agriculture news in Marathi minimum temperature rose Maharashtra | Agrowon

किमान तापमानात मोठी वाढ

टीम अॅग्रोवन
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा अभाव, पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण व दमट वाऱ्यांमुळे राज्याच्या किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा १६ अंशांच्या वर गेल्याने गारठा नाहीसा झाला आहे. शुक्रवारी (ता. २९) सकाळी धुळे येथील कृषी महाविद्यालयात नीचांकी १३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कडाक्याच्या थंडीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा अभाव, पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण व दमट वाऱ्यांमुळे राज्याच्या किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा १६ अंशांच्या वर गेल्याने गारठा नाहीसा झाला आहे. शुक्रवारी (ता. २९) सकाळी धुळे येथील कृषी महाविद्यालयात नीचांकी १३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कडाक्याच्या थंडीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

राज्यात गेले काही दिवस सातत्याने ढगाळ हवामान असल्याने होत थंडी गायब झाली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी उकाडा वाढत आहे. बहुतांशी भागात कमाल तापमानही ३० अंशांच्या पुढेच आहे. शुक्रवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे राज्यातील सर्वाधिक ३५.७ अशं सेल्सिअस, तर कर्नाटकातील कारवार येथे देशातील सर्वाधिक ३६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

हिमालय पर्वत आणि लगतच्या राज्यात हिमवृष्टी होत असली, तरी उत्तर भारतातही अद्याप थंडीचा कडाका वाढलेला नाही. हरियानातील भिवणी येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी १०.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

शुक्रवारी (ता. २९) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १७.३ (५), धुळे १३.६, जळगाव १६.० (३), कोल्हापूर २०.५ (४), महाबळेश्वर १६.८ (३), मालेगाव १७.६ (५), नाशिक १६.० (४), सांगली १९.२ (२), सातारा १६.९ (२), सोलापूर २०.७ (४), अलिबाग २२.३ (३), डहाणू २३.० (३), सांताक्रूझ २२.६ (३), रत्नागिरी २३.३ (३), औरंगाबाद १६.५ (३), परभणी १७.१ (३), नांदेड १७.५ (३), अकोला १५.५ (०), अमरावती १५.८ (-१), बुलडाणा १६.५ (०), चंद्रपूर १८.६ (४), गोंदिया १५.२ (०), नागपूर १५.९ (२), वर्धा १७.० (२), यवतमाळ १६.० (०).


इतर अॅग्रो विशेष
पोपटराव पवार, राहिबाई पोपेरे यांना...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शनिवारी (ता. २५)...
कोयना धरणाच्या पोटात होणार आणखी एक धरणकोयनानगर, जि. सातारा ः येथील कोयना धरणाची...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत केवळ १४...औरंगाबाद : संकटांशी दोन हात करून आपली शेती जिवंत...
खानदेशात रब्बीत अत्यल्प पीक कर्जवाटपजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पेरण्या जवळपास...
वटवाघळांचा मोर्चा आता द्राक्ष बागांकडेपुणे: वटवाघळांची वस्तीस्थाने आणि अधिवास...
गटाने तयार केला `कोकणरत्न' ब्रॅंडकुर्धे (जि. रत्नागिरी) गावातील श्री नवलाई देवी...
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...
राज्यातील बाजार समित्या निवडणुका पुढे...पुणे: ज्या बाजार समित्यांच्या निवडणुका...
अण्णासाहेब पाटील महामंडळाने १०००...नगर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास...
शेती, जलसंधारण अन् शिक्षणाचा घेतला वसामांडाखळी (जि. परभणी) येथील मातोश्री जिजाऊ ग्राम...
रेशीम संजीवनीरेशीम उद्योगाचा विस्तार व विकास करण्याच्या...
ऑनलाइन बॅंकिंग करताय, सावधान!आधुनिक युगात विज्ञानामुळे नवनवीन शोधांमुळे मानव...
‘पोकरा’मध्ये अखेर जबाबदाऱ्यांचे विभाजनअकोला ः पोकरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कृषी...
कृत्रिम रेतन नियंत्रण कायदा कधी? पुणे: पशुधनाच्या आरोग्याला घातक असलेली सध्याची...
किमान तापमानात होतेय घटपुणे : गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी...
सात-बारा कोरा करण्याची सुबुद्धी सरकारला...पंढरपूर, जि. सोलापूर: विधानसभा...
सरकारी पीकविमा कंपनी हवी : शेतकरी...नागपूर ः खासगी कंपन्या तयार नसतील तर केंद्राने...