टक्के पीक...वर्धा  :  कर्जमाफी आणि शासनाच्या...
कासोळा फाट्यावर ‘स्वाभिमानी’चा रास्ता...यवतमाळ :  शेतकऱ्यांच्या विविध...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष बागांची छाटणी...सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे...
रत्नागिरीत सप्टेंबरमध्ये ३४ हेक्टर...रत्नागिरी ः मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात...
जळगाव जिल्ह्यात मुबलक पाणीजळगाव :  जळगाव जिल्ह्यातील मोठ्या व...
इगतपुरी तालुक्यात पावसामुळे २८५२...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या परतीच्या...