agriculture news in marathi, Milk subsidy will be continued till 31 January 2019 | Agrowon

दूध अनुदान योजनेस ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

पुणे : राज्यात उत्पादित होणाऱ्या (पिशवी बंद दूध वगळून) दूध अनुदान योजनेस ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. योजना ३१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत राबविण्यात येणार होती.

पुणे : राज्यात उत्पादित होणाऱ्या (पिशवी बंद दूध वगळून) दूध अनुदान योजनेस ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. योजना ३१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत राबविण्यात येणार होती.

अडचणीतील दूध व्यवसायाला दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने दूध भुकटी व दुधाची निर्यात करण्यासाठी खासगी आणि सहकारी दूध संघांना भुकटीसाठी प्रतिकिलो ५० रुपये तर निर्यात होणाऱ्या दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची योजना जाहीर केली होती. भुकटीची योजना १९ जानेवारी २०१९ पर्यंत सुरू राहणार असून, दुधासाठीची योजना ३१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत राबविण्यात येणार होती. मात्र, राज्यातील दुष्काळ परिस्‍थितीमुळे दूध अनुदान योजनेला ३१ जानेवारी २०१९ पर्यंत मुदतवाढीचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे.

राज्य सरकारने दूध दर अनुदानास दिलेल्या मुदतवाढीवर चर्चा करण्यासाठी कृती समितीची बैठक गुरुवारी (ता. २२) आयोजित करण्यात आली आहे. सदर निर्णय संघांना मान्य आहे की नाही याबाबत येथे भूमिका घेतली जाईल.
- विनायकराव पाटील, अध्यक्ष, खासगी व सहकारी कल्याणकारी दूध संघ कृती समिती

सरकारने आत्तापर्यंत आम्हाला ५० दिवसांचे अनुदान दिलेले आहे. २० सप्टेंबर ते आजपर्यंत अशा ४० दिवसांचे सुमारे ८० कोटींचे अनुदान थकीत आहे. आम्ही अगोदरच सर्व शेतकऱ्यांना अनुदान देऊन बसलो आहे. आत्ता आमच्याकडे पैसे शिल्लक नसून सर्व खासगी आणि सहकारी दूध संघ आर्थिक अडचणीत आले आहेत. सरकारला आमच्यामार्फत शेतकऱ्यांना अनुदान द्यायचे असेल, तर सरसकट सर्व दुधाला अनुदान द्यावे.
- प्रकाश कुतवळ, 
सचिव, कल्याणकारी दूध दूध संघ कृती समिती

निर्णयाचे स्वागत
मंचर, जि. पुणे : ३१ जानेवारी २०१९ पर्यंत शेतकऱ्यांच्या दुधाला अनुदान देण्याच्या निर्णयाचे स्वागत उत्तर पुणे जिल्हा शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष डॉ. सुहास कहडणे यांनी केले आहे. डॉ. कहडणे म्हणाले, या मुदतवाढीमुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. दूध व्यवसाय सावरण्यासाठी अनुदार रकमेचा उपयोग शेतकऱ्यांना होईल. सर्व दूध प्रकल्पांनी नियमानुसार अनुदान शेतकऱ्यांना द्यावे.’’


इतर अॅग्रो विशेष
‘कीडनाशके कायदा’ हवा स्पष्ट शेतकऱ्यांना बनावट कीडनाशके विक्रेत्यांपासून...
राष्ट्रीय मुद्द्यांचा भाजपपुढे गुंतादिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या...
‘कोरोना’च्या अफवेमुळे पोल्‍ट्री...पुणे ः चीनमधील कोरोना विषाणूने जगभरात भीतीचे...
मांसाहारामुळे ‘कोरोना’ अशी अफवा...नागपूर: मांसाहार कोरोना व्हायरसला कारणीभूत...
शेतकऱ्यांचे ‘नाइट लाइफ’ कधी संपेल रे भौ...पुसद, जि. यवतमाळ : ग्रामीण भागात शेतीचे प्रश्‍न...
उन्हाचा चटका कायम राहणारपुणे : निरभ्र आकाशामुळे उन्हाचा ताप वाढून...
संशोधन शेतात पोचले तरच शेतकऱ्यांचा...दापोली, जि. रत्नागिरी ः विद्यापीठांमध्ये चांगल्या...
तुरीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठनागपूर ः खरेदीनंतर चुकाऱ्यास होणारा विलंब आणि...
‘ठिबक’च्या प्रस्तावासाठी २०...सोलापूर : या वर्षी ठिबक सिंचन केलेल्या...
जोतिबाच्या खेट्यास प्रारंभ, हजारो भाविक...जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर: जोतिबाच्या खेट्यास...
आर्थिक निर्णयांनी वाढवला प्रियंकाताईंचा...पती गौरव काकडे यांच्या आग्रहावरून पुणे शहरातील...
नियमित कर्जदारांच्या पदरी निराशाचसांगली ः शासनाच्या कर्जमाफीच्या आदेशात अल्प...
शेतकरीच सरकारचा केंद्रबिंदूः उद्धव ठाकरेजळगाव : कर्जमाफी देणे, हा शेतकऱ्यांच्या...
सिंधुदुर्ग जिल्हा कृषी विभागात १०७ पदे...सिंधुदुर्ग: जिल्हा कृषी विभागातील ३६५ पदांपैकी...
अतिवृष्टी, पूरग्रस्तांच्या कर्जमाफीसाठी...मुंबई ः राज्यात जुलै ते ऑगस्ट २०१९ या काळात...
बॅंकांच्या कृषी पतपुरवठ्यावर सरकारचे...नवी दिल्लीः बॅंकांकडून ग्रामीण भागात होणाऱ्या...
चंदनाची सात-बारा उताऱ्यावर नोंद घ्या:...नगर ः शेतकऱ्यांना शेतात चंदन लागवड करण्यास...
खानदेशात कोरड्या चाऱ्याची टंचाईजळगाव  ः खानदेशात चाऱ्याची मोठी टंचाई दिसत...
तंत्रज्ञान, सहकार, बॅंकिंग क्षेत्रात...जर्मनी हा युरोपातील प्रगत देश. तंत्रज्ञान आणि...
जमिनीची सुपीकता जपत पीक उत्पादनात...नाशिक जिल्ह्यातील कारसूळ (ता. निफाड) येथील संकिता...