agriculture news in Marathi milk producers getting daily setback of 14 crore rupees Maharashtra | Page 2 ||| Agrowon

दूध उत्पादकांना रोज १४ कोटींचा फटका 

टीम अॅग्रोवन
रविवार, 13 जून 2021

लॉककाडउनमुळे दुधाची मागणी घटल्याचे सांगत दूध संघांनी गेल्या सव्वा महिन्यापासून गाईच्या दुधाचे दर कमी केले. प्रति लिटर १० ते १२ रुपये दर कमी केल्याने राज्यातील दूध उत्पादकांना रोज १४ कोटी रुपयांपेक्षा अधिक फटका बसत आहेत. 

नगर ः लॉककाडउनमुळे दुधाची मागणी घटल्याचे सांगत दूध संघांनी गेल्या सव्वा महिन्यापासून गाईच्या दुधाचे दर कमी केले. प्रति लिटर १० ते १२ रुपये दर कमी केल्याने राज्यातील दूध उत्पादकांना रोज १४ कोटी रुपयांपेक्षा अधिक फटका बसत आहेत. दर कमी केल्यापासून आतापर्यंत साडेचारशे कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यात पशुखाद्याच्या दरवाढीने नुकसानीत भर टाकली. त्यामुळे नफा तर सोडाच लिटरमागे पाच ते सहा रुपये तोटा होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

कोरोनामुळे राज्यात लॉकडाउन झाल्यानंतर दुधाला मागणी नसल्याचे सांगत अगदी पहिल्या आठ दिवसांतच गाईच्या दुधाचे दर आठ ते दहा रुपयांनी खाली आणले. साधारण दीड महिन्यापूर्वी ३१ ते ३२ रुपये प्रतिलिटर दर मिळत होता. सध्या २० ते २१ रुपये दर मिळत आहे. राज्यात संकलित होणाऱ्या १ कोटी ४० लाख लिटर दुधापैकी ७० ते ८० लाख लिटर दूध पिशवीतून विक्री होते. दहा ते पंधरा लाख लिटर दुधाचे उपपदार्थ होतात तर उर्वरित दुधाची भुकटी होते. 

दर पडूनही गेल्या दीड महिन्यात सरकारी पातळीवर दूध उत्पादकांचा अजिबात विचार झाला नाही. आता शेतकरी नेत्यांनी आंदोलन करण्याची तयारी सुरू केल्याचे दिसल्याने अतिरिक्त दूध खेरदी करणार असल्याचे सांगितले जाऊ लागले. मात्र दुधाचे दर पाडल्यामुळे सध्या राज्यातील दूध उत्पादकांना दररोज १४ कोटींपेक्षा अधिक फटका सोसावा लागत आहे. आतापर्यंत साडेचारशे कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. 

पशुखाद्य दरवाढीने खर्चात वाढ 
सध्या २० ते २१ रुपये दर मिळत आहे. चारा, पाणी, मजुरी, औषधी आणि त्यासाठी लागणाऱ्या कष्टाचा विचार केला तर २६ ते २७ रुपये खर्च येतो. म्हणजेच लिटरमागे तब्बल ६ रुपयांचा फटका बसत आहे. त्यातच गेल्या एक महिन्यापासून पशुखाद्याचे दर ३० टक्क्यांनी वाढल्याने उत्पादन खर्चात दोन रुपयांची आणखी भर पडली. म्हणजेच लिटरमागे एकूण आठ रुपये शेतकऱ्यांना तोटा होत आहे. 

प्रतिक्रिया
मजुरी, औषध, चारा व अन्य बाबी धरल्या तर साधारण २७ ते २८ रुपये प्रति लिटरला खर्च येतो. सध्या दुधाची विक्री तोट्यातच आहे. गेल्या दोन वर्षांपासून या व्यवसायावर संकट आहे. हे थांबण्यासाठी सरकारने कठोर कायदा केला पाहिजे आणि दुधाला किमान हमी दर द्यावा. 
- नंदकुमार रोकडे, दूध उत्पादक, खडकी, जि. नगर 

दुधाला मागणी नाही, असे सांगून दर पाडण्यासाठी खासगी दूध संघ संधी साधत आहेत. गेल्या दीड महिन्यापासून दर कमी केल्याने दूध उत्पादकांना कोट्यवधींचा फटका बसला. शेतकऱ्यांकडून कमी दरात घेता आणि ग्राहकांना मात्र पूर्वीच्या दरात विकता, ही लूट थांबली पाहिजे. यासाठी आम्ही संघर्ष उभा करत आहोत. 
- डॉ. अजित नवले, नेते, किसान सभा, महाराष्ट्र 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आज हलक्या सरींची शक्यता पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
पशुचिकित्सा व्यवसायींचा राज्यभर बेमुदत...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पावसाची...पुणे : हवामान विभागाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचा...
पीकविमाधारकांना मिळणार २५ टक्के तात्काळ...पुणेः राज्यात प्रतिकूल परिस्थितीमुळे खरीप...
खोटे बोलण्यासाठी नाही, प्रामाणिक...भिलवडी, जि. सांगली : ‘‘मी तत्काळ मदतीबाबत विचार...
'रेडग्लोब’ द्राक्षवाणात मिळवली ओळखपुणे जिल्ह्यातील खोडद येथील सुहास थोरात यांनी...
उत्पन्नाच्या विविध स्त्रोतांमधून मिळवली...बोरगाव खुर्द (ता.. जि.. अकोला) येथील महेश वानखडे...
शेतकऱ्यांनी वापरले ६५० कोटींचे घरचे...पुणेः राज्यात यंदा सोयाबीनच्या पेऱ्यात मोठी वाढ...
कोकणात हलक्या पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र...
अडीच लाख शेतकऱ्यांच्या जमिनी सावकाराकडे...अमरावती : राष्ट्रीय व खासगी बँकांनी हात आखडता...
धरणक्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
सर्वदूर हलक्या पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या...
पीक विम्यात कुचराई केल्यास नोटिसा काढा...नाशिक: पीकविमा योजनांची संबंधित कंपन्यांच्या...
मत्स्यबीज केंद्रामुळे महिला झाल्या...भिगवण (जि. पुणे) येथील पाच उपक्रमशील महिलांनी...
गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर...सोलापूर ः शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि...
चीनची खत निर्यातीवर बंदी बीजिंग ः चीनमध्ये खतांचे घटलेले उत्पादन, विजेच्या...
राज्याची पीकपेरा नोंद आता शेतकरीच करणार पुणेः सातबारा उतारावरील पीकपेऱ्याची नोंद आता...
निसर्गदूतांच्या सहयोगाने ‘झाडांची भिशी...सोलापुरातील उपक्रमशील डॅाक्टर, इंजिनिअर्स,...
खानदेशात मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...जळगाव : खानदेशात मका पिकाची लागवड यंदा बऱ्यापैकी...
पंधरा दिवस पावसाचा जोर कमी राहणार पुणे : गेल्या पंधरा दिवस कोकण आणि घाटमाथ्यावर...