agriculture news in Marathi minimum temperature may be increased Maharashtra | Agrowon

किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

पुणे : राज्यात कमाल व किमान तापमानात सातत्याने वाढ होत आहे. फेब्रुवारी महिन्यातच काही ठिकाणी कमाल तापमान ३५ अंशांच्या पुढे, तर बहुतांशी ठिकाणी किमान तापमान १५ अंशाच्या पुढे गेले आहे. सोमवारी (ता. १७) सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. थंडीही गायब झाली असून, बुधवारपर्यंत (ता. १८) किमान तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पुणे : राज्यात कमाल व किमान तापमानात सातत्याने वाढ होत आहे. फेब्रुवारी महिन्यातच काही ठिकाणी कमाल तापमान ३५ अंशांच्या पुढे, तर बहुतांशी ठिकाणी किमान तापमान १५ अंशाच्या पुढे गेले आहे. सोमवारी (ता. १७) सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. थंडीही गायब झाली असून, बुधवारपर्यंत (ता. १८) किमान तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

निरभ्र आकाशामुळे राज्याच्या कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. बहुतांशी ठिकाणी तापमान तिशीपार गेल्याने उन्हाचा चटका असह्य होत आहे. उत्तरेकडून थंड वारे न आल्याने यंदा गारठा कमीच आहे.

दिवसाबरोबरच रात्रीही उकाडा वाढला आहे. पहाटेच्या वेळी काही ठिकाणी धुके पडत आहे. सोमवारी (ता.१७) निफाड व नागपूर येथे राज्यातील नीचांक १२.० अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात कमाल तापमान ३० ते ३६ अंश तर किमान तापमान १५ ते २० अंशांदरम्यान आहे.  

सोमवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३३.६(१६.१), नगर -(१५.३), जळगाव ३४.०(१७.०), कोल्हापूर ३३.७(१९.६), महाबळेश्‍वर ३०.२(१७.५), मालेगाव ३३.६, नाशिक ३१.५(१५.९), निफाड ३०.०(१२.०), सांगली ३५.२(१८.४), सातारा ३४.१(१६.८), सोलापूर ३६.३(२०.२), अलिबाग - (२०.५), डहाणू ३१.२(२०.७), सांताक्रूझ ३२.६(१९.८), रत्नागिरी ३३.१(१९.६), औरंगाबाद ३२.८(१७.४), परभणी ३४.५(१६.४), नांदेड ३३.०(१५.०), अकोला ३४.६(१५.७), अमरावती  ३३.६(१६.६), बुलडाणा ३१.०(१७.४), चंद्रपूर ३३.५(१४.०), गोंदिया २९.४(१२.४), नागपूर ३२.१(१२.०), वर्धा  ३२.०(१५.६), यवतमाळ ३१.५(१७.०).


इतर अॅग्रो विशेष
राज्यात दिवसभरात १५० नवीन रुग्ण, १२...पुणे : राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या...
शेतीमाल थेट विक्रीचा समन्वय भक्कम केला...नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर संचारबंदी...
राज्यात शुक्रवारपासून वादळी पावसाचा...पुणे  : राज्यात उन्हाचा ताप वाढत असल्याने...
कृषी रसायन कंपन्यांचा कच्चा माल अडकलापुणे  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लागू...
व्यावसायिक चातुर्यातून ४० टन कलिंगडाची...कोरोना संकटामुळे शेतमाल विक्री व्यवस्था अडचणीत...
गोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात...सोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५...
‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत...नाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव...
राज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण;...पुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची...
मराठवाड्यात १०० वर लघु मध्यम प्रकल्प...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ लघु, मध्यम, मोठ्या...
रब्बी कांदा उत्पादन २५ लाख टनांनी वाढणारपुणे : देशाच्या कांदा बाजारपेठांमध्ये यंदाच्या...
भाजीपाल्याच्या नव्या लागवडीबाबत संभ्रम...कोल्हापूर : ‘कोराना’च्या संकटामुळे गेल्या काही...
अर्धबंदिस्त शेळीपालनाने वाढवले शेतीचे...कृषी विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर...
पूर्व विदर्भात पावसाला पोषक हवामानपुणे  : राज्यात तापमानाचा पारा सातत्याने...
`अमूल`कडून शेतकऱ्यांना मंदीतही २००...पुणे : राज्यातील डेअरी उद्योग सध्या अतिशय बिकट...
राज्यात कोरोना रुग्णसंख्या ७४८;...मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला...
केंद्र सरकारकडून रासायनिक खत अनुदानात...पुणे: ऐन लॉकडाऊनच्या गोंधळात केंद्र सरकारने...
शेतकरी कंपन्यांची संकलन केंद्रे...पुणे:  ‘ई-नाम’ प्रणालीत गेल्या दोन...
कोरोनामुळे हापूस अडचणीत; मुंबई बाजार...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी...
कोरोनामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन; पुणे...पुणेः गेल्या काही वर्षात जिल्‍ह्यातील जुन्नर, खेड...
कोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून...कोल्हापूर : येथील कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या...