agriculture news in marathi Of the mill producer company Agreement with Tuscaberry Company | Agrowon

गिरणा प्रोड्यूसर कंपनीचा टस्काबेरी कंपनीशी करार

टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 जानेवारी 2021

देवळा, जि. नाशिक : तालुक्यातील गिरणा खोरे फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी व बंगळूर स्थित टस्काबेरी कंपनी यांच्यात कांदा खरेदीसाठी साडेतीनशे कोटी रुपयांचा कृषी उद्यम संयुक्त व्यापार करार नुकताच झाला.

देवळा, जि. नाशिक : तालुक्यातील गिरणा खोरे फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी व बंगळूर स्थित टस्काबेरी कंपनी यांच्यात कांदा खरेदीसाठी साडेतीनशे कोटी रुपयांचा कृषी उद्यम संयुक्त व्यापार करार नुकताच झाला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा करार मदतगार ठरणारा आहे. 

गिरणा खोरे कंपनीचे अध्यक्ष स्वप्नील पाटील व टस्काबेरीचे  कार्यकारी संचालक धनराज पाटील यांनी हा करार घोषित केला. यावेळी संचालक योगेश आहिरे, कृषी विभागाचे ‘आत्मा’चे महेश देवरे उपस्थित होते.

कसमादे भागात कांद्याचे उत्पादन मोठया प्रमाणात घेतले जाते. जे शेतकरी या कंपनीशी जोडले जातील, त्यांना कंपनीच्या माध्यमातून किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे. पिकासाठी लागणारे बियाणे, खते, औषधे खरेदी करता येतील. यासह बांधावर ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ अशी मालाची विक्री होईल. या कराराचे शेतकऱ्यांनी स्वागत करत दहा हजार शेतकरी या कंपनीशी जोडले गेले आहेत. 

पाटील यांनी कोरोनाकाळात १४ ते १५ कोटी रुपयांचा कांदा नाफेडकरिता खरेदी करत ‘महाओनियन अभियान’ यशस्वी केले. याची दखल घेत टस्काबेरी कंपनीने गिरणा खोरे प्रोड्यूसर कंपनीशी संपर्क करून करार केला. जिल्ह्यातील कांदा उत्पादन क्षेत्र असणारे सर्व शेतकरी यात सहभागी होऊ शकतात. यामुळे जवळपास दोन ते अडीच हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. या करारानुसार कंपनी दररोज जवळपास २५० ते ३०० मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. 

बिनव्याजी एकरी २५ हजार रुपये

कांदा उत्पादन घेताना बियाणे, औषधे, खते व इतर काही बाबी घेण्यासाठी कंपनीशी जोडले गेलेल्या शेतकऱ्यांना उत्पादन खर्चासाठी बिनव्याजी एकरी २५ हजार रुपये मिळतील. ते किसान क्रेडिट खात्यात जमा करण्यात येतील. मात्र हे पैसे रोख स्वरूपात काढता येणार नाहीत. या कार्डच्या माध्यमातून संबंधित दुकानात कांदा उत्पादनासाठी लागणारे निविष्ठा बियाणे, खते, औषधे इत्यादी खरेदी करता येतील. त्यासाठी जिल्हाभर असे २० कृषी सेवा केंद्रे निर्मित होणार आहेत. 
 


इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यात अवकाळीचा १०८ हेक्टरवरील...पुणे : पुणे जिल्ह्यात १८ आणि १९ फेब्रुवारीला खेड...
खानदेशात कांदा काढणी लवकरच सुरू होणार जळगाव : खानदेशात कांद्याची लागवड सुमारे १८ हजार...
सातबारा, आठ ‘अ’च्या अधिकारासह पंतप्रधान...नाशिक : केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध...
क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी सातारा...सातारा : जिल्ह्यातील नदीकाठी क्षारपड जमिनी...
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वी ...मुंबई : ‘‘मराठा आरक्षणाचा लढा हा आता अंतिम...
विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या...सोलापूर ः पिंपळनेर (ता. माढा) येथील विठ्ठलराव...
महावितरणचे राज्यात आता 'कृषी ऊर्जा...सोलापूर ः राज्य शासनाने कृषिपंप वीजजोडणी धोरण-...
...त्यानंतर वैधानिक मंडळे घोषित करू : ...मुंबई : ‘‘ज्या दिवशी राज्यपाल नियुक्त बारा...
मानोलीत रब्‍बी ज्‍वारीची पीक प्रात्‍...परभणी ः ‘‘आहारात ज्‍वारीच्‍या भाकरीस पोषणाच्‍या...
शेळ्या-मेंढ्यांना आधुनिक औषधोपचाराची...अकोला ः भारतातील बहुसंख्य अल्पभूधारक व भूमिहीन...
रानवाडी प्रकल्पाचा वनवास केव्हा संपणार?जलालखेडा, जि. नागपूर : नरखेड तालुक्यामधील पंचायत...
उन्हाळ्यासाठी चारवेळा मिळणार ‘इसापूर’चे...नांदेड : जिल्ह्याला वरदान ठरलेला ऊर्ध्व पैनगंगा...
भातगाव येथे आंबा, काजूची बाग होरपळलीगुहागर, जि. रत्नागिरी : तालुक्यातील भातगाव येथे...
‘रोहयो’तून डाळिंब लागवडीच्या...आटपाडी, जि. सांगली ः आटपाडी तालुक्‍यात तालुका...
ताकारी योजनेच्या दुसऱ्या वितरिकेची...देवराष्ट्रे, जि. सांगली ः ताकारी योजनेच्या...
नगरला शेवगा, वांग्यांचे दर टिकून;...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
शाश्वत शेतीसाठी रेशीम उद्योग उपयुक्त ः...जालना  : ‘‘मराठवाड्यातील शाश्वत शेतीसाठी...
औषधी वनस्पतींनी वाढवा प्रतिकारशक्तीभारत हा औषधी आणि सुगंधी वनस्पतींचे आगार आहे....
शेतकरी नियोजन : पशूपालनआम्ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दूध व्यवसाय...
आठवडी बाजार बंदचा भाजीपाला उत्पादकांना...जळगाव : खानदेशात कोरोनाचे संकट पुन्हा उभे राहत...