खानदेशातील दूध उत्पादकांना कमी दराचा फटका

खानदेशातील दूध उत्पादकांना कमी दराचा फटका
खानदेशातील दूध उत्पादकांना कमी दराचा फटका

जळगाव : खानदेशात सहकारी संघ आणि खाजगी डेअऱ्या प्रतिदिन साडेनऊ लाख लिटरपर्यंत दुधाचे संकलन करीत आहेत. परंतु जळगाव जिल्ह्यातील सहकारी दूध सोसायट्या वगळता इतर संस्था शासनाच्या निर्देशाप्रमाणे २५ रुपये प्रतिलिटरचा दर देत नसल्याचे चित्र आहे. गायीच्या दुधाचे सर्वाधिक सुमारे ६ लाख लिटरपर्यंतचे संकलन आहे. गायीच्या दुधाची खेडा खरेदी १८ ते २१ रुपये प्रतिलिटरने होत आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना कोट्यवधींचा फटका बसत आहे.

जळगाव जिल्ह्यात सर्व संघ, खासगी संस्था पाच लाख लीटरपर्यंतचे दूध संकलन करतात. जळगाव जिल्हा दूध संघाचे प्रतिदिन साडेतीन लाख लिटरपर्यंत संकलन आहे. त्यामध्ये अडीच लाख लिटरपेक्षा अधिक दूध गायीचे असते. ते प्रतिदिन किमान एक ते सव्वा लाख लीटर अतिरिक्त येत आहे. त्याची पावडर तयार केली जाते. शासनाने गायीच्या दुधाला पाच रुपये प्रतिलिटरचे अनुदान देण्याचे म्हटले होते. संघाचे चार कोटी रुपये अनुदान रखडले आहे. काही खासगी संस्थांनीही अनुदान योजनेत भाग घेतला. त्यांचेही अनुदान मिळाले नाही.

खानदेशातील सहकारी, खासगी संस्थांचे मिळून सुमारे पाच कोटींपर्यंतचे अनुदान रखडले आहे, अशी माहिती संचालक प्रमोद पाटील (चाळीसगाव) यांनी दिली.

धुळे, नंदुरबारात सहकारी संघ नसल्याने खाजगी संस्थांचे जाळे वाढले. गुजरातमधील दोन डेअऱ्या धुळे, नंदुरबारात दूध संकलन करतात. धुळ्यातील संकलन प्रतिदिन जवळपास तीन लाख लीटरवर आहे. नंदुरबारातही जवळपास दोन लाख लीटरपर्यंत दूध संकलन प्रतिदिन होते.  धुळे व नंदुरबारात खाजगी संस्था २१ रुपयांपर्यंतच दर देतात. त्यातही काही संस्था वजन, फॅटमध्ये गडबड करून लुबाडणूक करीत असल्याच्या तक्रारी आहेत. जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाचे चार कोटींचे रखडलेले अनुदान मिळालेले नाही. दूध संघाने सभासदांना २५ रुपये प्रतिलिटर दर द्यावा. शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्यानंतर संघातर्फे सोसायट्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येईल, असे सांगितले. जळगाव जिल्ह्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्याच सोसायट्या सभासदांना २५ रुपये प्रतिलिटर दर देत असल्याची माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com