मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती ; ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या चौकशीला गती

३३ कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष मोहिमेची चौकशी करण्यासाठी विधानसभेच्या १६ सदस्यांच्या विधिमंडळ समितीची घोषणा वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी (ता.१०) विधानसभेत केली.
मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या  अध्यक्षतेखाली समिती ; ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या चौकशीला गती Of Minister Dattatraya Bharane Committee under the chairmanship; Speed up investigation of 33 crore tree planting campaign
मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या  अध्यक्षतेखाली समिती ; ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या चौकशीला गती Of Minister Dattatraya Bharane Committee under the chairmanship; Speed up investigation of 33 crore tree planting campaign

मुंबई : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी राज्यात राबविलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष मोहिमेची चौकशी करण्यासाठी विधानसभेच्या १६ सदस्यांच्या विधिमंडळ समितीची घोषणा वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी (ता.१०) विधानसभेत केली. समिती चार महिन्यांत सभागृहाला अहवाल सादर करणार आहे. समितीचे अध्यक्ष स्वतः वन राज्यमंत्री भरणे असणार आहेत. 

आमदार रमेश कोरगावकर यांनी मागील आठवड्यात या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी विधिमंडळाच्या समितीमार्फत वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी करण्यात येईल. चार किंवा सहा महिन्यांत याचा अहवाल सभागृहाला अहवाल सादर केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.

त्यानुसार वन राज्यमंत्र्यांनी समितीची घोषणा केली आहे.  वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत विधानसभा सदस्य नाना पटोले, सुनील प्रभू, उदयसिंग राजपूत, बालाजी कल्याणकर, अशोक पवार, माणिकराव कोकाटे, सुनील भुसारा, शेखर निकम, सुभाष धोटे, अमित झनक, संग्राम थोपटे, आशिष शेलार, नितेश राणे, अतुल भातखळकर, समीर कुणावर आणि नरेंद्र भोंडेकर यांचा समावेश आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com