आज महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीतील समस्या वाढत आहेत.
बातम्या
किमान तापमानात वाढ
राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ वातावरण झाले आहे. यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे.
पुणे ः राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ वातावरण झाले आहे. यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. विदर्भाच्या भागात हवामान कोरडे असल्याने किंचित थंडी आहे. सोमवारी (ता.१८) सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे नीचांकी १०.६ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
देशातील वातावरणात वेगाने बदल होत आहे. गेल्या आठवड्यात उत्तर भारतात झालेल्या पावसामुळे किमान तापमानाचा पारा अचानक वाढला होता. त्यानंतर त्यात घट होऊन तो ६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता. मात्र, मागील तीन दिवसापासून अरबी समुद्राच्या ईशान्य भाग आणि सौराष्ट्र परिसरात समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्रिवादळासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे.
याशिवाय ईशान्य मॉन्सूनसाठी दक्षिण भारतातील तमिळनाडू, पुदूचेरी आणि कराईकल, केरळ आणि माहे व परिसर व आंध्र प्रदेशची किनारपट्टी आणि यानाम, रायलसिमा, कर्नाटकाचा दक्षिण भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. यामुळे आज (ता.१९) या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच अरबी समुद्राच्या दक्षिण भाग आणि हिंदी महासागर परिसरात चक्रिय वाऱ्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. तर कोमोरिन परिसरातही कमी दाबाचे क्षेत्र असून समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर
चक्रिय वाऱ्यासाठी पोषक स्थिती बनत आहे.
सोमवारी (ता.१८) सकाळपर्यंत विविध शहरातील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः
- मुंबई (सांताक्रुझ) २०.२ (३)
- अलिबाग २०.७ (३)
- रत्नागिरी २१.९ (३)
- डहाणू १८.२ (१)
- पुणे १८.१ (७)
- जळगाव १८.७ (७)
- कोल्हापूर २०.८ (५),
- महाबळेश्वर १६.८ (३)
- मालेगाव १८.६ (८)
- नाशिक १६.५ (६)
- सांगली २०.१ (६)
- सातारा २०.६ (७)
- सोलापूर १९.२ (३)
- औरंगाबाद १८.२ (६)
- बीड १२.२ (२)
- परभणी १७.४ (३)
- नांदेड १७.० (३)
- उस्मानाबाद १६.४ (२)
- अकोला १८.० (४)
- अमरावती १७.३ (३)
- बुलडाणा १९.४ (५)
- गोंदिया १०.६ (-३)
- नागपूर १४.२ (१)
- वर्धा १४.६ (१)
- यवतमाळ १८.१ (२)
- 1 of 1543
- ››