हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८ हजार ४०३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.
अॅग्रो विशेष
किमान तापमानात वाढ
मध्य महाराष्ट्राच्या परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. यामुळे उकाड्यात वाढ होऊन थंडी कमी झाली आहे. राज्यातील अनेक भागांत किमान तापमानात वाढ झाली आहे.
पुणे ः मध्य महाराष्ट्राच्या परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. यामुळे उकाड्यात वाढ होऊन थंडी कमी झाली आहे. राज्यातील अनेक भागांत किमान तापमानात वाढ झाली आहे. शुक्रवारी (ता. २६) सकाळी आठ वाजेपर्यंत निफाड येथील गहू संशोधन केंद्राच्या आवारात १४ अंश सेल्सिअसच किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
राज्यात असलेले कोरडे हवामान असल्याने उन्हाचा चटका सकाळपासून वाढू लागला आहे. त्यातच अरबी समुद्राच्या वायव्य भागात आणि मध्य महाराष्ट्राच्या परिसरात चक्रीय स्थिती असल्याने काही अंशी ढगाळ वातावरण आहे. यामुळे उन्हाचा चटका वाढू लागल्याने किमान तापमानाबरोबर कमाल तापमानातही वाढ होऊ लागली आहे. सध्या राज्यातील जवळपास सर्वंच भागांत किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी थंडी गायब झाल्याची स्थिती असून, किमान तापमानाचा पारा २० अंश सेल्सिअसच्या वर सरकला आहे.
विदर्भाच्या काही भागांत अजूनही काही प्रमाणात थंडीचा प्रभाव आहे. त्यामुळे किमान तापमान १६ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. अकोला, अमरावती, बुलडाणा भागांत थंडी चांगलीच कमी झाली आहे. मराठवाड्यातही थंडीने काढता पाय घेतल्याने किमान तापमानाचा पारा कमी झाला आहे. यामुळे किमान तापमान १४ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रातही थंडी कमीअधिक स्वरूपात आहे.
दक्षिण भागात थंडी कमी झाली आहे. त्यामुळे किमान तापमान
२१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. कोकणात ऊन वाढू लागल्याने थंडी कमी होऊ लागली आहे. सध्या या भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली असून, किमान तापमान १९ ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.
शुक्रवारी (ता.२६) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः
- मुंबई (सांताक्रूझ) २१.६ (२)
- ठाणे २१.८
- अलिबाग २२.२ (३)
- रत्नागिरी २०.५
- डहाणू १९.७
- पुणे १६.४ (३)
- नगर १७.५ (३)
- जळगाव १८.४ (३)
- कोल्हापूर २१ (३)
- महाबळेश्वर १७.७ (२)
- मालेगाव १७.८ (४)
- नाशिक १५.५ (२)
- निफाड १४
- सांगली २०.५ (४)
- सातारा १८.९ (३)
- सोलापूर २०.५ (१)
- औरंगाबाद १७.२ (१)
- बीड १९.३ (३)
- परभणी २०.८ (३)
- परभणी कृषी विद्यापीठ १४.१
- नांदेड १५.५ (-१)
- उस्मानाबाद १७.६
- अकोला १८.५ (१)
- अमरावती २०.२ (४)
- बुलडाणा २० (२)
- चंद्रपूर १७.६ (-१)
- गोंदिया १६ (-१)
- नागपूर १६.७
- वर्धा १८.४ (१)
- यवतमाळ १९
- 1 of 696
- ››