पीक लागवड खर्चावर आधारित हमीभाव द्यावा

शेतकरी आत्महत्या करतात. त्याची दखल घेत शेतकऱ्यांना लागवड खर्चावर आधारित दर मिळावा, अशी मागणी किसान संघ भंडाराच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
Minimum Support Prices took on planting cost
Minimum Support Prices took on planting cost

भंडारा : बाजारात आवक वाढताच शेतीमालाचे दर कमी होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत असल्याने नकारात्मकता वाढीस लागते. त्यातूनच शेतकरी आत्महत्या करतात. त्याची दखल घेत शेतकऱ्यांना लागवड खर्चावर आधारित दर मिळावा, अशी मागणी किसान संघ भंडाराच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. 

निवेदनानुसार, महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांमध्ये सातत्याने वाढ नोंदविण्यात आली आहे. राज्यात अपेक्षित प्रमाणात सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील मोठे क्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. नजीकच्या काळात वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याने शेतकऱ्यांना सातत्याने नैसर्गिक मार सोसावा लागतो. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ पडत असल्याने उत्पादकता देखील अनिश्चित झाली आहे. ही सर्व संकटे झेलत शेतकरी शेतमाल उत्पादन करतो. हा उत्पादित शेतमाल बाजारात आल्यानंतर जाणीवपूर्वक दर पाडण्याचे काम होते. त्यामुळे खर्चावर आधारित हमी भाव देण्याची तरतूद करावी, अशी मागणी किसान संघाने केली आहे. 

निवेदन देतेवेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र पांडे, पराग ठक्कर, शेषराव निखाडे, विलास केसरकर, सुनील मनापुरे, प्रमोद भुते,  उपस्थित होते

भाताला तीन हजार रुपये दर द्यावा भंडारा जिल्ह्यात भात हे प्रमुख पीक आहे. केंद्र शासन व राज्य शासन यांनी मिळून शेतकरी हिताचा विचार करता धानाला बोनस वगळून सरसकट तीन हजार रुपये प्रति क्‍विंटलचा दर द्यावा, असेही किसान संघाने निवेदनात म्हटले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com