भंडारा दूध संघाची दर, अनुदानाच्या आदेशाला हरकत

शासनाने दूध दरवाढीसंदर्भाने काढलेल्या आदेशात अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे या आदेशाचा पुनर्विचार करावा असा ठराव आमच्या संघाने घेतला आहे. - रामलाल चौधरी, अध्यक्ष,भंडारा जिल्हा दुग्ध संघ
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

भंडारा   ः दूध दर आणि अनुदानासंदर्भाने असलेल्या शासन आदेशात केवळ गाईच्या दुधाचाच विचार करण्यात आला आहे. म्हशीच्या दुधाबाबत यात कोणतीच भूमिका नाही, त्यासोबतच इतरही अनेक त्रुटी या आदेशात असल्याने या आदेशात सुधारणा करण्यात यावी, असा ठराव भंडारा जिल्हा संघाने घेतला आहे, अशी माहिती माहिती संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी यांनी दिली.

भंडारा जिल्हा दुग्ध संघाचे संकलन सुमारे ६० हजार लिटर आहे. त्यामध्ये म्हशीच्या दुधाचे प्रमाण २० हजार लिटर आहे. यापूर्वी शासनाने गाईच्या दुधाकरिता २७ तर म्हशीच्या दुधाकरिता ३६ रुपये दर निश्‍चित केला होता. आता मात्र गाईच्या दुधाकरिता २५ रुपये दर ठरविण्यात आला आहे. परंतु म्हशीच्या दुधाकरिता तरतूदच करण्यात आली नाही. त्यासोबतच संघाने दुग्ध उत्पादकांच्या खात्यात रोज रक्‍कम जमा करावी, असे आदेशित आहेत.

परंतु अनेक दुग्धोत्पादकांच्या गावानजीक बॅंकेची सुविधाच नाही. काही दुग्ध उत्पादक केवळ एक ते दोन लिटरच दूध संघाकडे घालतात. अशांकरिता कॅशलेश व्यवहार शक्‍य होणार नाही. शिल्लक दुधाच्या निर्यातीचेही नव्या आदेशात म्हटले आहे. परंतु विदर्भातील दूध   संघांना हे शक्‍य नाही. परिणमी शासन आदेशातील या त्रुटींची दखल घेत भंडारा दूध संघाने आपल्या संचालक व सदस्यांची बैठक घेतली. त्यात शासनाने आदेशातील त्रुटी दूर करण्याचा ठराव घेण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी नागपूर विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था संजय क्षीरसागर होते. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी नीलेश बंड यांची या वेळी उपस्थिती होती.

वाढीव दर अद्यापही मिळेना शासनाने गाईच्या दुधाला २५ रुपये लिटरचा दर जाहीर केला असला तरी पूर्व विदर्भात दूध उत्पादनात आघाडीवर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील दुग्धोत्पादकांकडून अद्यापही या दराने दुधाची खरेदी सुरू झाली नसल्याचे सांगण्यात आले. नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर शेतकऱ्यांनी ही माहिती दिली. त्यानुसार शासनाकडून गाईच्या दुधाकरिता खरेदीदर २५ रुपये प्रतिलिटरचा जाहीर केला गेला आहे. परंतु असा दर अद्यापही दिला गेलेला नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com