Agriculture news in marathi The minimum temperature is above average | Agrowon

किमान तापमान सरासरीच्या वरच

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

पुणे : राज्यात असलेल्या ढगाळ हवामानामुळे गारठा कमी झाला आहे. शनिवारी (ता. २३) राज्याच्या बहुतांशी भागात किमान तापमानाचा पारा सरासरीच्या वरच आहे. पूर्व विदर्भातील यवतमाळ येथे राज्यातील नीचांकी १४.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.  

मॉन्सूनचा मुक्काम वाढल्याने थंडीचा हंगामही लांबला आहे. उत्तर भारतातील राज्यामध्ये अद्याप कडाक्याची थंडी पडलेली नाही. मध्य प्रदेशातील बेतूल येथे देशाच्या सपाट भूभागावरील १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पुणे : राज्यात असलेल्या ढगाळ हवामानामुळे गारठा कमी झाला आहे. शनिवारी (ता. २३) राज्याच्या बहुतांशी भागात किमान तापमानाचा पारा सरासरीच्या वरच आहे. पूर्व विदर्भातील यवतमाळ येथे राज्यातील नीचांकी १४.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.  

मॉन्सूनचा मुक्काम वाढल्याने थंडीचा हंगामही लांबला आहे. उत्तर भारतातील राज्यामध्ये अद्याप कडाक्याची थंडी पडलेली नाही. मध्य प्रदेशातील बेतूल येथे देशाच्या सपाट भूभागावरील १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येत नसल्याने राज्यातही अद्याप कडाका वाढलेला नाही. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. तर विदर्भातील अमरावती, गोंदिया, यवतमाळ वगळता काही ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या वरच आहे.

शनिवारी (ता. २३) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे १६.९ (३), जळगाव १६.४(३), कोल्हापूर १८.३(१), महाबळेश्वर १५.१(१), मालेगाव १७.६ (५), नाशिक १६.३ (४), सांगली १९.१ (३), सातारा १६.० (१), सोलापूर १८.१ (१), अलिबाग २२.९ (३), डहाणू २३.३ (३), सांताक्रूझ २३.६ (३), रत्नागिरी २३.० (२), औरंगाबाद १५.३ (२), परभणी १५.५ (१), नांदेड १६.५ (३), अकोला १५.५ (०), अमरावती १५.४ (-१), बुलडाणा १६.५ (०), चंद्रपूर १७.४ (२), गोंदिया १४.८ (-१), नागपूर १५.१ (१), वर्धा १६.४ (१), यवतमाळ १४.० (-२). 


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या...
वाकुर्डे योजनेसाठी ७०० कोटींची गरजसांगली : शिराळा व वाळवा तालुक्यासाठी वरदान ठरणारी...
खानदेशात कांदा आवक स्थिर; दरात चढउतारजळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
खरीप पीकविम्यापासून शेतकरी वंचितजळगाव  ः खरिपात पिकांचे अतिपावसाने अतोनात...
‘सन्मान निधी’च्या लाभासाठी ‘आधार लिंक’...अकोला  ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या...
रत्नागिरी जिल्ह्यात नियोजनाचा आराखडा...रत्नागिरी ः जिल्हा नियोजन समितीचा आराखडा २०१...
नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील चार...नांदेड : इसापूर येथील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प,...
काळवंडलेल्या ज्वारीची हमीभावाने खरेदी...अमरावती  ः जिल्ह्यात पावसामुळे काळवंडलेल्या...
नाशिक येथे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष...नाशिक  : नाशिक विभागातील सर्वसामान्य जनेतेचे...
व्हिडिओतील छेडछाड भोवली; प्रभारी सहकार...मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सापडलेले पाच हजार रुपये शेतकऱ्याने केले...सातारा ः सामाजातील प्रामाणिकपणा हरवत चालला...
नगराध्यक्षांची निवड नगरसेवकांमधून...मुंबई : नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या...
सातारा जिल्ह्याच्या विकासात सर्वांनी...सातारा  : चालू आर्थिक वर्षात विविध...
सावकारांकडे गहाण ठेवलेले सोन्याचे...अकोला ः वर्षानुवर्षे सावकारांकडे गहाण पडून असलेले...
कृषिमंत्री पाठविणार चार हजार सरपंचांना...मुंबई : बदलत्या हवामानास तोंड देण्यासाठी गाव अधिक...
अनिल कवडे सहकार; सौरभ राव साखर आयुक्तमुंबई : अरविंद कुमार यांची ग्रामविकास विभागाच्या...
दर्जेदार केळी उत्पादनाचे तंत्रकेळी घडातील फळांच्या आकारात एकसमान बदल होऊन घड...
पुरंदर तालुक्यातून डाळिंबाची युरोपात...गुळुंचे, जि. पुणे : कर्नलवाडी (ता. पुरंदर) येथील...
आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याचा...कोल्हापूर : ‘रयत अ‍ॅग्रो’च्या कडकनाथ कोंबडीपालन...
द्राक्ष सल्ला : तापमानातील चढ-उताराचे...सध्याच्या तापमानाचा विचार करता द्राक्षबागेत...