Agriculture News in Marathi Minimum temperature rise is possible due to rainy weather | Agrowon

पावसाला पोषक हवामानामुळे किमान तापमानात वाढ शक्य 

टीम अॅग्रोवन
रविवार, 28 नोव्हेंबर 2021

पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या किमान तापमानात काहीशी घट झाली. यातच राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होत आहे. २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या आठवड्याच्या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे.

पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या किमान तापमानात काहीशी घट झाली. यातच राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होत आहे. २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या आठवड्याच्या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. तर किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

१८ ते २४ नोव्हेंबर या आठवडाभराच्या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सर्वदूर मध्यम ते जोरदार स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली. विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मराठवाड्यातील बीड आणि हिंगोली जिल्ह्यांत पाऊस पडला नाही, नांदेड जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी, जालना जिल्ह्यात सरासरी इतका तर उर्वरित जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस पडला. 

कोकणातील सर्व जिल्हे, तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाची नोंद झाली. विदर्भातील अकोला, यवतमाळ जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत अपुरा, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर बुलडाणा जिल्ह्यात सरासरी इतका, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. 

 


इतर बातम्या
आकडेवारीची जबाबदारी राज्याचीपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च...
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market...
 सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र...सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर...
उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के...केंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (...
वीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा...शेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज...
Top 5 News: हरियाणाचं कापूस उत्पादन...1. गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
साखर उत्पादनात यंदा महाराष्ट्र अव्वल ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनच्या (AISTA) पीक...
उन्हाळी पिकांना केंद्र सरकार प्रोत्साहन...तेलबिया आणि कडधान्यांमध्ये आत्मनिर्भर (...
पावसामुळे रब्बी हंगामात बंपर उत्पादन...यंदाच्या हंगामात रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्रात...
येते दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार?पुणे : गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
डीएपी खतांचा वापर कमी करा; एनपीके,...वृत्तसेवा - राज्यांनी एनपीके (NPK) आणि...
ओबीसींचा न्याय्य हक्क त्यांना देणारच ः...नागपूर : ‘डेटा देणार की नाही, देणार असतील तर...
एक लाख ६९ हजार शेतकरी कर्जमुक्त बुलडाणा : ‘‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी...
कोल्हापूरसाठी ४०० कोटींचा निधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सर्वसाधारण वार्षिक...
मृत कर्जदारांची सुधारित माहितीसाठी २९...बुलडाणा : कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मृत कर्जदारांची...
धुळे जिल्ह्यात पारा २.८ अंशांवरपुणे : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र...
खतांची चढ्या दराने विक्री नाशिक : रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आहेत....
खांडसरी, गूळ उद्योगावर येणार कायद्याचा...पुणे ः राज्यातील गूळ उद्योगावर कायदेशीर नियंत्रण...
‘पोकरा’मधील घोटाळ्याचा अहवाल दडपलापुणे ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (...
खाद्यतेल आत्मनिर्भरतेची घोषणाचपुणे ः देशात खाद्यतेलाची जवळपास ६० टक्के गरज...