Agriculture news in marathi To the milk producers in Ratnagiri Received one month's salary | Agrowon

रत्नागिरी दूध संघाकडून १ कोटी २० लाख शेतकऱ्यांना अदा

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

रत्नागिरी : जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी १ कोटी  २० लाख रुपये अदा करण्यात आले आहेत. यामुळे केवळ सप्टेंबर महिन्याचा पगार शेतकऱ्यांना मिळाला आहे. अजून तीन महिन्यांचे पगार बाकी आहेत. 

जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. मागील चार महिने या उत्पादकांना पगार मिळालेला नाही. याबाबत नुकत्याच पार पाडलेल्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न गाजला. त्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. त्यानंतर जिल्ह्यातील दूध उत्पादक, बर्फ पुरवठादार आणि वाहन चालक यांच्या पगारापोटी १ कोटी ५९ लाख मंजूर केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

 प्रत्यक्षात अधिवेशन संपून दोन आठवडे झाले, तरी दूध उत्पादकांच्या खात्यावर कोणतीच रक्कम जमा करण्यात आली नाही. त्यामुळे दूध उत्पादकांमध्ये नाराजी वाढत होती. दोन दिवसांपूर्वी ही रक्कम उत्पादकांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.

सप्टेंबर महिन्याचा पगार या रकमेतून अदा करणे शक्य झाले आहे. ही रक्कम अदा करताना शेतकऱ्यांनी‍ खरेदी केलेल्या खाद्याची रक्कम तातडीने वळती करण्यास शासन विसरलेले नाही. त्यामुळे बऱ्याच  उत्पादकांच्या खात्यांवर नाममात्र पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे उत्पादक नाराज आहेत. शासनाला वेळच्या वेळी पगार देण्याचे स्मरण राहत नाही. पण, चार महिन्यांनंतर एक पगार देताना खाद्याचे पैसे कापण्याचे स्मरणात राहते, अशा शब्दात दूध उत्पादकांनी राग व्यक्त केला.
 
इतर ताज्या घडामोडी
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...
निर्यातबंदीमुळे कांदा फुगवटा;...पुणे: कांद्यावरील संपूर्ण निर्यातबंदी तातडीने...
खानदेशात कांदा लागवड १४ हजार हेक्‍टरवरजळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा...
‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या...अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
द्राक्षपट्ट्यासह आदिवासी भागात खुलली...नाशिक  : स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वरची...
सांगलीत हळदीच्या उत्पादनात घटसांगली : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेला महापूर...
चांद्यात फ्लॉवरच्या निकृष्ट...नगर : तेलंगण राज्यातील एका बियाणे कंपनीचे...
'थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय कायम...सोलापूर  ः राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच...
औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाई...औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे...
लातूर विभागातील दोन हजार हेक्टरवर फळबाग...नांदेड : कृषीच्या लातूर विभागांतर्गतच्या परभणी,...
अकोला बाजार समितीचे गरजूंना पाठबळअकोला ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने...
उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा...जळगाव  ः खानदेशात गहू पिकाची स्थिती...