agriculture news in Marathi, Milk producers in trouble due to rate increased of cottonseed oil cake , Maharashtra | Agrowon

सरकी ढेपेचे दर कडाडल्याने दूध उत्पादक अडचणीत
टीम अॅग्रोवन
रविवार, 22 सप्टेंबर 2019

सरकी, सरकी ढेप तसेच सुग्रासच्या दरात सतत होत असलेल्या दरवाढीमुळे दूध उत्पादकांना प्रचंड झळ पोचत आहे. साधारणतः दीड महिन्यात हे दर दुप्पट-तिप्पट बनले आहेत. अशा स्थितीत जनावरांना पौष्टिक खाद्य देणे सामान्य दूध उत्पादकांच्या आवाक्याबाहेर जात आहे. याचा परिणाम दूध उत्पादनावर होण्याची चिन्हे वाढली आहेत. 
- अमोल खर्चे, दूध उत्पादक, आडविहीर, जि. बुलडाणा
 

अकोला : दुधाळ जनावरांना पोषक खाद्य म्हणून खाऊ घातली जाणारी सरकी ढेप आता दूध उत्पादकांच्या आवाक्याबाहेर पोचू लागली आहे. गेल्या काही दिवसांत सरकी ढेपीचे भाव अव्वाच्या सव्वा वाढले आहेत. सरकी ढेप ४१०० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटल विकल्या जात आहे. ढेपेची साठेबाजी केल्याने ही दरवाढ झाल्याची चर्चा आहे. पशुखाद्याच्या दरातही १०० ते १५० रुपयांची वाढ झाल्याने दूध उत्पादकांचे नियोजनच कोलमडत आहे.  

सरकीपासून तयार केल्या जाणाऱ्या ढेपीचे दर मागीलवर्षात २२०० ते २३०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान होते. आता हाच दर ४००० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचला आहे. दुधाळ जनावरांसाठी आवश्यक मानले जाणारे हे सरकी ढेपीचे पोषक खाद्य कडाडल्याने दुधाचा व्यवसाय करणारे सर्वसामान्य पशुपालक आर्थिक डबघाईस आले आहेत. दुधाचा व्यवसाय करणे परवडणारे राहिलेले नाही. 

वऱ्हाडात बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने खामगाव, मलकापूर तसेच अकोला शहरांमध्ये असलेल्या ऑईल मिलमधून सरकीपासून तेल काढल्यानंतर ढेप तयार होते. ही ढेप सर्वत्र विक्रीला जाते. गेल्या काही वर्षांपासून कापसाच्या उत्पादनात घट झाल्याने ऑईल कंपन्यांना पुरेशा प्रमाणात सरकी मिळणे दुरापास्त झाले.

त्याचा थेट परिणाम ढेपेच्या दरवाढीवर झाल्याचे बोलले जाते. तर दुसरीकडे काही विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात साठेबाजीसुद्धा केली आहे. यामुळे सरकी ढेपीचे दर झपाट्याने वाढले आहेत. साध्या सरकीचा दर १४०० वरून थेट ४१०० झाल्याचे दूध विक्रेत्यांनी सांगितले. या वाढलेल्या दरांच्या तुलनेत दुधाचे दर मात्र होते तेवढेच कायम आहेत.

 

इतर बातम्या
ईशान्यकडील राज्ये का नाकारतात...कोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने...
नगर : नुकसान भरपाईसाठी एकशे पस्तीस...नगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या...
जळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली...जळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (...
केंद्रीय पथक आज करणार पीकहानीची पाहणीपुणे ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे राज्यात शेतीच्या...
‘दाणेदार’ खताच्या मागे ‘मालदार’ हालचालीपुणे : राज्यात १९७० ते २००० या तीन दशकांमध्ये...
योजना, निधीची कमी नाही, मग शेतीचे प्रश्...औरंगाबाद : योजना, निधी, यंत्रणा, सुविधा,...
धक्कादाय ! चक्क दाताखाली दाणे ठेवत...उमरखेड, यवतमाळ : मॉन्सूनोत्तर पावसाच्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात गारठा कमीपुणे: विदर्भ, मराठवाड्यात तापमान कमी झाल्याने...
शेतकऱ्यांचे ३० कोटी परत करा; पुण्यात...पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील डाळिंब...
'या' बाजार समितीत शेतकऱ्यांना अल्प दरात...अकोला : सध्या कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा...
जळगाव जिल्ह्यात सर्वच नुकसानग्रस्तांना...जळगाव : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना...
केंद्रीय पथक आज मराठवाड्यात पीक...औरंगाबाद : मराठवाड्यात ऑक्‍टोबर-...
फळबागांची लागवड खोळंबण्यास ‘तो’ ठरला...पुणे : मागील दोन ते तीन महिन्यांत जोरदार पाऊस...
सांगलीत बेदाणा लिलावास प्रारंभसांगली : दिवाळीच्या महिन्याच्या सुटीनंतर बाजार...
अमरावती जिल्ह्याला २४ टक्‍के...अमरावती : मॉन्सूनोत्तर पावसाचा जिल्ह्यात ८० टक्‍...
परभणी विभागात २८ हजार क्विंटल...परभणी : महाबीजच्या परभणी विभागातील सहा...
हमीभावासाठी 'सीसीआय'ला द्या कापूस : ॲड...वर्धा : ‘‘शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीपेक्षा कमी...
जळगाव जिल्हा परिषदेत निधीवाटपावरून आरोप...जळगाव : जिल्हा परिषद सेस फंड, शिक्षण, महिला-...
वऱ्हाडला पीक नुकसानभरपाईचा २६५ कोटींचा...अकोला : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिपावसाचा फटका...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख टन खते...पुणे : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतांची अडचण येऊ...