Agriculture news in marathi Minimum temperature rise in Khandesh | Agrowon

खानदेशातील किमान तापमानात वाढ

टीम ॲग्रोवन
मंगळवार, 14 जानेवारी 2020

जळगाव : खानदेशात यंदा हुडहुडी भरविणारी थंडी दोन-चार दिवसांचा अपवाद वगळता पडलेली नाही. उशिराच्या रब्बी हंगामाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. किमान तापमानात मागील दोन दिवस सतत वाढ नोंदविली गेली आहे. 

जळगाव : खानदेशात यंदा हुडहुडी भरविणारी थंडी दोन-चार दिवसांचा अपवाद वगळता पडलेली नाही. उशिराच्या रब्बी हंगामाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. किमान तापमानात मागील दोन दिवस सतत वाढ नोंदविली गेली आहे. 

धुळे येथील कृषी महाविद्यालयात मागील आठवड्यात किमान तापमानाची नोंद पाच अंश सेल्सीअसपर्यंत झाली होती. तर, जळगाव येथील कृषी संशोधन केंद्रातही दोन दिवस किमान तापमानाची नोंद १२ अंश सेल्सीअसपर्यंत झाली आहे. मागील मोसमात खानदेशात किमान तापमान दोन अंश सेल्सीअसपर्यंत खाली आले होते. यामुळे गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांचे चांगले उत्पादनही हाती आले होते. सिंचनासाठी पाण्याची गरजही कमी झाली होती. परंतु, यंदा मात्र किमान तापमान फक्त धुळे जिल्ह्यात काही दिवस पाच अंश सेल्सीअसपर्यंत खाली आले. 

जळगाव जिल्ह्यात मात्र किमान तापमान या मोसमात आतापर्यंतदेखील आठ अंश सेल्सीअसखाली आलेले नाही. मध्येच ढगाळ वातावरण तयार होते. यामुळे थंडीचे प्रमाण या मोसमात कमी दिसत असल्याचे जाणकारांचे मत आहे. 

थंडी मागील दोन दिवसांत कमी झाली आहे. मध्यंतरी तापमान घसरू लागताच शेतकऱ्यांनी केळी बागांचे थंडीपासून बचावासंबंधी व्यवस्थापन हाती घेतले होते. त्यात रात्रीच्या वेळेस सिंचनावर शेतकरी भर देत होते. परंतु, थंडी कमी होत असल्याने केळी उत्पादकांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे. परंतु, हरभरा, ज्वारी, उशिरा पेरणीचा गहू आदी पिकांसाठी थंडी अधिक हवी आहे. ती किमान फेब्रवारीच्या अखेरपर्यंत टिकून राहावी, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

थंडीअभावी लष्करी अळी 

येत्या बुधवारी (ता.१५) मकर संक्रांतीचा सण आहे. यानंतर थंडी आणखी कमी होत जाईल. यामुळे रब्बी पिके हवी तशी येणार नाहीत. यातच मका, ज्वारीवर अनेक भागात लष्करी अळी दिसत आहे. अधिक थंडी असली, तर ही अळी आटोक्‍यात येईल, असे शतकरी म्हणाले. 


इतर बातम्या
नरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी...अकोला  : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण...
पीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव...येत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा...
मंगळवेढ्यात डाळिंबाच्या सौद्यांना...मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा कृषी उत्पन्न...
अकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘...अकोला  ः जिल्ह्यातील सात गावांची राज्य...
वाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती...वाशीम : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी...नाशिक : ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न...
पूर्णा येथे रेशीम कोषास प्रतिकिलोस ५१५...परभणी : पूर्णा (जि. परभणी) येथील रेशीम कोष...
सांगलीत ‘माणगंगा’वर ताब्याच्या...सांगली : आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर...
सोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५...सोलापूर : जिल्ह्याच्या सन २०२०-२०२१ च्या जिल्हा...
सूक्ष्म सिंचन साधनांमुळे आदिवासी शेतकरी...हिंगोली : ‘‘वसंतराव नाईक मराठावाडा कृषी...
मोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌...अमरावती  ः शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न...
प्राप्त निधी वेळेत खर्च करा : भुजबळ नाशिक : ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त...
सोलापूरजिल्ह्याच्या ३४९.८७ कोटींच्या...सोलापूर : जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक...
सांगली जिल्ह्यातून डाळिंब निर्यातीसाठी...सांगली ः जिल्ह्यातून गतवर्षी ८०० टन डाळिंबाची...
खानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पटजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची स्थिती...
‘व्हीएसआय’ची आंतरराष्ट्रीय साखर परिषद...पुणे: वसंतदादा साखर संस्थेच्या वतीने आयोजित...
वाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा...भंडारा  ः वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घटऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमध्ये हिटऐवजी पावसाचे आगमन...
धोरणात्मक निर्णय, सिंचनाच्या सुविधेमुळे...नवी दिल्ली: धोरणात्मक निर्णय आणि पुढाकार;...
इथेनॉल प्रकल्पासाठी ३६ कारखान्यांनाच...नवी दिल्ली: पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल...