केळीच्या दरात किरकोळ सुधारणा

केळीच्या दरात किरकोळ सुधारणा
केळीच्या दरात किरकोळ सुधारणा

जळगाव : केळीच्या दरात मागील दोन दिवसात अल्प सुधारणा झाली असून, दर क्विंटलमागे २० रुपयांनी सुधारले. नवती केळीचे दर ९२० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले. बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील बाजारात केळीला जाहीर लिलावात मंगळवारी (ता.१५) ११२० क्विंटलचा दर मिळाला.

केळी दरात थंडीसह इतर समस्यांमुळे मागील दीड महिन्यापासून चढउतार होत आहेत. या दरांमधील चढउतारांमुळे केळी उत्पादकांना हवे तसे दर मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. चोपडा, जळगाव या तालुक्‍यांमध्ये केळीची काढणी जवळपास आटोपली आहे. पुढील काही दिवसांमध्ये कांदेबाग केळीखालील क्षेत्र रिकामे केले जाईल. चोपडा तालुक्‍यातील वढोदा, मोहिदे, दगडी, अजंतीसीम, विटनेर, घोडगाव, वेळोदा आणि लगतच्या शिरपूर (जि.धुळे) तालुक्‍यातील अजंदे, घोडसगाव, होळनांथे, तरडी भागातही कांदेबाग केळीची काढणी झाली आहे. चोपडा व जळगावातील केळीची आवक घटली आहे. 

मागील दोन-तीन दिवसांपासून केळीची प्रतिदिन ११० ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टनक्षमता) आवक होत आहे. नोव्हेंबर महिन्यात जळगाव, चोपडा तालुक्‍यातील कांदेबाग केळीची आवक प्रतिदिन २५० ट्रकपर्यंत होती. मागील दोन दिवसांत सुधारणा होऊन दर ८७० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले, अशी माहिती शेतकरी रवींद्र पाटील (अजंतीसीम, जि.जळगाव) यांनी दिली. जळगाव व चोपडा तालुक्‍यांसाठी कांदेबाग केळीचे स्वतंत्र दर जाहीर केले जात आहेत. रावेरात ते बुधवारी (ता.१६) ९२० रुपये प्रतिक्विंटल होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com