किमान तापमानात घट शक्य 

अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत आहे. यातच वाऱ्याचा वेग वाढल्याने किमान आणि कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. आजपासून (ता. २४) राज्याच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Minimum temperature drop possible
Minimum temperature drop possible

पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत आहे. यातच वाऱ्याचा वेग वाढल्याने किमान आणि कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. आजपासून (ता. २४) राज्याच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  राजस्थान आणि परिसरावर वरील कमी दाबाचे क्षेत्र निवळल्यानंतर आजपासून (ता. २४) वायव्य भारतात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. यातच गुजरात, पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, राजस्थान या राज्यामध्ये थंडीची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. हे थंड वारे महाराष्ट्राकडे येणार असल्याने राज्याच्या किमान तापमानात २ ते ४ अंशांची घट होण्याचा अंदाज आहे.  दरम्यान अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात धुके आणि ढगाळ हवामान झाल्याने सुर्यदर्शन झाले नाही. तसेच दिवसाच्या कमाल तापमानात घट झाल्याचे दिसून आले. रविवारी (ता. २३) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नीचांकी १० अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे उच्चांकी ३३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

रविवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :  पुणे २८.० (१७.२), धुळे ३०.० (११.५), जळगाव ३०.५ (१४.०), कोल्हापूर २८.९ (१८.८), महाबळेश्वर २१.७(११.९), मालेगाव - (१२.८), नाशिक २५.५ (१४.८), निफाड २५.६ (१०.० ), सांगली ३०.९ (१७.७), सातारा २९.८(१३.६), सोलापूर ३३.६ (१५.३), सांताक्रूझ २९.७(२१.०), डहाणू ३०.१ (२०.०), रत्नागिरी २९.८ (२०.५), औरंगाबाद २८.० (१५.४), नांदेड ३१.० (१६.६), उस्मानाबाद - (१६.०), परभणी ३०.५ (१६.१), अकोला ३०.४ (१५.७), अमरावती २९.२ (१४.३), बुलडाणा २८.० (१४.६), ब्रह्मपुरी ३०.९ (१८.०), चंद्रपूर ३०.४ (-), गडचिरोली ३०.१(११.२), गोंदिया २९.८ (१५.६), नागपूर ३०.० (१५.५), वर्धा ३०.०(१५.४), वाशीम ३०.० (१२.०), यवतमाळ ३०.५ (१६.०).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com