पावसाला पोषक हवामानामुळे किमान तापमानात वाढ शक्य 

पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या किमान तापमानात काहीशी घट झाली. यातच राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होत आहे. २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या आठवड्याच्या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे.
Minimum temperature rise is possible due to rainy weather
Minimum temperature rise is possible due to rainy weather

पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या किमान तापमानात काहीशी घट झाली. यातच राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होत आहे. २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या आठवड्याच्या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. तर किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

१८ ते २४ नोव्हेंबर या आठवडाभराच्या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सर्वदूर मध्यम ते जोरदार स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली. विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मराठवाड्यातील बीड आणि हिंगोली जिल्ह्यांत पाऊस पडला नाही, नांदेड जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी, जालना जिल्ह्यात सरासरी इतका तर उर्वरित जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस पडला.  कोकणातील सर्व जिल्हे, तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाची नोंद झाली. विदर्भातील अकोला, यवतमाळ जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत अपुरा, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर बुलडाणा जिल्ह्यात सरासरी इतका, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com