मदत व पुनर्वसन मंत्री देणार ४० हजार कुटुंबांना किराणा साहित्य 

चंद्रपूर ः खऱ्या अर्थाने पालकत्वाची जबाबदारी पार पाडत मदत व पुनर्वसन मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ४० हजार कुटुंबांना आवश्‍यक किराणा वस्तू पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी (ता. ५) ब्रम्हपुरीतून या मोहिमेचा प्रारंभ होईल.
Minister for Relief and Rehabilitation will provide grocery items to 40,000 families
Minister for Relief and Rehabilitation will provide grocery items to 40,000 families

चंद्रपूर ः खऱ्या अर्थाने पालकत्वाची जबाबदारी पार पाडत मदत व पुनर्वसन मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ४० हजार कुटुंबांना आवश्‍यक किराणा वस्तू पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी (ता. ५) ब्रम्हपुरीतून या मोहिमेचा प्रारंभ होईल. 

‘कोरोना’चा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. दोनवेळ पोट कसे भरावे या विवंचनेत ते आहेत. अशा गरजूंच्या मदतीसाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार पुढे आले आहेत. 

शासन, प्रशासनाच्या स्तरावरुन मदत होत असली तरी काही मदत चाकोरी बाहेर जाऊन करावी लागते, हे लक्षात आल्यानंतर विजय वडेट्टीवारांनी किराणा पुरविण्याचा निर्णय घेतला. रविवार (ता. ५) पासून ब्रम्हपुरी येथून या मोहिमेचा प्रारंभ होणार आहे. त्यानुसार प्रत्येक तालुक्‍यात ठरावीक तारखेला साहित्य वाटप होईल. ही सर्व किराणा साहित्याची पाकिटे प्रत्येक तालुक्‍यात तहसीलदार कार्यालयात जमा केली जाणार आहेत. यामध्ये दहा किलो तांदूळ, दोन किलो डाळ, एक किलो खाद्य तेल, जिरे, साबण यासारख्या वस्तूंचा समावेश राहील. 

दोन कोटींतून ४० हजार कुटुंबांना मदत  जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्‍यांतील गरजूंना या मोहिमेतून आवश्‍यक किराणा साहित्याचे पाकिटे दिले जाणार आहे. यावर सुमारे २ कोटी रुपये इतका खर्च आहे. यातील १५ हजार पाकिटांचा खर्च विजय वडेट्टीवार स्वतः करतील. उर्वरित खर्चासाठी त्यांनी दानशूरांना आवाहन केले होते. अनेकांनी या मोहिमेत सहभागाची इच्छा दर्शवीत आर्थिक मदत केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com