देशातील साखर कारखाने ३१.५ कोटी इथेनॉल पुरविणार 

ethanol
ethanol

नवी दिल्ली: देशातील साखर कारखान्यांनी तेल विपणन कंपन्यांना दुसऱ्या टप्प्यात ३१.५ कोटी लीटर इथेनॉल पुरवठ्याची तयारी दर्शविली आहे. दुसऱ्या टप्प्यातील करार सहा फेब्रुवारीला संपले, अशी माहिती कारखान्यांच्या सूत्रांनी दिली. 

देशातील सरकारी तेल विपणन कंपन्यांनी जानेवारीत २५३ कोटी लीटर इथेनॉल खरेदीसाठी कारखान्यांकडून निविदा मागविल्या होत्या. ‘‘इथेनॉल पुरवठ्यासाठी देशातील ४८ कारखान्यांनी तयारी दर्शविली होती. यापैकी दोन कारखान्यांचे प्रस्ताव अपुऱ्या कागदपत्रांमुळे अमान्य करण्यात आले. या साखर कारखान्यांनी ३१.५ कोटी लीटर इथेनॉल पुरवठ्याची तयारी दर्शविली आहे,’’ अशी माहिती उत्तर प्रदेशातील एका कारखान्याच्या सूत्रांनी दिली. 

‘‘देशातील साखर कारखान्यांनी इथेनॉल पुरवठ्याची तयारी दर्शविली असली तरीही यंदा इथेनॉलची उपलब्धता खूपच आहे. २०१८ मध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकात पडलेला दुष्काळ आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१९ मध्ये आलेला पूर यामुळे यंदा ऊस उपलब्धता कमी आहे. याचा परिणाम इथेनॉल निर्मितीवर झाला आहे. गाळपासाठी कमी ऊस उपलब्ध असल्याने आणि पुरात राहिलेल्या उसाचा दर्जा खालावल्याने कारखान्यांना तुटवडा भासत आहे. 

दुसऱ्या टप्प्यात देशातील साखर कारखान्यांनी पुरवठ्याची तयारी दर्शविलेल्या इथेनॉलपैकी ९.५ कोटी लीटर इथेनॉल बी-हेव्ही मोलॅसिसपासून तयार होणार आहे. तर सी-हेव्ही मोलॅसिसपासून ६.९ कोटी लीटर इथेनॉल पुरवठा होणार आहे. ३.५ कोटी लीटर १०० टक्के उसाच्या रसापासून आणि ११.४ कोटी लीटर धान्यापासून तयार करण्यात येणार आहे.  पहिल्या टप्प्यात केवळ १६३ कोटी लिटरचा पुरवठा  तेल कंपन्यांनी सप्टेंबर महिन्यात इथेनॉल खरेदीसाठी तयारी दर्शविली होती. तेल कंपन्यांनी या वेळी ५११ कोटी लीटर इथेनॉलखरेसाठी निविदा मागविल्या होत्या. परंतु, देशातील साखर कारखान्यांनी केवळ १६३ कोटी लीटर इथेनॉल पुरवठ्याची तयारी दर्शविली होती. केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण बंधनकारक केल्याने भारत पेट्रोलियम कॉर्पो., इंडियन ऑईल कॉर्पो. आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पो. या कंपन्या सरकारने ठरवून दिलेल्या दराने कारखान्यांकडून इथेनॉल खरेदी करतात.  उत्तर प्रदेशातून होणार सर्वाधिक पुरवठा  उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांनी १०.९ कोटी लीटर इथेनॉल पुरवठ्याची तयारी दर्शविली आहे. तर पंजाब ६.६७ कोटी आणि कर्नाटकातून ५.०१ कोटी लीटर पुरवठा होणार आहे. महाराष्ट्रातील कारखाने ४ कोटी, हरियानातून ३.१ कोटी, बिहारमधून १.१ कोटी तर गुजरातमधून ०.१७ कोटी लीटर इथेनॉलचा पुरवठा होणार आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com