दूध दराबाबतचे हमीपत्र देणे बंधनकारक

दुध
दुध

पुणे  ः दूधदरप्रश्‍नी शासनाने जाहीर केलेल्या २५ रुपये प्रतिलिटर दूध खरेदी दर घाेषणेच्या अंंमलबजावणीचा शासन आदेश प्रसिद्ध झाला आहे. शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी २५ रुपये दर देणाऱ्या दूध संघांना शासन ५ रुपये अनुदान देणार आहे. या आदेशानुसार दूध भुकटी निर्यातीसाठी प्रतिकिलो ५० रुपये आणि दुधाची निर्यात करणाऱ्या प्रकल्पांना ५ रुपये प्रतिलिटर अनुदान मिळणार आहे. या याेजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या दूध संघांना दूध खरेदी दराबाबतचे हमीपत्र प्रादेशिक दुग्ध विकास अधिकाऱ्यांकडे सादर करावे लागणार आहे.  हा दर आज शनिवार (ता. २१) पासून शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर थेट जमा करणे बंधनकारक असणार आहे. तर शालेय पाेषण आहारात दुधाच्या समावेशाबाबतचा शासन निर्णय संबंधित विभागाने काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शालेय पाेषण आहारात दुधाचा समावेश  विविध उपाययाेजनांमध्ये शालेय पाेषण आहारात दुधाचा समावेश करण्यासाठी शालेय शिक्षण, महिला बाल कल्याण, आदिवासी, सामाजिक न्याय आणि सार्वजनिक आराेग्य विभागाने स्वतंत्र शासन निर्णय काढावेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या आहेत अटी

  • सहकारी व खासगी दूध संस्थानी उत्पादित केलेल्या पिशवी बंद दुधासाठी अनुदान देय राहणार नाही.
  • दरराेज १० हजार लिटरपेक्षा कमी दुधाची हाताळणी करणाऱ्या संस्थांना याेजनेत सहभागी हाेता येणार नाही.
  • हे अनुदान दूधपुरवठा करणारी संस्था किंवा रुपांतरण करणारी संस्था यापैकी एका संस्थेस अनुज्ञेय राहील.
  • जे दूध भुकटी उत्पादक पाच रुपये प्रतिलिटरप्रमाणे अनुदानाचा लाभ घेतील, त्यांना दूध व भुकटी निर्यात अनुदानाचा लाभ मिळणार नाही.
  • निर्यात अनुदान अागामी तीन महिन्यांपुरताच असणार असून, याेजनेच्या प्रतिसादावर मुदतवाढीचा स्वंतत्र निर्णय घेतला जाणार आहे.
  • संघांनी अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करणे बंधनकारक आहे.
  • सहभागी संघांना जून २०१८ अखेरीचा पिशवी बंद दुधाचे वितरण आणि अतिरिक्त दुधाचा तपशील सादर करावा लागणार आहे.
  • अतिरिक्त दूध रूपांतरणाचा अहवाल जिल्हा दुग्ध विकास अधिकाऱ्यांकडे सादर केल्यानंतर, प्रादेशिक दुग्ध व्यवसाय अधिकारी आणि दुग्धव्यवसाय आयुक्तांकडून मान्यतेनंतर अनुदान दिले जाणार.
  • अनुदान घेताना शासनाची फसवणूक करणाऱ्या संघांकडून अनुदानाची रक्क्म व्याजासह वसूल हाेणार.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com