agriculture news in marathi, millet threshing season complete, jalgaon, maharashtra | Agrowon

खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपला
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 मे 2019

जळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला आहे. बाजारातील आवक कमी होत असून, दरात क्विंटलमागे २५ रुपयांनी सुधारणा झाली. बाजरीला सुरवातीला १८०० ते २२०० रुपये क्विंटलपर्यंत दर होते. सध्या १९०० ते २२२५ रुपये क्विंटल दर जळगाव, अमळनेर, चोपडा (जि. जळगाव) व शिरपूर (जि. धुळे) येथील बाजारात मिळत आहेत. 

जळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला आहे. बाजारातील आवक कमी होत असून, दरात क्विंटलमागे २५ रुपयांनी सुधारणा झाली. बाजरीला सुरवातीला १८०० ते २२०० रुपये क्विंटलपर्यंत दर होते. सध्या १९०० ते २२२५ रुपये क्विंटल दर जळगाव, अमळनेर, चोपडा (जि. जळगाव) व शिरपूर (जि. धुळे) येथील बाजारात मिळत आहेत. 

बाजरीची पेरणी शिरपूर, चोपडा, शिंदखेडा (जि. धुळे), पाचोरा, जळगाव, जामनेर व चाळीसगाव (जि. जळगाव) या भागात बऱ्यापैकी झाली होती. आगाप पेरणीच्या बाजरीची मळणी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच सुरू झाली, तर जानेवारीच्या मध्यात पेरणी केलेल्या बाजरीची मळणी मे महिन्याच्या सुरवातीला झाली. सध्या अपवाद वगळता कुठेही मळणी, काढणी सुरू नाही. मळणीचा हंगाम जवळपास आटोपला आहे.

सुरवातीला बाजरीला कमाल २२०० रुपयांपर्यंतचे दर शिरपूर, चोपडा, जळगाव या भागात होते. नंतर किमान दर १८०० पर्यंत आले होते, परंतु जशी आवक कमी झाली, तशी दरात क्विंटलमागे २५ रुपयांनी सुधारणा मागील आठवड्यात झाली. आवक अगदी नगण्य असून चोपडा, अमळनेर व जळगाव बाजारात मिळून प्रतिदिन १०० क्विंटलपर्यंत पुरवठा होत आहे. उठाव चांगला आहे. मालेगाव, चाळीसगाव, कन्नड, सिल्लोड, सोयगाव, पाचोरा, भडगाव, शिंदखेडा, नंदुरबार, सटाणा भागात बाजरीला अधिक ग्राहक आहेत. आवक कमी असल्याने लागलीच लिलाव आटोपून शेतकऱ्यांना रोखीने पैसे मिळत आहेत. चोपडा, जळगाव बाजारात पुढील महिन्यात आवक आणखी कमी होईल, असा अंदाज आहे. यामुळे पुढे दरात आणखी सुधारणा अपेक्षित आहे.

इतर बातम्या
बीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९...उस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
वनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा...कडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...
दर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...
अवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...
महिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...