agriculture news in marathi minimum temperature would decrease again | Agrowon

शनिवारपासून किमान तापमानात घट होण्याची शक्यता

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 जानेवारी 2020

पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाल्याने राज्यातील थंडी कमी झाली आहे. ढगाळ हवामानामुळे दुपारच्या वेळी काहीसा उकाडाही जाणवत आहे. बुधवारी (ता. २२) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शनिवारपासून (ता. २५) किमान तापमानात २ ते ४ अंशांची घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाल्याने राज्यातील थंडी कमी झाली आहे. ढगाळ हवामानामुळे दुपारच्या वेळी काहीसा उकाडाही जाणवत आहे. बुधवारी (ता. २२) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शनिवारपासून (ता. २५) किमान तापमानात २ ते ४ अंशांची घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

उत्तरेकडून वाहणारे प्रवाह खंडित झाल्याने किमान तापमान सरासरीच्या वर गेले आहे. तर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात अंशत: ढगाळ हवामान होत आहे. राज्याच्या सर्वच भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा २ ते ५ अंशांची वाढ झाल्याने गारठा कमी झाला आहे. तर सकाळच्या वेळी दाट धुळे आणि दवही पडत आहे. दुपारनंतर उन्हाचा चटका वाढून उकाडा जाणवू लागला आहे. किमान तापमानातील वाढ आणखी दोन दिवस कायम राहणार असून, शनिवारपासून राज्याच्या तापमानात २ ते ४ अंशाची घट होणार आहे.   

 बुधवारी (ता. २२) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १५.३ (४), नगर १६ (४), धुळे १३.६, जळगाव १७.५ (५), कोल्हापूर १८.८ (३), महाबळेश्‍वर १५.९ (२), मालेगाव १५.६ (५), नाशिक १५.० (५), निफाड १४, सांगली १८.८ (५), सातारा १६.४ (४), सोलापूर १९.६ (३), अलिबाग १९.८ (३), डहाणू १८.६ (२), सांताक्रूझ १८.३ (१), रत्नागिरी २०.३ (२), औरंगाबाद १६.१ (४), परभणी १७.० (२), नांदेड १७.५ (४), अकोला १८.२ (४), अमरावती १७.६ (३), बुलडाणा १८.४ (३), चंद्रपूर १७.० (१), गोंदिया १४.६ (१), नागपूर १४.९ (१), वर्धा १७.५ (३), यवतमाळ १८ (२).


इतर अॅग्रो विशेष
शेतमाल खरेदीत सुधारणा कधी?कापूस आणि सोयाबीन ही महाराष्ट्रातील खरीप...
शेतकऱ्यांना हमीभावाचीच हमी मिळत नाहीनरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सहाव्या ...
लेखाजोखा मोदी सरकारचा! पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण...
झळाळी पिवळ्या सोन्याची!मराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक...
कृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...
सोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...
हमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...
राहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...
परतीचा मॉन्सून उद्या काही भागातून पुढे...पुणे: परतीच्या मार्गावर दोन दिवसापूर्वी निघालेला...
दूध वाहतुकीसाठी रेड्याचा वापर !...वाशीम: काळ बदलला...सोयी सुविधा निर्माण झाल्या......
ऊस तोडणी यंत्र अनुदानालाच खो; तीन...कोल्हापूर : संभाव्य मजूरटंचाईच्या पार्श्वभूमीवर...
नंदुरबारच्या मिरचीला अतिपावसाचा फटका;...नंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मिरची...
एकत्रित शेतीला यांत्रिकीकरणाची जोडअल्पभूधारकांप्रमाणे मोठ्या क्षेत्रावरील...
व्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा? चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...
आव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...
साखर कामगारांचा संपाचा इशारा  पुणे/कोल्हापूर  ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...
मॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...
मराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...
अकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...