किमान तापमानात घट होणार 

बंगालच्या उपसागरात तयार झालेले निवार चक्रीवादळ तमिळनाडूच्या किनारपट्टीजवळ धडकून ते वायव्य दिशेने सरकले.
किमान तापमानात घट होणार 
किमान तापमानात घट होणार 

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले निवार चक्रीवादळ तमिळनाडूच्या किनारपट्टीजवळ धडकून ते वायव्य दिशेने सरकले. गुरुवारी (ता. २६) त्याचा वेग ताशी ११ कि.मी. इतका होता. आज (ता. २७) या वादळाची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे किमान तापमान तीन ते पाच अंश सेल्सिअसनी घटणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

चक्रीवादळाचा वेग कमी झाला असला, तरी ते गुरुवारी दुपारी पुद्दुचेरीपासून वायव्येकडे ५० किलोमीटर अंतरावर होते. सायंकाळनंतर त्याचा वेग आणखी कमी होता. त्याचा काहीसा परिणाम राज्यातील काही भागांवर झाला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही भागांत हवामान ढगाळ होते. तसेच मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण भागांत थंड वारे वाहिल्याने गारठ्यात चांगलीच वाढ झाली होती. त्यामुळे किमान तापमानात बऱ्यापैकी घट झाली होती. गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत निफाड येथे १२.५ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली. 

निवार चक्रीवादळ गुरुवारी कर्नाटकाच्या किनारपट्टीवर आल्यानंतर या भागात पाऊस सुरू झाला होता. किनारपट्टी भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवले होते. आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांतील बहुतांशी भागांत पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी घरांचे व झांडाचेही नुकसान झाले आहे. निवार वादळीप्रणालीच्या प्रभावामुळे आज (शुक्रवार) आणि उद्या (शनिवार) या काळात सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  गुरुवारी (ता.२६) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान. (अंश सेल्सिअस) ः मुंबई (सांताक्रूझ) २०.८ (१), अलिबाग २०.८ (१), ठाणे २४, रत्नागिरी २२, डहाणू २१.६ (१), पुणे १३.३, जळगाव १४.६ (१), कोल्हापूर १९ (२), महाबळेश्‍वर १३.९, मालेगाव १६.२ (३), नाशिक १४.३ (२), निफाड १२.५, सांगली १७.१ (१), सातारा १४.१ (-१), सोलापूर १९.० (-२), औरंगाबाद १४.४ (१), बीड १५.९ (१), परभणी १४ (-१), परभणी कृषी विद्यापीठ १२.८, नांदेड १५ (१), उस्मानाबाद १६.२ (२), अकोला १५.८, अमरावती १३.३ (-३), बुलडाणा १५.८, चंद्रपूर १८.४ (४), गोंदिया १३.२ (-२), नागपूर १४.५, वर्धा १५, यवतमाळ १५.५. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com