agriculture news in Marathi milk rate split in Solapur Maharashtra | Agrowon

दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत 

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 जुलै 2020

माझ्याकडे १० एकर शेती आहे, तीन जर्सी गाई आणि तीन म्हशी आहेत. सर्व दुधाच्या आहेत. घरची वैरण आहे. त्यावरच भागते, पण दुधाला दर नसल्याने सध्या अडचण झाली आहे. पशुखाद्याचे दर वाढल्याने तेही परवडत नाही. पण करायचं म्हणून करतो आहे. 
- सतीश साळुंखे, दूध उत्पादक, खेडभाळवणी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर 

सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. दुभत्या जनावरांच्या चारा आणि पशुखाद्याच्या वाढत्या खर्चासाठी नुसती कसरत करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. आधीच कोरोनामुळे विविध संकटांना तोंड देत शेतकरी पशुपालन करत असताना, त्यात आता दूध दराच्या या समस्येने त्याच्या संकटात आणखीनच भर पडली आहे. 

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांना याची झळ बसते आहे. सरकारने दूध उत्पादकांचे अतिरिक्त दूध खरेदी करण्याचे आश्वासन दिले असले, तरी त्याचा थेट फायदा गावातील दूध उत्पादकांपर्यंत जाणवत नाही. जिल्हा दूध संघासह खासगी संघही या सगळ्या परिस्थितीचा गैरफायदा घेत असल्याचे दिसत आहे. सरळसरळ शेतकऱ्यांना थेट वाऱ्यावर सोडले जात असल्याचे दिसत आहे. कोणीच शेतकऱ्यांची दखल घेत नाही. 

पूर्वी गाईच्या दुधाचा ३० ते ३२ रुपयांपर्यंत असणारा दर आता १८ ते २० रुपयांवर खाली आला आहे. तर म्हशीच्या दुधासाठी ३२ रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. फॅट कमी निघाल्यास त्यापेक्षाही आणखी दर कमी होतो. एकीकडे ही परिस्थिती असताना, दुभत्या जनावरांना जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. किमान एका गाईला दिवसाला २ ते ४ किलो ओला आणि सुका चारा लागतो. तसेच तेवढेच पशुखाद्य लागते. या संपूर्ण खर्चाचा मेळ बसवण्यासाठी नुसती कसरत सुरू आहे. 

बाजारातील पशुखाद्याचे दर 
सुग्रास पोते (५० किलो) १२०० ते १४०० रुपये, खापरी पेंड (५० किलो) २२०० ते २४००, मका भरडा (५० किलो) ८०० ते ९०० रुपये असे दर आहेत. गेल्या दोन वर्षात तर पशुखाद्याचे दर आणखीनच वाढले आहेत. ओला, सुका चारा असतोच, पण दूधवाढीसाठी पशुखाद्यही आवश्यकच असते. त्यामुळे महाग असले, तरी ते शेतकऱ्यांना घ्यावेच लागते. 
 


इतर अॅग्रो विशेष
कोरोनास्थितीमुळे पोल्ट्री उद्योगाची...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिकनबाबत...
राज्यातील रेशीम कोष उत्पादकांना मिळणार...पुणे ः बदलत्या हवामानामुळे अडचणीत येत...
मका उत्पादकांचे लक्ष शासनाच्या...औरंगाबाद: हमीभाव खरेदी केंद्रांवरील खरेदी बंद...
लाल भेंडीसाठी शेतकऱ्याला केंद्राचे...सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील आडेली (ता.वेंगुर्ला)...
‘भीमाघोड’ने उभारली सर्वांत मोठी कांदा...पुणे: भीमाघोड शेतकरी उत्पादक कंपनीने महाओनियन...
पावसाचा जोर आजपासून वाढणारपुणे ः उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व...
कापसाचे ६१४ कोटी थकीतनागपूर : राज्यात खरेदी करण्यात आलेल्या कापसाची...
वैद्यांनी जपला यांत्रिकीकरणाचा वारसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
प्रतिकूल हवामानात घडवली बीबीएफ’...जालना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी-जालना (केव्हीके...
बदलत्या व्यापार समिकरणांचा अन्वयार्थशेती क्षेत्रात नुकत्याच आम्ही काही सुधारणा केल्या...
शरद जोशींचे शिक्षण स्वातंत्र्यशरद जोशींचे तत्वज्ञान एका शब्दात सांगायचे म्हटले...
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...
`पोकरा`मधून शेतमजुरांना प्रशिक्षण द्याऔरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
ऑगस्टमध्ये प्रथमच भरले सीना धरण नगर: दुष्काळी कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी...
कोल्हापूर : जनावरे बाजारातील...कोल्हापूर: `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
साखर निर्यातवाढीसाठी केंद्राची ‘रॅपिड अ...कोल्हापूर: देशातून जास्तीत जास्त साखर निर्यात...
परभणीत सोळा हजार शेतकऱ्यांचे आधार...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सोयाबीन बियाणेप्रकरणात शेतकऱ्यांना एक...अमरावती : विभागातील पाच जिल्ह्यांत सोयाबीन बियाणे...
‘ई-नाम’, शीतसाखळी बळकट करण्याची गरज;...पुणे: चीनशी व्यापारी संबंध डळमळीत झाल्यानंतर...