agriculture news in marathi, milk producers demand for give a special facility in railway for milk transport,nagpur, maharashtra | Agrowon

भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध वाहतुकीसाठी रेल्वेत हवी स्वतंत्र व्यवस्था

टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 जुलै 2019

भंडारा   ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर येथे दूध नेणाऱ्या भंडारा, गोंदिया जिल्ह्यांतील दुग्ध व्यावसायिकांसाठी स्वतंत्र डबा (बोगी) मिळावा, अशी मागणी आहे. या संदर्भाने माजी खासदार शिशुपाल पटले यांना निवेदन देण्यात आले. 

भंडारा   ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर येथे दूध नेणाऱ्या भंडारा, गोंदिया जिल्ह्यांतील दुग्ध व्यावसायिकांसाठी स्वतंत्र डबा (बोगी) मिळावा, अशी मागणी आहे. या संदर्भाने माजी खासदार शिशुपाल पटले यांना निवेदन देण्यात आले. 

भंडारा, गोंदिया जिल्ह्यात ५०० पेक्षा अधिक शेतकरी दुग्ध व्यवसाय करीत आहेत. दोन लाख लिटरपेक्षा अधिक दुधाचे संकलन या दोन जिल्ह्यांत होते. येथील शेतकऱ्यांच्या मुलांनी नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगारासाठी हा पर्याय निवडला आहे. 
या दोन्ही जिल्ह्यांतून नागपूरला दुधाचा पुरवठा होतो. दुधाच्या वाहतुकीसाठी रस्त्याऐवजी रेल्वेचा पर्याय फायदेशीर ठरतो. त्याची दखल घेत २००५ मध्ये माजी खासदार शिशुपाल पटले यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र एक्‍स्प्रेसला दूध वाहतुकीसाठी स्वतंत्र डबा जोडण्यात आला होता. या माध्यमातून दूध पुरवठादारांची चांगली सोय झाली होती.

मधल्या काळात हा डबा बंद करण्यात आल्यानंतर शिशुपाल पटले यांनी रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घेत तो डबा पुन्हा जोडण्यास सांगितले होते. त्यानंतर पुन्हा डबा जोडला गेला. आता दूध पुरवठादार शेतकऱ्यांची संख्या वाढल्याने अतिरिक्‍त दोन डबे दूध वाहतुकीकरिता उपलब्ध व्हावेत, अशी मागणी आहे. 

या आश्‍वासनाची पूर्तता लवकर करणार असल्याचे शिशुपाल पटले यांनी सांगितले. त्याकरिता रेल्वे व्यवस्थापक व रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना भेटणार असल्याची माहिती त्यांनी दूध उत्पादकांना दिली. या मागणीच्या पूर्ततेकडे दूध विक्रेत्यांचे लक्ष्य लागले आहे.


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्याच्या विकासासाठी ९७१ कोटींची...नगर ः जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडे ९७१...
खानदेशातील ‘रब्बी’ला ढगाळ वातावरणाचे...जळगाव : खानदेशात यंदा हुडहुडी भरविणारी थंडी दोन-...
उद्योगमंत्र्यांनी जाणली रेशीम...औरंगाबाद : जिल्ह्यात रेशीम कोषाचे उत्पादन,...
फुलकिड्यांच्या प्रादुर्भावामुळे काजू...सिंधुदुर्ग : ढेकण्या, शेंडेमर, फांदीमर रोगांमुळे...
दहा वर्षांत सातारा जिल्ह्यातील १३८०...सातारा  ः जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी...
मुळा, भंडारदरा धरणांतून आजपासून आवर्तननगर  ः यंदा पाऊस चांगला झाल्याने...
पुणे कृषी महाविद्यालयातील ...पुणे  ः विद्यार्थी वसतिगृहाचे प्रवेशद्वार...
भीमा खोऱ्यातील धरणांमध्ये ८५ टक्के पाणीपुणे  : जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात यंदा दमदार...
हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांत...हिंगोली : पाऊस लांबल्यामुळे हिंगोली, नांदेड,...
शिरवाडे वणीत जलसंधारणासाठी...नाशिक : कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान आणि...
कुरखेडा तालुक्यात सेवा सोसायट्यांचा धान...गडचिरोली  ः कमिशन व हमालीची रक्‍कम मिळत...
नवव्या जागतिक कृषी महोत्सवास उद्यापासून...नाशिक : श्रीस्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी...
धान खरेदी केंद्रासाठी शेतकऱ्यांचा...भंडारा  ः गेल्या दोन महिन्यांपासून बंद...
काँग्रेसचा दर बुधवारी मुंबईत ‘लोकदरबार’ मुंबई  : विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या...
मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेने...मुंबई  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
महाविकास आघाडीची समन्वय समिती होणार...मुंबई  ः राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच...
बाजार समित्यातील ‘शेतकरी मतदाना’चा हक्क...पुणे  : बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये...
जळगावात बटाटा ८०० ते १८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता....
कांदा पिकासाठी सिलिकॉनचा वापर फायदेशीरसिलिकॉनच्या वापराने नत्रयुक्त खतांची उपलब्धता २०...
माणसाचे प्राचीन पूर्वज खात झाडांचे कठीण...माणसांच्या प्राचीन पूर्वजांच्या आहारामध्ये...