किमान तापमानात वाढ

रब्बी कर्जवाटपाचे नियोजन कोलमडले
रब्बी कर्जवाटपाचे नियोजन कोलमडले

पुणे  : ‘पेथाई’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सोमवारी पावसाने हजेरी लावली. मंगळवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यांसह पूर्व विदर्भात विविध ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस झाला. पावसाला पोषक हवामानामुळे किमान तापमानात थोडीशी वाढ झाली. आजपासून (ता.१९) राज्यात मुख्यत: निरभ्र हवामानसह, तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  बंगालच्या उपसागरातील ‘पेथाई’ चक्रीवादळ सोमवारी (ता. १७) आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकले. त्यामुळे विदर्भासह, मराठवाड्यात ढगाळ हवामान होते. पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या भिजपावसाने हजेरी लावली. मंगळवारी चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन ओडिशाच्या किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होते. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मंगळवारी विदर्भात हलके ढग होते. तर उत्तरेकडील वाऱ्यांवरही प्रभाव पडत असल्याने राज्यातील थंडी कमी अधिक होत आहे. मंगळवारी सकाळी जळगाव येथे नीचांकी ९ अंश सेल्सिअस, तर नाशिक येथे ९.५ अंश सेल्सिअस तापमानाची तापमानाची नोंद झाली.  मंगळवारी (ता. १८) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ११.२ (०), जळगाव ९.० (-३), कोल्हापूर १५.५ (१), महाबळेश्‍वर ११.६ (-२), मालेगाव १०.८ (-१), नाशिक ९.५ (-१), सांगली १२.६ (-१), सातारा ११.९ (-१), सोलापूर १६.१ (१), सांताक्रूझ १७.८ (-१), अलिबाग १८.६ (०), रत्नागिरी १७.८ (-२), डहाणू १६.७ (-१), आैरंगाबाद ११.४ (०), परभणी १५.६ (-१२), नांदेड १५.० (३), उस्मानाबाद १४.७, अकोला १३.६ (१), अमरावती १३.२ (-२), बुलडाणा १२.० (-२), चंद्रपूर १३.६ (१), गोंदिया १२.० (०), नागपूर १५.० (३), वर्धा १६.० (३), यवतमाळ १३.४ (-१).  मंगळवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये, स्रोत- कृषी विभाग) :   नागपूर : भिवापूर १०, मंधाळ १०. गोंदिया : गोंदिया १९, आमगाव १८, ठाणा १६, देवरी २४. चंद्रपूर : चिमूर १०, बह्मपुरी १३, कोपर्णा १४, सावळी १३, पाथरी ११, विहाड १३, पाटण १६. गडचिरोली : गडचिरोली २५, पोरळा २२, येवळी २३, ब्राह्मणी २५, कुरखेडा १५, पुराडा २०, काढोली २४, अरमोरी १६, चामोर्शी १५, कुंघाडा १३, आष्टी ११, सिरोंचा १८, बामणी २२, पेंटीपका १५, असारळी २१, आहेरी १८, जिमलगट्टा १०, अल्लापाल्ली २२, पेरमिली ११, एटापल्ली ३१, कासंसूर १७, जरावंडी १९, गाट्टा २३, धानोरा ३१, मुरूमगाव ३८, पेंढरी २०, कोर्ची २३, बेडगाव २०, कोटगुळ २८, देसाईगंज १९, शंकरपूर २३, मुलचेरा १३, तरडगाव ३३, भामरागड ४२.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com