agriculture news in Marathi mills from country started on 95 percent capacity Maharashtra | Agrowon

देशातील सूतगिरण्या ९५ टक्के क्षमतेने कार्यरत

टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

देशातील सुमारे ७१५ सूतगिरण्या ९५ टक्के क्षमतेने कार्यरत झाल्या आहेत. निर्यात गेल्या हंगामाच्या तुलनेत १५ टक्क्यांनी वाढली आहे.

जळगाव ः देशातील सुमारे ७१५ सूतगिरण्या ९५ टक्के क्षमतेने कार्यरत झाल्या आहेत. निर्यात गेल्या हंगामाच्या तुलनेत १५ टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे सूतगिरण्यांमधील कामकाजाला गती मिळाली आहे. गिरण्यांमध्ये रोज ८० हजार गाठींचा उपयोग होत आहे. 

देशात महाराष्ट्रात सुमारे १४०, गुजरातेत ११५, दाक्षिणात्य भागात ४४०, उत्तरेकडे सुमारे ६० सूतगिरण्या आहेत. या सर्वच सूतगिरण्या ऑगस्टमध्ये ८० टक्के क्षमतेने कार्यरत झाल्या. सध्य या गिरण्या ९५ टक्के क्षमतेने कार्यरत आहे. अर्थातच गेल्या वर्षाच्या तुलनेत सुताचा व्यापार वाढला आहे. सुताची निर्यात १५ टक्के वाढली आहे. 

देशात यंदा साडेपाच हजार कोटी किलोग्रॅम सुताचे उत्पादन अपेक्षित आहे. यातील सुमारे २० ते २१ टक्के सुताची निर्यात होईल. देशातून जेवढे सूत निर्यात होईल, त्यातील ८० टक्के सुताचा आयातदार किंवा खरेदीदार चीन असणार आहे. अर्थातच सध्या चीन, व्हीएतनाम, बांगलादेश व तुर्कीमध्ये सुताची निर्यात वेगात सुरू आहे. देशात सुताचे दर सरासरी १७५ रुपये प्रतिकिलो एवढे आहेत. 

लॉकडाऊनच्या काळात देशातील वस्त्रोद्योग पूर्णतः ठप्प होता. जूनमध्ये सूतगिरण्या, कापड मिलांची चाके गती घेवू लागली. सद्यःस्थितीत वस्त्रोद्योगात काम वेगात सुरू असून, मजूरटंचाई जाणवू लागली आहे. 

भारतीय कापूस स्वस्त
रुपया डॉलरच्या तुलनेत मंदी व इतर समस्यांमुळे कमकुवत झाला आहे. परिणामी भारतीय कापूस जगभरात स्वस्त आहे. भारतीय खंडी (३५६ किलो रुई) ३८ हजार ते ३९ हजार रुपयात मिळत आहे. तर सुतही १६५ ते १७५ आणि २०० रुपये प्रतिकिलोपर्यंत मिळत आहे. आयातदारांना भारतीय सूत परवडत आहे. यामुळे रुईसह सुताची मागणी वाढली आहे. 

देशात रोज ८० हजार गाठींचा उपयोग
देशातील सूतगिरण्यांना रुईची आवश्यकता असते. सध्या रोज किमान ८० हजार गाठींचा (एक गाठ १७० किलो रुई) उपयोग सूत निर्मितीसाठी होत आहे. वस्त्रोद्योगामध्ये स्थिती सुधारत असल्याने यंदा किमान ३०० ते ३०५ लाख गाठींचा उपयोग वस्त्रोद्योगात होईल, असेही सांगितले जात आहे. यामुळे कापसाचे दर वधारण्याचे संकेतही मिळत आहे. 

प्रतिक्रिया
आमच्या भागात वस्त्रोद्योग ९५ टक्के क्षमतेने कार्यरत आहे. यामुळे राजस्थान, पंजाब, हरियाणात कापूस खरेदीला वेग आला आहे. कापूस खरेदी सीसीआय अधिक करीत आहे. निर्यात वाढल्याने सूतगिरण्यांचे कामकाज चांगले सुरू आहे. 
- महेश सारडा, अध्यक्ष, भारतीय कापूस संघ

गेल्या वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये सूतगिरण्यांमध्ये कामकाज कमी क्षमतेत सुरू ठेवण्याची वेळ आली होती. नंतर लॉकडाऊनमध्ये तर स्थिती बिकट झाली. पण सध्या चीन, व्हीएतनाम, बांगलादेशातून सुताची चांगली मागणी सुरू आहे. यामुळे सूतगिरणीचे कामकाज वेगात सुरू आहे. 
- दीपक पाटील, अध्यक्ष, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, उंटावद-होळ (जि.नंदुरबार)


इतर अॅग्रो विशेष
पांढऱ्या कापसाचे काळे वास्तवदेशातील सूत गिरण्या आता ९५ टक्के कार्यक्षमतेने...
शेतकऱ्यांच्या कष्टाचे झाले निर्माल्यरिमझिम पाऊस, थेंब पाकळीवर पडला ओघळून जाताना...
अतिवृष्टीचा मराठवाड्यात २३ लाख हेक्टरला...औरंगाबाद : यंदा खरिपात अतिवृष्टी व सततच्या...
केळी पीक विम्याबाबत आज बैठकजळगाव ः हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी...
राज्यात पावसाचा प्रभाव कमी झालापुणे ः राज्यात गेल्या काही दिवस जोरदार पाऊस...
राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसपुणे ः राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली...
पीक विमा तक्रार निवारणासाठी कोठे जाल?राज्यात यंदा खरीप हंगामात उत्तम पेरा झाला होता....
राज्यात पावसाचा कमीअधिक जोर राहणारपुणे ः राज्यातील अनेक भागात पावसाने काहीशी उघडीप...
पणन सुधारणा कायदे शेतकरी हिताचेच!शेतीमालाच्या मार्केटमध्ये दराच्या बाबतीत कधीही...
रिसोर्स बॅंक ः स्तुत्य उपक्रमहवामान बदलाच्या चरम सीमेवर आता आपण आहोत. खरे तर...
कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...मुंबई : कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...
‘बायोमिक्स’ विक्रीतून कृषी विद्यापीठाला...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
जरासं पहा ना साहेब, पाणीच पाणी वावरात...परभणी ः सदोष बियाण्यांमुळे दुबार, तिबार पेरणी...
परतीचा मॉन्सून राज्यातून चार दिवसांत...पुणे ः परतीच्या पाऊस सुरू असताना बंगालच्या...
कृषी कायद्यांविरोधात पंजाबकडून स्वतंत्र...चंडीगड : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...
खारपाणपट्ट्यातील समस्यांवर...दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या...
सुर्डीतील तरुणांनी तेरा पाझर तलावांना...वैराग, जि. सोलापूर ः ‘वॉटर कप’ स्पर्धेत राज्यात...
कापूस विक्रीसाठी नोंदणी थांबविलीजळगाव ः शासकीय केंद्रात कापूस विक्रीसाठी बाजार...
प्रयोगशील दुग्ध व्यवसायातून पुढारले...माळीसागज (जि. औरंगाबाद) गावात कोरडवाहू क्षेत्र...
पाच हजार शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांवर सातत्याने...