agriculture news in Marathi minimum temperature increased in state Maharashtra | Page 2 ||| Agrowon

किमान तापमानात वाढ 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 जानेवारी 2021

राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ वातावरण झाले आहे. यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे.

पुणे ः राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ वातावरण झाले आहे. यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. विदर्भाच्या भागात हवामान कोरडे असल्याने किंचित थंडी आहे. सोमवारी (ता.१८) सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे नीचांकी १०.६ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

देशातील वातावरणात वेगाने बदल होत आहे. गेल्या आठवड्यात उत्तर भारतात झालेल्या पावसामुळे किमान तापमानाचा पारा अचानक वाढला होता. त्यानंतर त्यात घट होऊन तो ६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता. मात्र, मागील तीन दिवसापासून अरबी समुद्राच्या ईशान्य भाग आणि सौराष्ट्र परिसरात समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्रिवादळासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे.

याशिवाय ईशान्य मॉन्सूनसाठी दक्षिण भारतातील तमिळनाडू, पुदूचेरी आणि कराईकल, केरळ आणि माहे व परिसर व आंध्र प्रदेशची किनारपट्टी आणि यानाम, रायलसिमा, कर्नाटकाचा दक्षिण भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. यामुळे आज (ता.१९) या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच अरबी समुद्राच्या दक्षिण भाग आणि हिंदी महासागर परिसरात चक्रिय वाऱ्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. तर कोमोरिन परिसरातही कमी दाबाचे क्षेत्र असून समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर 
चक्रिय वाऱ्यासाठी पोषक स्थिती बनत आहे. 

सोमवारी (ता.१८) सकाळपर्यंत विविध शहरातील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः 

 • मुंबई (सांताक्रुझ) २०.२ (३) 
 • अलिबाग २०.७ (३) 
 • रत्नागिरी २१.९ (३) 
 • डहाणू १८.२ (१) 
 • पुणे १८.१ (७) 
 • जळगाव १८.७ (७) 
 • कोल्हापूर २०.८ (५), 
 • महाबळेश्वर १६.८ (३) 
 • मालेगाव १८.६ (८) 
 • नाशिक १६.५ (६) 
 • सांगली २०.१ (६) 
 • सातारा २०.६ (७) 
 • सोलापूर १९.२ (३) 
 • औरंगाबाद १८.२ (६) 
 • बीड १२.२ (२) 
 • परभणी १७.४ (३) 
 • नांदेड १७.० (३) 
 • उस्मानाबाद १६.४ (२) 
 • अकोला १८.० (४) 
 • अमरावती १७.३ (३) 
 • बुलडाणा १९.४ (५) 
 • गोंदिया १०.६ (-३) 
 • नागपूर १४.२ (१) 
 • वर्धा १४.६ (१) 
 • यवतमाळ १८.१ (२) 

इतर अॅग्रो विशेष
उत्पादन, दर्जावाढीसाठी आंबा पुनरुज्जीवन...चांदोर (ता. जि. रत्नागिरी) येथील दत्ताराम राघो...
सैनिकाने केले बीजोत्पादनाचे तंत्र...भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्तीनंतर तांभेरे (ता....
पाकिस्तानची भारतीय कापसाला पसंती जळगाव ः पाकिस्तान कापसासाठी भारताच्या दारात...
शेतकऱ्यांची वीज तोडणार नाही ः ...मुंबई ः हवे तर सरकारने चार-पाच हजार कोटी रुपयांचे...
कृषी संचालक ‘कॅबिन’ बाहेर पडले पुणे ः राज्याच्या कृषी आयुक्तालयात बसलेल्या...
ऊन वाढण्यास प्रारंभ पुणे ः अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी...
कोकणात यंदा उन्हाचा पारा चढणार पुणे : राज्यातील अनेक भागांत उन्हाचा चटका वाढू...
नवती केळीचे दर १३५० रुपये प्रतिक्विंटल जळगाव ः खानदेशात नवती केळीचे दर वधारून कमाल १३५०...
बाजारबंद, वेळांच्या निर्बंधांचा ...अकोला ः कोरोनामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या...
द्राक्ष व्यापारी नोंदणीला यंदाही...सांगली ः हंगामात द्राक्षाची खरेदी करण्यासाठी...
फळबाग लागवडीसाठी निधी देणार : दादा भुसेमुंबई : राज्यातील फळबाग लागवडीसाठी निधीची कमतरता...
तंत्रज्ञानाच्या जोरावर रेशीम उद्योग...रेशीम शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाल्याने...
पाण्याच्या अंदाजपत्रकात पशुधनाचा विचार...भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी...
कोरोनामुळे अंतिम टप्प्यातील ऊस हंगाम...कोल्हापूर : राज्यातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात...
बेदाणा निर्यात अनुदान बंदचा उत्पादकांना...सांगली ः गतवर्षी देशातून बेदाण्याची सुमारे ३०...
कृषी सहायकांची बैठक व्यवस्था योजना...नागपूर ः गावपातळीवर ग्रामविस्ताराला चालना मिळावी...
डिझेल दरवाढीने पीक काढणीचे दर वाढलेअकोलाः गेल्या काही दिवसांत डिझेलचे दर सातत्याने...
‘माफसू’तील प्राध्यापकांना सातवा वेतन...नागपूर : महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान...
शेतमाल बाजारपेठेसाठी सरकारचे विशेष...मुंबई : ‘विकेल ते पिकेल’ या अभियानामध्ये पीक,...
गारपीटीने कांदा पातींसह स्वप्नेही तुटली...नाशिक : अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामात अनेक कारणांनी...