सांगली : महापुराच्या संकटानंतर दूध उत्पादनाला गती

Milk production in Sangli district accelerates after flood crisis
Milk production in Sangli district accelerates after flood crisis

सांगली : दूध उत्पादकांचा जिल्हा म्हणून सांगलीकडे पाहिले जाते. महापुरानंतर पशूपालकांनी जनावरांची योग्य काळजी घेऊन पुन्हा दूध उत्पादनाची गती घेतली आहे. जिल्ह्यात सरासरी १५ लाख लिटर दुधाचे संकलन होते. डिसेंबरपेक्षा जानेवारी महिन्यात सुमारे ६ हजार ९७५ लिटरने दूधसंकलनात वाढ झाली आहे, अशी माहिती मिरज येथील दुग्धविकास योजनेच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात सहकारी १७, तर खासगी ७ दूध संघ आहेत. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरामुळे पशुपालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक जनावरांचा मृत्यू झाला. 

त्याचा परिणाम दूध संकलनावर झाला. या तीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे एक ते दीड लाख लिटर दुधाचे संकलन कमी झाले होते. त्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. वास्तविक, पाहता पशुपालकांना दुष्काळी आणि ओला दुष्काळ या दुहेरी संकटावर मात करून जनावरांना दर्जेदार चारा आणि दूधवाढीसाठी दूध उत्पादक शेतकरी प्रयत्न करत आहेत. सध्या दूधवाढीचा कालावधी आहे. त्यामुळे पुढील महिन्यापासून दूध संकलनात वाढ होण्याची शक्यता आहे. 

दूधसंकलनावर दृष्टिक्षेप (लिटरमध्ये)

           डिसेंबर २०१९

  •     सहकारी ः ३ लाख ३३ हजार १३६
  •     मल्टिस्टेट ः २ लाख ४८ हजार ४३५
  •     खासगी ः ६ लाख ३२ हजार ८३६
  •     एकूण ः १२ लाख १४ हजार ४०७
  •             जानेवारी २०२०

  •     सहकारी ः ३ लाख ३७ हजार ८६९
  •     मल्टिस्टेट ः २ लाख ४२ हदार ५६५
  •     खासगी ः ६ लाख ४० हजार ९४८
  •     एकूण ः १२ लाख २१ हजार ३८२
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com