जळगाव जिल्ह्यातील बाजारात कोट्यवधींचे बियाणे पडून

जिल्ह्यातील बाजारात कोट्यवधींचे बियाणे पडून
जिल्ह्यातील बाजारात कोट्यवधींचे बियाणे पडून

जळगाव : पुरेशा पावसाअभावी जिल्ह्यातील सुमारे ४५ ते ४८ टक्के क्षेत्र नापेर अाहे. फारशी मागणी नसल्याने कोट्यवधींचे बियाणे बाजारात पडून आहे. परिणामी, सुमारे ८ ते १० कोटींचा फटका बियाणे बाजाराला बसल्याचा अंदाज आहे.

यंदा २३ लाख एवढ्या कापूस बियाण्याच्या पाकिटांची मागणी केली होती. पुरवठाही सुरळीत झाला, परंतु जूनच्या मध्यानंतर पुरेसा पाऊस नसल्याने कोरडवाहू कापूस लागवडही घटली आहे. सुमारे साडेतीन लाख हेक्‍टरवर कापूस लागवड झाली आहे. अर्थातच, जवळपास ११ लाख एवढी कापूस बियाण्यांची पाकिटे पडून आहेत. यामुळे सुमारे ३ कोटींची उलाढाल थांबली आहे. ज्वारी, सोयाबीन, तूर, उडीद, मूग यांचे सुमारे १४ हजार क्विंटल बियाणे पडून आहे. महाबीजसह राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या तागाचे बियाणेही पडून आहे. या संस्थांच्या सोयाबीन बियाण्याचीही हवी तशी उचल झालेली नसल्याची माहिती मिळाली. महाबीजने १२ हजार हेक्‍टरसाठी बीजोत्पादन कार्यक्रम राबवायचे ठरविले होते, परंतु सोयाबीनची अपेक्षित पेरणी झाली नाही. त्यामुळे महाबीजचा हा बीजोत्पादनाचा लक्ष्यांक साध्य झालेला नसल्याचे सांगण्यात आले.

यापुढे सोयाबीनची पेरणी फारशी होणार नाही. कापूस, ज्वारी, मूग व उडदाची पेरणीही होणार नाही. त्यामुळे संबंधित पिकांचे बियाणे परत पाठविण्याची तयारी कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी केली आहे. बाजरीचे बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून घेण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. काही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार महाबीजने तागाच्या बियाण्यांची पुरवठ्याची तयारी दाखविली आहे. तापी व गिरणा नदीकाठावरील काळ्या कसदार जमिनीत तागाची पेरणी अधिक होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com